दुर्दैवी.! हात्ती व आयशरची धडक, चौघे जागीच ठार.! लॉकडाऊनमुळे पर्याय शोधला पण तो जीवावर बेतला.!

सार्वभौम (पारनेर) : 

                  पारनेर तालुक्यात करंदी येथे राहणार्‍या चौघा तरुणांचा अपघातात मृत्यु झाल्याची धक्कादायक महिती समोर आली आहे. ही घटना आज पहाटे जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद परिसरात पाच वाजण्याच्या सुमारास घडली. आयशर आणि छोटा हात्ती यांच्या समोरासमोर झालेल्या अपघातामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. यात सुरेश नारायण करंदीकर (वय44), सिद्धार्थ राजेश उघडे (वय22), आकाश सुरेश रोकडे (वय26) व सुनिल विलास उघडे (वय 19) अशी मयत झालेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकणी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर चूक कोणाची आहे, दोन्ही वाहने व मालक आणि अन्य तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत तरुण यांनी आपल्या उपजिवीकेसाठी एका छोटासा धंदा सुरू केला होता. गावाडून भाजीपाला भरायचा आणि तो मुंबई मार्केटला नेवून विकायचा. हा त्यांची नित्याचा दिनक्रम होता. त्यांनी ठरल्यप्रमाणे गाडी मुंबईत खाली केली आणि ते घराकडे निघाले होते. दरम्यात ते जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद शिवारत असतांना त्यांची धडक सामोरुन येणार्‍या आयशर गाडीला झाली. त्यामुळे, त्यात कोणी कोणी जागीच मयत झाले तर कोणी उपचाराची प्रतिक्षा करीत होते. मात्र, रात्री असल्यामुळेे योग्य उपचार देखील मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी आपले प्राण सोडले अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. यात त्याच्या ताब्यातील छोटा हात्ती एम. एच 16 सीसी 6388 याचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर त्यांना जो समोरे धडकलेला आयशर एम. एच 16 एई 9080 याचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, छोटा हात्ती आयशरपेक्षा लहान असल्यामुळे तो पुर्णत: चेंबून गेला आहे.

दरम्यान जसे कोरोनाने देशात अशांतता निर्माण केली तेव्हापासून प्रत्येकजण अस्तिर झाला आहे. त्यामुळे, जो-तो आपल्या कुटुंबाच्या पोटासाठी दोन रुपये कमविण्याचे मागे धावतो आहे. आज अनेकाच्या हाताच्या नोकर्‍या गेल्या आहेत. त्यामुळे, तरुण बेरोजगार झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे, जे काम सध्या करता येईल, ज्या कामाची मागणी आहे ते काम करण्यासाठी जो-तो झटतो आहे. मात्र, त्यामुळे अशा प्रकारचे कोणते ना कोणते अपघात घडताना दिसत आहे. पैसा नाही म्हणून गेल्या महिन्यात कुटुंबाची रोजीरोटी चालावी म्हणून संगमनेर तालुक्यातील कोंची मांची येथील तरुण रात्री अपरात्री वाळु भरण्यासाठी गेले आणि त्यामुळे झाले काय! तर अपघात झाला आणि तीन तरुण गाडीखाली चेंबून मयत झाले. त्यामुळे, जे काम कराला ते जिवावर बेतून करु नका. असे आवाहन प्रशासन व समाजसेवक आपल्याला करीत आहे. 

- तुषार भाटीया 

----------------------------------------------