भयानक.! खून करुन धान्याच्या पेटीत कोंबला मृतदेह, अन फेकला नदीच्या कुंडात.! गुन्हा दाखल, पथके रवाणा.!

सार्वभौम (पारनेर) :-

                        पारनेर तालुक्यात निघोज परिसरातील कुकडीच्या नदी प्रवाहातील कुंडात एका पेटार्‍यात अज्ञात व्यक्तीचा खून करुन फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही हा प्रकार गुरुवार दि. 27 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या पुर्वी घडला असल्याचे बोलले जात आहे. सध्या याप्रकरणी दामु धोंडीबा घोडे (रा. टाकळी हाजी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारनेर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या मयत 40 वर्षीय पुरुषाची ओळख पटली नसून तो जोपर्यंत कोण आहे हे कळत नाही. तोवर गुन्हेगाराचा शोध घेणे शक्य नाही. त्यामुळे, पोलिसांनी आता आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पारनेर तालुक्यात निघोज परिसरातून कुकडी नदीचा प्रवाह जातो. तर या ठिकाणी नदिपात्रात मोठमोठी खळगी आहेत. त्याचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याच्या दुष्मनाचा काटा काढण्यासाठी अशा प्रकारचा संयमी व नियोजनपुर्वक प्लॅनिंग केल्याचे समोर येत आहे. आरोपी याने कोणत्यातरी धारधार हत्याराने एका 40 वर्षीय व्यक्तीची हत्या केली. या मृतदेहाची विल्हेवाट कोठे लावायची असा प्रश्न पडलेला असताना त्याने एकतर पुर्वनियोजित ही जागा शोधून ठेवलेली असणार. त्यामुळे, त्याने ठरल्यावेळी खून केला आणि तो धान्याच्या एका पत्र्याच्या पेटीत  कोंबुन कोणत्यातरी वाहनाच्या सहाय्याने आणून तो निघोज परिसरात जे कुंड आहेत त्यात टाकून दिला.                                

दरम्यान हा प्रकार कालांतराने काही लोकांच्या लक्षात आला असता त्यांनी याबाबत माहिती पोलीस ठाण्यात दिली. तेव्हा स्वत: पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस उपाधिक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व सहायक पोलीस निरीक्षक गवळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. काहीही झाले तरी पहिल्यांदा मयत व्यक्तीची ओळख पटणे गरजेचे आहे. या निष्कर्षानंतर पोलिसांचे पथक कामाला बिलगले. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे पथक व गवळी यांच्या पथकाने आता पुणे ग्रामीणमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान या व्यक्तीबाबत कोठे मिसिंग दाखल असल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे या तपासाची उकल करणे आता पोलिसांपुढे एक आव्हाण असणार नाही.

                          दरम्यान असाच एक प्रकार अकोले तालुक्यातील राजूर भागात घडला होता. तेव्हा तेथील पोलिसांनी गाव-गाव पछाडले होते. प्रत्येक ठिकाणी सरपंच यांना संपर्क करुन कोणी मिसिंग आहे का? कोणाच्या गेल्या आठ दिवसात वाद झाले आहे का? अशा प्रकारच्या माहित्या काढल्या होत्या. तर वायरलेस करुन संबंधित व्यक्तीचे वय वर्णन केले होते. अशा प्रकारचे वैयक्त्तीक व सामाजिक सोर्स वापरुन हा गुन्हा डिटेक्ट होणे शक्य आहे. तशा प्रचारचे काम स्थानिक पोलीस अधिकारी गवळी हे करताना दिसत आहे. तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेत असे अनेक मास्टरमाईंड कर्मचारी आहेत. की, ज्यांना नगर दक्षिणेतील खडान खडा माहित आहे. त्यामुळे, सध्यातरी पोलिसांचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. जर या खुनाबाबत कोणाला काही माहिती असेल तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन अधिकार्‍यांनी केले आहे. माहिती देणार्‍याचे नाव गुपित ठेवण्याची खात्री ठेवावी अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. 

- तुषार भाटीया

-------------------------------------

 80 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 87 लाख वाचक)