अकोल्यात 90 संशयितांचे स्वॅब तर संगमनेरात 15 पॉझिटीव्ह.! दोन्ही तालुक्यात 73 रुग्ण विजयी!


 - सुशांत पावसे
सार्वभौम (अकोले) :- 
                      संगमनेर तालुक्यात दिवसाअखेर 13 रुग्ण मिळून आले आहेत त्यात नव्या गावांना कोरोनाने ग्रासले असून या तालुक्याची संख्या आता 816 वर जाऊन पोहचली आहे. तर अकोले तालुक्यात तब्बल 90 संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. तर 107 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्वात संगमनेर तालुक्यात कोरोनाने सगळ्यांचे डोके खाल्ले असले तरी येथील रिकवरीची टक्केवारी अकोले तालुक्यापेक्षा चांगली झाली आहे. म्हणजे 816 पैकी 632 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे संगमनेरात कभी खुशी कही गम अशा प्रकारचे वातावरण पहावयास मिळत आहे.
आता संगमनेरात सकाळी घुलेवाडी येथे 51 व 52 वर्षीय पुरुष, कनोली येथे 62 वर्षीय पुरुष, अभिनव नगर संगमनेर येथे 67 वर्षीय पुरुष, जवळे कडलग येथे 65 वर्षीय पुरुष, नेहरु चौकात 52 वर्षीय महिला, शहरात शिवाजीनगर येथे 42 वर्षीय पुरुष, ताजने मळा येथे 36 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे 20 वर्षीय तरुणी, इंदिरा नगर 60 वर्षीय महिला, शिवाजी नगरमध्ये 69 वर्षीय पुरुष, इंदिरा नगर येथे 35 वर्षीय महिला तर कनोली येथे अवघ्या पाच वर्षाची बालिका हिला कोरोनाची बाधा झाली आहे. तर सावरगाव तळ २४ वर्षीय पुरुष व निमोण २५ वर्षीय पुरुष असे दोघे रात्री उशिरा बाधित मिळून आले आहेत.  त्यामुळे आज दिवसाअखेर 15 रुग्ण मिळून आले आहेत. तर आज दिवसभरात संगमनेरच्या 55 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर अकोले तालुक्यातील 18 जणांनी कोरोनाचा पराभव करून ते घरी परतले आहेत.
  आता संगमनेर तालुक्यात 818 रुग्ण झाले असून त्यापैकी 632 रूग्ण बरे झाले आहेत. तर यात 165 रुग्णांवर उपचार सुरू असून 19 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आजवर शहरात 365 रुग्ण मिळून आले असून आश्वी, ढोलेवाडी, घुलेवाडी, गुंजाळवाडी, हिवरगाव पावसा, जोर्वे, कनोली, कसारा दुमाला, खर्डी, कुरण, नांदुर खंदरमाळ, नांदुरी दुमाला, निमगाव पागा, निमोण, पेमगिरी, पिंपळगाव ढेपा, राजापूर, रायतेवाडी, शेडगाव, शिपलापूर व सुकेवाडी ही गावे कोरोनाच्या अजेंड्यावर होती. अगदी छोटी-छोटी गावे कोरोना बाधित होऊन येथे 5 ते 50 असे अनेक रुग्ण मिळून आले आहेत. मात्र, आता येथे ज्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली होती. ते जवळ-जवळ 85 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.
या पलिकडे अकोले तालुक्यात रुग्णांची संख्या दिवसेंदीवस वाढत आहे. ही आकडेवारी वाढत असली तरी एकाच कुटुंबात अनेकांना बाधा होण्याचे प्रमाण फार आहे. म्हणजे माणिक ओझर, शेरणखेल, रेडे, अकोले अशा ठिकाणी जे रूग्ण मिळून आले आहेत. ते एकाच कुटुंबातील आहे. त्यामुळे सामान्य गर्दी आणि एक-एक करुन वाढणारी संख्या येथे फार कमी आहे. म्हणजे एकाच वेळी कुटुंब बाधित झाले तर ते एकाच वेळी बरे होते. त्यामुळे ही तालुक्यासाठी सर्वात मोठी बाब आहे. एका व्यक्तीस बाधा झाली तर तो गावभर फिरत नाही. घरातील व्यक्ती बाधित होतात तर त्याच्यामुळे समाज्यातील लोक बाधित होण्याचे प्रमाण देखील अत्याल्प आहे. ही तालुक्यासाठी महत्वाची बाब आहे. त्यासाठी तहसिलदार मुकेश कांबळे, आरोग्य अधिकारी इंद्रजित गंभीरे, मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल, पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे आणि बीडीओ चौधरी यांच्यासह अन्य ज्ञात-अज्ञात कोरोना योद्ध्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
- महेश जेजूरकर