एक दिलदार मनाचा अवलिया! अनिकेत थोरात एका शेतकर्‍याच्या मुलाची संघर्षयम काहणी! जोर्वे ते व्हाया अकोले मार्गे मंत्रायल!

 

सार्वभौम (मैत्रीचा विशेष लेख) :-
                               ‘कुलगुरू’ डॉ. नरेंद्र जाधव यांनी “आमचा बाप आणि आम्ही” या प्रेरणादायी पुस्तक लिहीले आहे की, ‘तुम्ही ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात जाल त्या क्षेत्रातील सर्वोच्च व्यक्ती तुम्हाला व्हायचं आहे’! मग ते क्षेत्र कोणतेही असोत. अगदी हेच वाक्य अनेक पालकांच्या मस्तकात गेले आणि त्यातलेच एक लक्ष्मण थोरात यांनी आपल्या एकुलत्या एक लेकराच्या डोक्यावर हात ठेऊन शपथ दिली. जे करायचे ते प्रामाणिकपणे, जे वागयचे आहे ते संयमाने आणि जगायचे ते संघर्षाने अगदी त्याच पावलावर पाऊल ठेऊन आज उभा राहिलेला चिरतरुण म्हणजे अनिकेत थोरात होय! आज धैय्यवेड्या आमदारांच्या पावलामागे पाऊल टाकून त्यांनी जे अकोले तालुक्याच्या विकासाचे स्वप्न पाहिले त्याला आकार देण्यासाठी डॉक्टर सांगतील तसे मंत्रायल पायाखाली घालणारा अवलिया म्हणजे अनिकेत थोरात! आज त्यांचा वाढदिवस! अर्थात एकीकडे याच महिन्यात भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यात मैत्रीदीन त्यामुळे अनेकांना न्याय देऊन मैत्रीचा धागा आयुष्यभर काळजात जपणारा हा मित्र यास उदंड आयुष्य लाभो!
                     खरंतर ज्या जोर्वे गावातून भाऊसाहेब थोरात यांच्या रुपाने सहकाराचे बीज उभे राहिले आणि त्याचाच आज वटवृक्ष तयार झाला, त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन ना. बाळासाहेब थोरातांच्या रुपाने संगमनेर तालुक्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याच गावाच्या कुशीत थोरात कुटुंबाच्या सावलीखाली अगदी सामान्य घरातून अनिकेत थोरात यांच्या सारखा तरुण कसोशिने शिक्षण घेतो आणि शहर गाठतो. खरंतर गावालाच समाजसेवेचे बाळकडून मिळाल्यामुळे त्यांनी देखील शिक्षण सुरू असतानाच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविण्यास सुरूवात केली. त्यांची विद्यार्थी व समाज यांच्याप्रति असणारी आत्मियता लक्षात घेऊन ना. बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्याकडे विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि बोल-बोल करता संगमनेरच्या काना कोपर्‍यात अनिकेत थोरात हे नाव 10 वर्षे वारंवार गुंजत राहिले. यावेळी अनिकेत भाऊंनी मुलांना डब्बे देण्यापासून तर गरजू विद्यार्थ्यांची फी भरण्यापर्यंतची कामे केली. मात्र. या कानाची खबर त्या कानाला लागली नाही. इतक्या दानशूर मनाच्या तरुणाने ना. बाळासाहेब थोरात, आ. सुधिर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे, रंणजित देशमुख व अजय फटांगरे आणि तालुक्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत यांनी स्वत:चे वलय निर्माण केले.
                     या नितळ, निर्मळ आणि प्रांजळ स्वभावाचा फायदा असा झाला की, जेव्हा अकोले तालुक्यात एक ऐतिहासिक संघर्ष डॉ. किरण लहामटे यांच्या रुपाने उभा राहिला. गेल्या 40 वर्षाच्या राजकीय परंपरेला त्यांनी सुरूंग लावला, सह्याद्रीच्या कुशीत बसलेला हा तालुका आणि येथील आदिवासी जमात यांच्यासाठी काहीतरी करायचे या उद्देशाना आमदार पछाडले आणि त्यांनी मोठ्या संघर्षातून मंत्रालय गाठले. त्यांच्या पुढील कामकाजाचा भक्कम पाया अनिकेत थोरात यांच्या रुपाने मंत्रालयात रुढ झाला. तर जेव्हा तालुक्याला एका अभ्यासू व्यक्तीमत्वाची गरज होती ती डॉक्टरांच्या रुपाने ती पुर्ण झाली. मात्र, डॉक्टर हे जनसामान्यांचे आमदार आहेत. त्यामुळे, ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेला ते धाव घेत मतदारांच्या सेवार्थ उभे राहतात. मात्र, जनतेच्या मागण्या आणि प्रस्तावित कामे यांचा पाठपुरावा करण्यासाठी तालुक्याच्या विकासाचा अजेंडा मंत्रालयात प्रत्येक टेबलावर फिरविण्यासाठी एका भक्कम व विश्वासू व्यक्तीची गरज होती. ती डॉक्टरांनी अनिकेत थोरात यांच्यावर टाकली आणि साहेबांच्या विश्वासाला मुर्त स्वरुप देत थोरात सार्थ ठरले आहे. इतकेच काय! डॉक्टर हे आमदार नाही तर त्यांच्यासाठी देव म्हणून अनिकेत यांनी त्यांच्या शब्दांना अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले व डॉक्टर सांगतील ती कामे अगदी विश्वासाने व चोखपणे पार पाडली. 
