धक्कादायक.! धनाच्या लालसेपोटीच त्या एकाने चौघांना भोकसले.! हा तर ड्रॉपचा प्रकार.! आरोपी पोलिसांच्या ताब्यात.!
सार्वभौम (अहमदनगर) :
श्रीगोंदा तालुक्यात पैशांच्या अमिषापोटी आणि धोकेबाजीमुळे चौघांची हत्या करण्यात आली होती. त्याचे रहस्य आता ऊलगडले असून याप्रकरणी जळगाव पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तर खोदकाम करताना मिळालेले सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून जळगावकरांना लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या सर्व प्रकारातून जळगाव येथून आलेल्या एका व्यक्तींने नगरच्या चौघांची हत्या केल्याचे समोर आले आहे. तर याबाबत जळगाव पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, काही संशयितांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांना नगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर आता नगर पोलिसांचा तपास सुरू झाला असून यात कोणी स्थानिक व्यक्ती आहेत का? या ड्रॉपमध्ये मध्यस्ती कोण होते, या संशयितांपैकी हे खून नेमके कोणी-कोणी केले आहेत. याबाबत सविस्ता माहिती नगर पोलिसांकडून मिळणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरूवार दि. 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथे सोने खरेदीच्या कारणाहून दोन गटात तुंबळ हाणामार्या झाल्या होत्या. यात नातीक कुंजीलाल चव्हाण (वय 40), श्रीधर कुंजीलाल चव्हाण (वय 35), नागेश कुंजीलाल चव्हाण (वय 16), लिंब्या हब्या काळे (वय 22, सर्व रा. सुरेगाव ता. श्रीगोंदा. जि. अ.नगर) अशा चौघांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हा प्रकार कशामुळे घडला याचा उलगडा होणे कठिण झाला होता. या खुनाच्या प्रकारानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. हा एकंदर मयत व्यक्तींच्या गुन्हेगारी इतिहासचा वेध घेतला असता हा प्रकार एकतर वाटाघाटी किंवा ड्रॉप सारख्या गुन्ह्यातून घडला असावा अशी शंका होतीच. याबाबत रोखठोक सार्वभौमच्या माध्यामातून एका गुन्हेगारी पद्धतीच्या मोडस प्रकारावर लिखान देखील करण्यात आले होते. अखेर झाले काय? तर तसाच प्रकार उघड झाला.
खरंतर नगरच्या दक्षिण भागात पुर्वी हवाला पद्धती प्रचंड प्रचलित होती. तर आता ती काही अंशी बंद झाली आहे. तर ड्रॉप पद्धत आजही रुढ आहे. नगर तालुका, पारनेर, श्रीगोंदा हे तालुके त्यासाठी फार माहिर आहेत. म्हणजे, एखाद्या त्रयस्त जातीच्या व्यक्तीने बड्या व्यक्तींशी संपर्क करायचा. त्यांना सांगायचे की, आमच्याकडे अर्धा किलो किंवा एक किलो सोने आहे. ते अगदी अल्प दारात तुम्ही खरेदी करा. त्यावेळी प्रथम दाखविताना कमी दाखवायचे आणि नंतर व्यवहाराला बसायचे. जेव्हा कधी यांचे भेटणे होते, व्यावहार होतो, तेव्हा जे पैसे घेऊन आलेले बडे लोक असतात त्यांना हे लुटारु आपले खरे रुप दाखवितात. अशा वेळी जेथे कोठे भेट होणार असते ती जागा निर्जन व एकांत असते तेव्हा या लुटारुंची काही मानसे अजुबाजूला दबा धरुन बसलेले असतात ते अचानक येतात आणि त्यांना मारहाण करण्यास सुरूवात करतात. त्यामुळे, जीवाच्या आकांताने हे लोक पळ काढतात किंवा या लुटारूंना शरण जातात. अखेर सोबत जी रक्कम आणलेली असते ती देण्यापलिकडे पर्याय नसतो. ना पैसा ना सोने! मांड्या पोटर्या सुजवून हे धनाचे लालची लोक माघारी जातात. आता पोलीस ठाण्यात जावे तर हेच बेकायदा काम करण्यासाठी आलेले असतात आणि त्यात पोलीस ठाण्याचा ससेमिरा व चौकशी यात बेजार होण्यापेक्षा झाकली मुठ सव्वा लाखाची. त्यामुळे, असे अनेक ड्रॉप झाकले जातात. त्यातलाच हा एक प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
