धक्कादायक.! कोरोनाला कंटाळून त्याने हॉस्पिटलच्या तिसर्‍या मजल्याहून उडी मारुन केली आत्महत्या.! प्लिझ रुग्णांना समजून घ्या.!


सार्वभौम (अहमदनगर) :-

                          देशात कोरोनाचे थैमान सुरू असल्यामुळे लोक या आजाराला आणि प्रशासन व समाजव्यवस्थेकडून मिळालेल्या वागणुकीला पुरते वैतागले आहेत. त्याचीच एक प्रचिती आज मंगळवार दि. 25 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास नगर शहरात पहावयास मिळाली आहे. कारण, पाथर्डी तालुक्यातील जवखेडा खालसा परिसरातील एक 28 वर्षीय तरुणाने चक्क नगर येथील सावेडी परिसरात उपचार घेत असलेल्या हॉस्पिटलच्या तीसर्‍या मजल्याहून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे, लोक आजकाल कोरोनाने कमी मात्र, भिती आणि हरॅशमेंटने जास्त मरु लागले आहेत. असे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे, या रोगाचे भय आणि प्रशासन तसेच समाजाकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक यासाठी प्रशासनानेच काहीतरी उपायोजना आखणे गरजेचे आहे. अशी मागणी आता काही समाजसेवक करु लागले आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील एका रुग्णाला अगदी काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला स्थानिक प्रशासनाने पाथर्डीत उपचार दिले. मात्र, दिवसेंदिवस त्याची प्रकृती गंभीर होत चालल्यामुळे त्याला जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने ताब्यात घेतेल्या एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान तो या कोरोना आजाराला प्रचंड वैतागलेला असल्यामुळे त्याने तिसर्‍या मजल्यावरील बिल्डींगच्या काचा फोडून खाली उडी मारुन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू आहे मात्र, पोलीस योग्य तपास करीत आहेत, त्याला जर पळून जायचे असते तर त्याने तिसर्‍या मजल्याहून उडी मारली नसती. कोणतेही कारण सांगून किंवा सर्वांची नजर चुकवून तो पसार होऊ शकला असता. मात्र, तो आजाराला कंटाळल्यामुळेच या विचारापर्यंत पोहचला असे काही सरकारी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.                          

आता आजवर जिल्ह्यात 17 हजार 583 रूग्ण झाले आहेत. त्यात 13 हजार 964 रुग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी 240 रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मात्र, या सर्व आकडेवरीत एक विचार केला तर लक्षात येईल की, ज्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील बहुतांशी लोकांना प्रशासनाकडून खेदजन वागणूक मिळाली तर जिवंतपणेच काय! मेल्यानंतर देखील अनेकांच्या मृतदेहाचे हाल झाल्याचे पहावयास मिळाले. इतका अतिरेख या कोरोनाने केला. एरव्ही माणूस मयत झाला तर त्याच्या अंत्यविधाला आणि दहाव्याला शेकडो लोक जमा होता, तर मयत सोडा निव्वळ नात्यातला माणूस आजारी पडला तर त्याला भेटण्यासाठी दारात रांग लगत असते. आता मात्र, नातेवाईकांमध्ये कोणाला कोरोना झाला असे समजले तरी भेट सोडा, साधा फोन सुद्धा लोक करत नाही. तर मेल्यानंतर अस्थि सोडा देह देखील ताब्यात देत नाहीत. इतकी भयानक परिस्थिती या रोगाने उभी केली आहे. प्रशासन आणि माध्यमे आणि समाज यांच्यामुळे कोरोनाला अवाजवी महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे, त्याचा परिणाम इतका गंभीर झाला आहे की, एखद्याला जर कोरोना झाला असे समजले तर त्याचा तत्काळ बीपी हाय होतो. त्याची विचार प्रक्रिया निगेटीव्ह होते, नकळत मृत्युचे भय डोळ्यासमोर उभे राहते. त्यामुळे हा निव्वळ भित्रेपणा असेन वास्तवत: कोरोना हा वाटतो तितका भयानक आजार नक्कीच नाही. असे अनेक तज्ञांना वाटते आहे. 

खासदारांना कोरोनाची बाधा.!
नगर जिल्ह्यातील उत्तरेतील शिर्डीचे खासदार यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर घरात एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांची पत्नी व मुलाचा देखील अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे, त्यांच्या संपर्कात असणार्‍यांमध्ये एकच खळबळ उडली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी खासदार महोदय यांनी एका कोविड सेंटरला भेट दिली होती. त्यानंतर ते फारसे बाहेर कोठे दिसून आले नाही. त्यांना त्रास होऊ लागला असता ते स्वत:हून घरी थांबले होते. त्यामुळे, त्यांच्यामुळे बाहेर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यता फार कमी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांच्यावर आता उपचार सुरू करण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या सानिध्यात जे कोणी आले होते. त्यांनी स्वत:हून होमक्वारंटाईन होऊन घ्यावे आणि त्रास होत असेल तर तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.