                       खरंतर आमदार किरण लहामटे यांच्याकडे अनेक सामान्य लोक आपल्या तक्रारी करतात. त्यामुळे, त्यांना प्रत्येकाला वेळ देणे किंवा उत्तर देणे शक्य होत नाही. अशा वेळी एक स्वीय साहय्यक म्हणून पीए व पीआरओ अशी भूमिका बजावताना अनिकेत हे अगदी कोठेच कमी पडत नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी जनसामान्य व्यक्तींच्या मनात अगदी समाधानकारक प्रतिक्रिया आहे. डॉ. साहेबांनी जे काही सांगितले असेल ते यांनी केले नाही असे शक्यतो झाले नाही. डॉक्टरांना आमदार होऊन अजून 365 दिवस उलटले नाही तोच 60 कोटींची कामे प्रस्तावित करुन त्याचा पाठपुरावा करण्याचे काम सुरू आहे. डॉक्टर लहामटे हे प्रत्येकाच्या मागण्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे गेल्या काही दिवसात तालुक्यातील विविध कामांचे प्रस्ताव मंत्रालयात सादर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे खरोखर डॉक्टरांनी तालुक्याच्या विकासासाठी पाठपुरावा करणारे हे जालीम औषध शोधून काढले आहे.
                              खरंतर एका सामान्य कुटुंबातील तरुण डॉक्टरांच्या आशिर्वादाने मंत्रालयात पाय रोवतो हे फार संघर्षमय कहाणी आहे. म्हणजे “जया अंगी मोठेपण तया यातना कठीण”! या म्हणीप्रमाणे जेव्हा अनिकेत यांची पीए म्हणून नियुक्ती झाली तेव्हा ते संगमनेरमधून पहाटे पाच वाजता निघत असे. राजुरला आल्यानंतर दिवसभर काम आणि संध्याकाळी 8 ते 9 वाजता परतीचा प्रवास असा रोजचा दिनक्रम होता. यावेळी अनेकदा उसांच्या गाड्यांना हात करुन येणे तर मिळेल त्याची मदत घेऊन रात्री अपरात्री घर गाठावे लागत होते. मात्र, आनंद या गोष्टीचा होता की, डॉक्टर एक सच्चा माणूस असून त्यांची समाजाप्रती असणारी आत्मियता ही अनिकेत यांना काम करण्यास उत्स्फुर्ती देत असेे. त्यामुळे कितीही वेळ झाला तरी समाजासाठी आयुष्य वेचणार्‍या डॉक्टरांना एकटे सोडावे असे विचार कधी मनाला भिडले नाही. असे छान आणि ह्रदयस्पर्शी अनूभव त्यांच्याशी सार्वभौमने केलेल्या चर्चेतून पुढे आले. आज कोरोनाच्या काळत देखील तालुक्याचे आमदार मतदारसंघाचा कोना-कोना पायाखाली घालत आहे. त्यांच्या पाठोपाठ भाऊसाहेब साळवे, हरिदास माने आणि अनिकेत थोरात हे देखील डॉक्टरांच्या विचारांचा वसा घेऊन त्यांच्यामागे फिरत आहे. आज तालुक्याच्या मनातील आमदार जनतेने विधानसभेत पाठविला आहे. त्यांच्या रुपाने येथे विकासाची गंगा वाहणार आहे. तर त्यासाठी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत थोरात हे काम करत आहेच. त्यामुळे खरोखर डॉक्टरांचे आभार मानले पाहिजे की, अकोले थोरात यांच्या रुपाने तालुक्याला एक सहकार्यवादी व्यक्तीमत्व लाभले आहे. त्यांच्या हातून दोन्ही तालुक्याची सेवा घडो हीच प्रार्थना! एक मैत्री आणि दुसरा जन्मदीन (3 ऑगस्ट) अशा दोन्ही शुभदिनाच्या मन:पुर्वक शुभेच्छा.! 
-------------------------------------
 आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 75 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 78 लाख वाचक)