अकोले तालुक्यातील कोतुळ परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार.! ती पाच महिन्याची गरोदर.! पंधरा दिवसात तिसरा गुन्हा.!


सार्वभौम (अकोले) :

                          अकोले तालुक्यात ऑगस्ट महिन्यात अल्पयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना आता मोठ्या प्रमाणावर उघड होऊ लागल्या आहेत. तर महिला अत्याचार आणि प्रेमाचे पितळ उघडे झाल्यानंतर देखील बलात्कारचे गुन्हे देखील दाखल होण्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे. तर आता खिरविरे, ब्राम्हणवाडा या घटनेनंतर पुन्हा कोतुळ व आंभोळ परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घडना उघड झाली आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यात सचिन बाळु भवारी (रा. आंभोळ) यास आरोपी करण्यात आले आहे. हा आरोपी अद्याप पसार असून त्याचा शोध अकोले पोलीस घेत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलगी ही 17 वर्षाची असून तिच्यावील मायेचे छत्र हरपलेले आहे. तरी ही बालिका आपली गुजराण करण्यासाठी शेळ्या वळण्याचे काम करीत होती. दरम्यान तिच्या  एकटेपणाचा फायदा घेत सचिन हा नेहमी तिच्या पाठोपाठ जात होता. कालांतराने त्याने तिच्याशी लगट केली. तर एक एकमेकांना चांगलेच ओळखत असल्यामुळे त्याने तिला काही अमिष दाखविले आणि तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार येथेच थांबला नाही तर पीडित तरुणीला धमकावत त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. हा प्रकार जर तू घरी कोणाला सांगशील तर तुझ्याकडे पाहुन घेईल असे म्हणत त्याने धमकी दिली. 

दरम्यान आता पाच ते सहा महिने झाल्यानंतर पीडित मुलीचे पोट दुखू लागल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, ही मुलगी अल्पवयातच गरोदर आहे. त्यामुळे तिच्या नातेवाईकांच्या भुवया उंचावल्या. हा प्रकार कसा घडला अशी विचारणा केली असता तिने सचिन भवारी याचा पराक्रम उघडा पाडला. त्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. सध्या पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस ठाण्याचे एकमेव अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमने पुढील तपास करीत आहेत.


आता एक महत्वाची गोष्ट अशी की, अकोले पोलीस ठाण्याचा सध्याचा सीआर 495 पेक्षा पुढे गेला आहे. येथे गुन्हे दाखल होतात आणि तरी दोन अधिकारी असून देखील ते तपास करतात, एव्हाना आरोपी देखील अटक करतात. त्यामुळे वरिष्ठांना असे वाटत असेल की सर्व काही अलबेले सुरू आहे. मात्र, केवळ एक अधिकार्‍यास घेऊन पोलीस ठाणे चालविणे किती कसरतीचे आहे. हे ज्या-त्या अधिकार्‍याला माहिती असते. त्यामुळे, येथे कायदा व सुुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही. हे त्यांचे यश आहे. मात्र, दिवाणी दावे, वैयक्तींक वाद, जमिनीचे वाद यातून होणार्‍या मारामार्‍या आणि अनैतिकतेतून होणारे अत्याचार हे गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण आता येथे वाढत आहे. त्यामुळे, त्यांचा तपास करणे अनिवार्य आहे. म्हणून येथे किमान एक सहायक पोलीस निरीक्षक व एक पोलीस उपनिरीक्षक यांची गरज आहे. मात्र, दुर्दैवाने येथे अप्पर पोलीस अधिक्षक का लक्ष घालत नाही. याबाबत अनेकजण अनभिज्ञ आहे. तर स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी देखील पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधणे गरजेचे झाले आहेे. अन्यथा दोन अधिकारी आणि 495 जा सीआर हे कोणत्याच पद्धतीने गणित जुळताना दिसत नाही.