सख्या भावाच्या अनैतीक संबंधातून बहिनीला झाली मुलगी! पोलिसांचा धक्कादायक तपास, अकोल्यातील देवठाणची घटना!


सार्वभौम (अकोले) :- 
                        अकोले तालुक्यातील देवठाण परिसरात राहणार्‍या एका अल्पवयीन तरुणाने त्याच्या सख्या बहिनीवर अत्याचार केले. त्यानंतर काही कालावधीत ती गरोदर राहिली, मात्र हा हा प्रकार नेमकी कोणी केला हे लवकर लक्षात आले नाही. पीडित तरुणीने देखील स्वत:चे नाव व अत्याचार करणार्‍याचे नाव खोटेे सांगितल्यानंतर संबंधित बनावट नावाचा शोध पोलिसांनी सुरू केला. मात्र, हा गुन्हा अकोले पोलिसांच्या स्वाधिन झाला असता त्यांनी मोठी बुद्धीचातुर्याने या गुन्ह्याची उकल केली असता त्यात समोर आले की, या मुलीवर अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो तिचा सख्खा भाऊ आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन आरोपीस नगर येथील बालसुधार गृहात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
                            याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील देवठाण येथील एका तरुणीचे लग्न सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे झाले होते. मात्र, चार-सहा वर्षानंतर त्यांच्यात वाद होत गेले. या दरम्यान त्यांना दोन मुली व एक मुलगा झाला. दोघांमध्ये तडजोड होण्यापेक्षा वादाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेले. त्यामुळे ही देवठाणची महिला तिच्या माहेरी निघून आली. त्यानंतर ही मुले गेली काही दिवस इकडे राहिली मात्र, थोड्यात दिवसात त्यांनी आईकडे धुम ठेकली. त्यानंतर हे मुलांना त्या आईने शाळेत घातले, मात्र, ते शाळा शिकण्याऐवजी भलतेच उद्योग करीत असल्यामुळे तीन या मुलांना पुन्हा त्यांच्या बापाकडे नेवून सोडले. या दरम्यानच्या काळात हा मुलगा व मुलगी वयात आले. मुलगी 15 वर्षे वयाची तर मुलगा 17 वर्षे वयाचा झाला. या दरम्यान त्यांच्याकडे कोणाचे फारसे लक्ष नल्यामुळे त्याच्यास शारिरीत संबंध झाले. मात्र, हा प्रकार त्यांच्या घरी कोणालाच माहित नव्हता.
                          दरम्यान काही दिवसानंतर ही अल्पवयीन मुलगी आजारी पडली असता तिचे पोट दुखत असल्याने तिला स्थानिक रूग्णालयात तपासणीसाठी नेले असता ती गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर तिला नाशिक येथे रुग्णालयात नेले असता खात्री केल्यानंतर तिला विचारणा केली असता तिने स्वत:चे नाव देखील खोटे सांगितले. तर तुझे कोणासोबत शरिर संबंध विचारला असता तिने भलतेच नाव सांगितले. त्यानंतर वावी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान हा तपास शुन्य क्रमांनाने अकोले पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. त्यामुळे तीने जे काही सांगितले होते. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला होता.
                            या गुन्ह्याचा अकोले पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमणे यांनी तपासाची सुत्रे हाती घेतली. पीडित मुलीचे पुन्हा एकदा समुपदेशन करण्यात आले. तीने सांगितले की, देवठाण येथे माझे लग्न झाले असून माझे पती तिकडेच आहे. त्यांच्यापासून हे अपत्य झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी देवठाण येथे चौकशी केली असता त्या मुलीने जे काही बनावट नाव सांगितले होते. त्याची चौकशी केली असता त्या नावाचा कोणीच व्यक्ती नसल्याचे समोर आले. पोलीस निरीक्षक ढोमने यांनी पुन्हा त्या मुलीचे समुपदेशन केले असता पोलिसांच्या वेगवेगळ्या तपास पद्धतींचा वापर केला. त्यानंतर गर्भवती पीडित मुलीने सांगितले की, माझ्यावर माझ्या सख्या भावानेच अत्याचार केला आहे. त्याच्यामुळेच मी गर्भवती राहीले आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विचारणा केली. त्याने पहिल्यांदा उडवाउडविची उत्तरे दिली. मात्र, त्यांच्या काही मेडिकल बाजू तपासल्या असता त्याच्याकडून काही माहिती हाती आली. त्यानंतर त्यास ताब्यात घेऊन नगर येथील बालसुधार गृहात ठेवण्यात आले आहे. या घटनेला काही दिवस उलटल्यानंतर गुन्ह्याची शास्वती झाली आहे. त्यामुळे अकोले पोलिसांनी खानापूर सामुहीक बलात्कार, चैत्यन्यपूर महिलेचा मर्डर  आणि अशा अनेक उकृष्ट तापासात आणखीन एक उत्तम तपासाचा नमुना तालुक्यापुढे सादर केला आहे. त्यामुुळे त्यांचे कौतूक होत आहे.