अकोल्यात कोरोनाचा 10 वा...! तर संगमनेरात 21 बाधित.! धुमाळवाडीत आख्खं कुटुंब पॉझिटीव्ह.! संख्या घटली.!

सार्वभौम (संगमनेर) :- 

                     अकोले तालुक्यात कोरोनाचे आज पुन्हा नव्याने रुग्ण मिळून आले आहेत. तर एकाच कुटुंबावर कोरोनाने अटॅक केल्याचा धक्कादायक प्रकार पहायला मिळाला. त्यामुळे, धुमाळवाडी परिसरासह अकोले शहरात एकच खळबळ उडली. तर शेकईवाडी येथे एका चांगल्या घरातील व्यक्ती कोरोनामुळे मयत झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करा अशा सुचना आरोग्य व महसूल प्रशासनाने दिल्या आहेत. या पलिकडे संगमनेरात काल 39 रुग्णांची भर पडली होती. तर आज बाधितांची संख्या कमी झाल्याचा पहावयास मिळाली आहे. म्हणजे येथे दिवसाआड कोरोनाचा विस्पोट होताना दिसतो आहे. मात्र, काहीही झाले तरी मागिल काही दिवसांच्या तुलनेत आता संगमनेरात कोरोनाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. मात्र, हे प्रमाण अधिक कमी करायचे असेल तर नागरिकांनी थोडी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. तर प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा कभी खुशी कभी गम असे वातावरण येथे कायम पहावयास मिळेल.

                       संगमनेर तालुक्यात आज 21 रुग्णांची भर पडली आहे. त्यात गोल्डन सिटी येथे 45 व  47 वर्षीय पुुरुष, साळीवाडा येथे 55 व 70 वर्षीय महिला, गोल्डन सिटी येथे दुसरा 45 वर्षीय पुुरुष तर 20 वर्षीय तरुण, 18 वर्षीय तरुणी, कृष्णानगर येथे 49 वर्षीय पुुरुष, घुलेवाडी येथे 54 वर्षीय पुुरुष, खंडोबा गल्ली येथे 14 वर्षीय बालिका, 58 वर्षीय पुुरुष, 52 वर्षीय महिला, मालदाड रोड येथे 22 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे 57 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला येथे 45 वर्षीय पुुरुष, घास बाजार येथे 64 वर्षीय महिला, उपासणी गल्ली येथे 74 वर्षीय महिला, रंगार गल्ली येथे 35 वर्षीय पुुरुष, रायतेवाडी येथे 40 वर्षीय पुुरुष व बडोदा बँक कॉलनीत 35 वर्षीय महिला अशा 21 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज संगमनेरात कोरोना बाधितांची संख्या अटोक्यात असल्याचे दिसते आहे.

तर अकोले तालुक्यात आज महालक्ष्मी कॉलनीत 36 वर्षीय पुरुष, तर धुमाळवाडी येथे 54 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय पुरूष, 48 वर्षीय महीला, 39 वर्षीय महीला, 19 वर्षीय युवती, 17 वर्षीय युवक आणि 06 वर्षाचे बालक अशा 08 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात आजवर बाधितांची संख्या 382 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी 245 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून आजवर 10 व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर, सध्या 127 रुग्णांवर उपचार सुरु आहे. या पलिकडे आज अकोले शहराच्या लागत असणार्‍या शेकईवाडी येथे एका 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यांच्यावर संगमनेर येथे उपचार सुरू होते. मात्र, त्यांना जास्तच त्रास होऊ लागला, मात्र, आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.