जुन्या वादातून चौघा तरुणांना भोकसले.! एकाच वेळी चार मृतदेह.! असे असते यांचे गुन्हेगारी विश्व.!
सार्वभौम (श्रीगोंदा) : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथे जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामार्या झाल्या होत्या. यात चौघांची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. ही घटना गुरूवार दि. 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी श्रींगोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातीक कुंजीलाल चव्हाण (वय 40), श्रीधर कुंजीलाल चव्हाण (वय 35), नागेश कुंजीलाल चव्हाण (वय 16), लिंब्या हब्या काळे (वय 22, सर्व रा. सुरेगाव ता. श्रीगोंदा. जि. अ.नगर) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. यातील तीघे सख्खे भाऊ असून एक जवळचाच व्यक्ती आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की. नगर तालुका, श्रीगोंदा, पारनेर, बेलवंडी, पाथर्डी आणि नेवासा येथे होणारे दरोडे आणि रस्तालुट यात बहुतांशी एका विशिष्ट सामाजाचे लोक आरोपी असतात. यांच्यात एकतर वाद होत नाहीत आणि झाले तर त्याला पराकोटीची किनार असते. तर हे लोक लुटालुट करताना शक्यतो ऐवज मिळविण्याच्या हेतून दरोडे किवा रस्तालुट करतात. मात्र, जर कोणाचा विरोध झालाच तर त्याच्यावर प्राणघातक हल्ला करुन जखमी करतात आणि पसार होतात. त्यामुळे, नगर जिल्ह्यात पुणे तालुक्याच्या सरासरीत दोन नंबरचे दरोडे पडतात. मात्र, बहुतांशी गुन्ह्यात तुरळक खून होतात. तर जे होतात त्यांची प्रवृत्ती विकृत आणि कुख्यात गुन्हेगारी मानसिकतेचीच असते अशी गुन्हेगारी मोडस आहे. तर ही लोक फक्त पोलीस अधिकार्यांना घाबरतात, बाकी यांच्यात वेगळीच गुन्हेगारी वृत्ती असते. तर फारच अंगावर आले तर ते पोलिसांवर देखील जीवघेणे हल्ले करतात हे आपण शेवगाव पोलीस कर्मचारी कोलते प्रकरणात तसेच सोनईच्या अपहरण प्रकरणात आणि लोणी येथे पोलिसांवर झालेल्या गोळीबार प्रकरणात पाहिले आहे. अशी अनेक उदा. आहेत. तर नगर जिल्ह्यात फार चोर्या आणि दरोडे झाले. यात खून आणि दरोडे असे फार गुन्हे नाहीत. मात्र, काही ठिकाणी मात्र, आरोपींनी आपल्या कुख्यात गुन्हेगारीचे प्रमाण सिद्ध करुन दाखविले आहे. कारण, नगर शहरात विनायक नगर येथे दोन जणांची हत्या करण्यात आली होती. तर शेवगाव तालुक्यात हरवणे कुटुंबात चौघांना जागीच ठार मारले होते. अशा प्रकारचे गुन्हे पारनेर, नगर तालुका आणि पाथर्डी तालुक्यात अनेकवेळा पहायला मिळाले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जे 399 चे गुन्हे दाखल झाले. त्यामुळे, एकीकडे रस्तालुट थांबली तर दरोड्यांना आळा बसल्याचे पहावयास मिळत आहे.
अकोले तालुक्यातील कारखाना रोड परीसरातील शिवसेना नेते शिवाजीराव शेटे यांचे वडील स्व. विठ्ठल सखाराम शेटे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, 1 मुलगी, तीन सुना, नातवंडे, असा मोठा परीवार आहे.
दरम्यान, या चौघांच्या हत्येमागे असेच काही कारण तर नसेल ना की, यांच्यात यापुर्वी काही अर्थपुर्ण वाटाघाटीचे वाद असावेत किंवा वेगवेगळ्या गुन्हेगारी विश्वामुळे एकमेकांची नावे घेणे, एकमेकांच्या खबरी फोडणे, वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये नावे घेणे असा अंदाज आता पोलीस लावत आहे. अर्थात यापेक्षा इतक्या पराकोटीचा वाद त्यांच्यात होऊ शकत नाही. तर यात दुर्दैव असे की, एकाच कुटुंबातील व्यक्ती एकाच वेळी गुन्हेगारी विश्वात माहिर होतात आणि बघता-बघता नात्यानात्यातच एक टोळी होऊन जाते. तर अशा एकाच कुटुंबाच्या अनेक टोळ्या एलसीबी आणि नगर तालुका पोलिसांनी यापुर्वी पकडल्या आहेत. जर सगळे पुरुष पोलीस ठाण्यात गेले तर यांच्या कुटुंबातील महिला आणि काही वकील ठरलेले असतात. ते एक, दोन किंवा तीन महिन्यात सर्व व्यक्तींना बाहेर काढतात. या दरम्यान त्यांना पोलीस कोठडी मिळते (पीसीआर) मात्र, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची रिकवरी होत नाही. काही वेळात तर खाकीचेच हात यात रंगून जातात. मात्र, यापुर्वी अनेक गुन्ह्यांमध्ये मोठमोठी रिकवरी पोलिसांनी प्राप्त केली आहे. तर काहींमध्ये आरोपी मिळतात मात्र, मुद्देमाल मिळत नाही. तर हा मोठा मुद्देमाला वाटून घेताना देखील यांच्यामध्ये फार टोकाची भांडणे होतात. त्यामुळे, कोणी स्वत:ची नवी टोळी उभी करते तर कोणी थेट रक्तरंजीत खेळ खेळण्यास तयार होतात. असेच अनेकदा घडले आहे.
आता हे जे आरोपी आहेत यांनी आरोपींच्या पालावर जाऊन दंगा केला आहे. तर विसापूर फाट्यावर देखील खून केले आहेत. आरोपी हे नगर तालुक्यातील राळेगण सिद्धी येथील असल्याचे बोलले जात आहे. यांच्यात इतके वाद का झाले, त्यांच्याकडे कोण-कोणती हत्यारे होती, या गुन्ह्यात कोणाकोणाचा सामावेश आहे. या गुन्ह्याचे कारण काय होते. ही सर्व माहिती अगदी काही तासानंतर समोर येईल. नगर अशा प्रकारचे गुन्हे उघड करण्यात नगर पोलीस माहिर आहे. तर एलसीबीचे काही जाणकार कर्मचारी हे या समाजाच्या आरोपींच्या गुन्हेगारी मोडस प्रणाली आणि त्यांचे आड्डे यांच्याबाबत वाकीब आहेत. त्यामुळे, या गुन्ह्याता तपास लवकरच लागले. तर रात्री उशिरा काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता, मात्र पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.
- एस. एस. एक्सप्रेस