गुड न्युज, संख्या घटली रे भो..! अकोल्यात सात तर संगमनेरात 13 रुग्ण.! भय इथले संपू लागले.!

सार्वभौम (अकोले) : 

                    संगमनेरमध्ये कोरोनाची घोडदौड आजही पाहायला मिळाली. मात्र, तुलनात्मक येथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. आज केवळ 13 रुग्ण कोरोना पीडित मिळून आले आहे. तर अकोले तालुक्यात देखील कोरोनाची संख्या घटताना दिसत आहे. मात्र, कालांतराने कोविड सेंटर उभे राहिल्यानंतर स्वॅबची संख्या वाढेल आणि कोरोची आकडेवारी पुन्हा झपाट्याने वाढताना दिसेल. आज अकोल्यात 7 व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. तर संगमनेर मध्ये नव्याने 13 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने येथील फार समाधान वाटू लागले आहे. त्यात शहरातील सहा तर तालुक्यातील सात रुग्ण आढळून आले आहे. 

त्यात संगमनेर शहरातील अभिनवनगर येथील 33 वर्षीय पुरुष तर पोफळेमळा येथे 22 वर्षीय महिला तर साळीवाडा येथे 17 वर्षीय दोन युवकांना तर घोडेकरमळा येथे 34 वर्षीय पुरुष तर 30 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर तालुक्यातील वडगावपान येथे 65 वर्षीय पुरुषास तर साकुर येथे 47 वर्षीय पुरुष तर कसारा दुमाला येथे 52 वर्षीय पुरुष तर घुलेवाडी येथे 50 वर्षीय पुरुष तर कुरकुटवाडी येथे 21 वर्षीय महिला तर 65 वर्षीय पुरुषास व राजापूर येथे 39 वर्षीय पुरुषास कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे शहरासह तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या 1 हजार 323 वर जाऊन पोहोचली आहे.

आज शुक्रवारी खानापुर कोविड सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या 45 व्यक्तीच्या रॅपिड अँन्टीजन टेस्टमधील अहवालात तालुक्यातील लहीत येथे 73 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय महीला, इंदोरी येथे 45 वर्षीय महीला, 22 वर्षीय महीला, चास येथे 25 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 18 वर्षीय युवती अशा सात व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या 358  झाली आहे. त्यापैकी 245 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे तर 9 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 104 रुग्णांवर उपचार सुरु आहे. त्यापैकी 47 व्यक्ती खानापुर कोविड सेंटर येथे तर 57 व्यक्ती खाजगी रूग्णालयात व जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहे. तालुक्यातील बाधितांच्या मृत्यूचा दर 2.51 टक्के आहे तर बरे होण्याचे प्रमाण 70.20 टक्के आहे.

दरम्यान जिल्ह्यात रोजी मोठी आकडेवारी समोर येत असताना अकोले व संगमनेर तालुक्यातील कोरोनाची संख्या एका दिवस मोठी तर एक दिवस कमी अशी होताना दिसत आहे. मात्र, सरासरी हे प्रमाण फार कमी होताना दिसत आहे. ते टेस्टींगसाठी नेलेल्या स्वॅबचे अहवाल दाखल आजकाल मोठ्या प्रमाणावर निगेटीव्ह येऊ लागले आहे. हेच एक मोठे समाधान आहे. कारण, गेल्या काही दिवसांपुर्वी जो तेथे जातो, त्याच्या काळजाचा ठोक वाढलेला राहतो आणि श्वास रोखला जातो. आपण पॉझिटीव्ह येतो की काय.! या भितीने निम्मा बीपी आधीच हाय झालेला असतो. त्यामुळे, जर यदा कदाचित कोणत्याही प्रकारचे सिमटन्स नसले तरी जर रिपोर्ट पॉझिटीव्ह आलाच. तर मात्र, सगळे आरोग्य अस्थिर होऊन जाते. आजार वेगळा आणि लोकांची पाण्याचा दृष्टीकोणा तर समाजाकडून मिळणारी अस्पृश्यतेप्रमाणे वागणून यातच माणूस पुर्णत: खचून जातो. त्यामुळे, आता जितके अहवाल निगेटीव्ह येतील तितकी कोरोनाची भिती कमी होण्यास मदत होणार आहे. तर अशा अहवालानंतर जे लोक भयाने मरतात त्यांचे देखील प्रमाण कमी होणार आहे.

           तर अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार ६०९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७९.३१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल गुरुवारी सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ७२ इतकी झाली आहे. तसेच जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १८४, अँटीजेन चाचणीत २७९ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०८ रुग्ण बाधीत आढळले आहेत. तर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३४, राहाता ०१, पाथर्डी ०३,  नगर ग्रामीण ३२, कॅन्टोन्मेंट ०३, नेवासा ०२, पारनेर ०४, अकोले ०१, राहुरी ०१, कोपरगाव ०१, कर्जत ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत आज २७९ जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा ४४, संगमनेर २६, राहाता १३, पाथर्डी १४, श्रीरामपुर १४, कॅंटोन्मेंट १६, नेवासा २८, श्रीगोंदा २३, पारनेर १४, अकोले ०७, राहुरी २२, शेवगाव ०७, कोपरगाव १४, जामखेड ३१ आणि कर्जत ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे. तसेच खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १०८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ६७, संगमनेर ०५, राहाता ०३,  नगर ग्रामीण ०४,  श्रीरामपुर ०४, कॅंटोन्मेंट ०२, नेवासा ०४, श्रीगोंदा ०२, पारनेर ०१,अकोले ०५, राहुरी ०१, कोपरगांव ०२, जामखेड ०६ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज ४५६ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला आहे. त्यात मनपा २२४, संगमनेर २०, राहाता १३, पाथर्डी १४, नगर ग्रा.२३, श्रीरामपूर ०९, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २८, श्रीगोंदा २०, पारनेर ०२, अकोले १४, राहुरी १०, शेवगाव २५, कोपरगाव ०८, जामखेड १०, कर्जत २५, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे बरे झालेले एकूण रुग्ण:१२ हजार ६०९ तर उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या ३ हजार ७२ इतकी असून मृत्यू संख्या २१८ इतकी आहे. तर आजवर एकूण रूग्ण संख्या १५ हजार ८९९ इतकी नोंदविली गेली आहे.