यात सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंद्यातील एका व्यक्तीने जळगावच्या एका व्यक्तीस सांगितले की, आमच्याकडे खोदकाम करताना जे सोने सापडले ते अल्पदारात द्यायचे आहे. त्यानंतर दोघांनी एकमेकांची खात्री करुन घेतली व ठरल्याप्रमाणे जळगावहून चार ते पाच जणांची टिम सोन्याच्या अमिषापोटी श्रीगोंद्यातील सुरेगाव परिसरात दाखल झाली. पैसे द्या आणि सोने घ्या अशी चर्चा सुरू असताना दोघांमध्ये संशयाचे वलय कायम होते. मात्र, मयत व्यक्ती यांनी पैशाची बॅग घेतल्यानंतर थेट हल्लाबोल केला. यावेळी याच परिसरात काही अन्य व्यक्ती देखील दबा धरुन बसले होते. त्यांनी देखील तेथे येत जळगावच्या व्यक्तींवर हल्ला केला. दोन्ही गट एकमेकांना भिडलेले असताना जळगावच्या एका व्यक्तीने स्वत:चा बचाव करताना एकावर चाकूने वार केला आणि तो पहिलाच व्यक्ती जमिनीवर कोसळला. आता, कोणी कितीही गुन्हेगार असेल तरी नाते हे नाते असते. एक भावास भोकसल्याचे पाहताच दुसरा समोर झाला. त्याला देखील भोकसण्यात आले. तर दोघांना रक्तबंबाळ आवस्थेत पाहून तिसर्याने रौद्ररूप धारण केले. मात्र, त्याच्यावर देखील चाकुचे वार झाले. अशा बेसावध आणि सावध भूमिकेत असणार्या दोन्ही गटांमध्ये जळगावच्या एका व्यक्तीने चक्क चौघांचे खून केले. तर जे हल्ला करण्यासाठी अन्य लोक तेथे आले होते. त्यांनी देखील हा प्रकार पाहिल्यानंतर घटनास्थळाहून पळ काढला. दरम्यान आपापली पैशाची बॅग घेऊन हे लालची लोक जळगावकडे रवाना झाले. मात्र, म्हणतात ना.! गुन्हेगार चाहे कितना भी चालाख क्यों ना हो.! ओ कोई ना कोई सुराग जरूर छोड जाता हैं.! येथे अगदी तसेच झाले.
दरम्यान ही घटना घडल्यानंतर येथे चार व्यक्ती मयत झाल्या होत्या. त्यामुळे, जो तेथे घटनास्थळी होता. त्याच्या पायाखलची जमीन सरकली होती. त्यानंतर एका व्यक्तीने त्याच्या नात्यातले तीन मृतदेह चक्क गाडीवर टाकून आपापल्या घराकडे नेले. तर एक तेथेच पडलेला होता. तर हा प्रकार पोलिसांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक, पोलीस उपाधिक्षक, एलसीबी टिम, स्थानिक पोलीस यांनी तर्क वितर्क लावत गुन्ह्याची उकल करण्यासाठी मोठी कसरत सुरू केली. मात्र, सुदैवाने त्याने घटनास्थळी एक एटीएम मिळून आले. त्याची चौकशी केली असता ते जळगावचे असल्याचे समोर आले होते. तर दुसरीकडे बेलवंडी पोलिस ठाण्यात मयत नातेवाईकांच्या सांगण्याहून काही संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, कानून के हाथ लंबे होते हैं.! या म्हणीप्रमाणे नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेपासून ते थेट जळगाव असा प्रवास सुरू झाला. जळगावच्या पोलिसांनी नगरच्या पोलिसांना मदत केली आणि काही संशयितांना त्यांनी तेथे ताब्यात घेतले. त्यानंतर हा प्रकार बहुतांशी उघड झाला. तर आता यात आणखी सखोल तपास करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून उद्या सविस्तर माहिती आणि आरोपींच्या नावांसह कृत्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यात अशा पद्धतीने ड्रॉप होण्याचे प्रमाण फार आहे. हे काही लुटारू चोर्या दरोडे टाकतात, तोच माल ड्रॉपसाठी वापरतात आणि भल्याभल्यांना आपल्या जाळ्यात गुंतवतात. त्यामुळे पोलिसांनी अनेकदा व्यापारी, सराफ आणि उद्योजक यांना आवाहन केले आहे. की, अशा प्रकारच्या अमिषाला आपण बळी पडू नये. ते यापुर्वी जे सोने घेण्यासाठी येतात त्यांना देखील आरोपी करण्याचा निर्णय झाला होता. तर नगर तालुक्यात एकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र, जर तक्रारदारावर गुन्हा दाखल होत असेल तर गुन्ह्याच्या भितीपोटी तो तक्रार देत नाही. त्याचा फायदा गुन्हेगारांना जास्त होता. त्यामुळे पोलिसांनी तो प्रकार पुन्हा बंद करुन अशा लुटारुंना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आता प्रशासन पुन्हा आवाहन करीत आहे की, अशा प्रकारच्या अमिषाला बळी पडू नका. धनाच्या लालसेपोटी जीव धोक्यात घालणे किंवा एखाद्याची जीव घेणे हा गुन्हा आहे.
- एस. एस. एक्सप्रेस