कोरोनाचा कहर.! अकोल्यात 25 तर संगमनेरात 38 रुग्णांची भर.! कुटुंबच्या-कुटुंब बाधित.!


सार्वभौम (अकोले/संगमनेर) : अकोले तालुक्यात आणि संगमनेरात कोरोनाने बाकी आज थैमान घातले आहे. अकोल्यात आज एकाच दिवशी 25 रुग्ण तर संगमनेरात 38 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात आज कोरोनाचा उच्चांक गाठला आहे. ही आकडेवारी दोन्ही तालुक्यातील नागरिकांना आत्मचिंतन करण्यास लावणारी आहे. कारण, हा सर्व संसर्ग एकामेकांच्या संपर्कातून होत असून केवळ नियमांचे योग्य पालन केले जात नाही. त्यामुळे हा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे रोज रुग्णांची संख्या वाढत आहे. हे दु:खद असले तरी त्यामुळे कोरोनाचा आवर बसणार आहे. कारण जितके बाधित मिळून येतील तितका प्रादुर्भाव कमी होणार आहे. मात्र, प्रत्येकाने सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. 

                           

आज अकोले तालुक्यात कोरोनाने चांगलाच हैदोस घातला आहे. त्यात शेकईवाडी येथील 19 वर्षीय तरुणी, 39 वर्षीय महीला, 50  वर्षीय पुरुष, नाईकवाडी वाड्यात 36  वर्षीय महीला, पेट्रोल पंपामागील 44  वर्षीय महीला, 21 वर्षीय महीला, राजमाता कॉलणीतील 14  वर्षीय मुलगी, हिवरगाव आंबरे येथे 40 वर्षीय पुरुष,21 वर्षीय तरुण, 18 वर्षीय तरुण तर 24 वर्षीय युवक व ब्राम्हणवाडा येथील 40 व 55 वर्षीय पुरुष, 77 वर्षीय महिला, इंदोरी येथे 56 वर्षीय पुरुष, कळस येथे 25 वर्षीय तरुण, 44 वर्षीय महीला, लहीत येथे 32 वर्षीय पुरुष, मेहंदुरी येथे 52 वर्षीय पुरुष, चास येथे 44 वर्षीय पुरुष, तर नवलेवाडी येथे अकोले कॉलेज जवळ 49 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय तरुण, 70  वर्षीय महीला, 46 वर्षीय महीला, 23 वर्षीय महीला अशा 25 व्यक्ती कोरोना बाधित मिळून आल्या आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या आता 348 वर गेेली आहे. तर यात दुर्दैव असे की कोविड योद्धे डॉक्टर साहेब यांचे कुटुंब बाधित झाले आहे.

तर संगमनेर तालुक्यात गणेशनगर येथे 24 वर्षींय महिला, 23 वर्षीय तरुण, घासबाजार येथे 82 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे 17 वर्षीय तरूण, 40 वर्षीय महिला, 23 वर्षीय तरुणी, प्रतापपुर येथे 66 वर्षीय पुरुष, आश्वी बु येथे 50 वर्षीय पुरुष, राजापूर येथे 78 वर्षीय पुरुष, श्रीरामनगर येथे 70 वर्षीय महिला व 47 वर्षीय महिला, गोल्डन सिटी येथे 53 वर्षीय पुरुष, शिंदोडी 30 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी 41 वर्षीय पुरुष, बोटा येथे 1 वर्षाचा बालक, काठेमळा 58 वर्षीय पुरुष व 6 वर्षीय बालिका तर 39 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरुण, कर्‍हे येथे 38 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय तरुणी, 13 वर्षीय तरुण, 19 वर्षीय तरुणी, 21 वर्षीय तरुण, 65 वर्षीय महिला, वेल्हाळे येथे 80 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, 9 वर्षीय बालक, कुरमुटवाडी 45 वर्षीय पुरुष, घुलेवाडी 12 वर्षीय मुलगा, स्वामी समर्थ नगर 54 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय तरुण, 49 वर्षीय महिला, खांबे येथे 25 वर्षीय तरुणी, वेल्हाळे येथे 3 वर्षीय बालक तर स्वामी समर्थ नगर येथे 25 वर्षीय तरुणी अशा 38 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.


तर अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार आज 506 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने 12 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 153 इतकी झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता 79.25 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल बुधवारी सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 417 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2 हजार 988 इतकी झाली आहे. तर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 71, अँटीजेन चाचणीत 245 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 101 रुग्ण बाधीत मिळून आले आहेत. तर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 46, संगमनेर 03, नगर ग्रामीण 04, कॅन्टोन्मेंट 03, पारनेर 03, अकोले 08, जामखेड 01, कर्जत 01 आणि मिलीटरी ह़ॉस्पिटल 02 अशा रुग्णांचा समावेश आहे. तसेच अँटीजेन चाचणीत आज 245  जण बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये, मनपा 08, संगमनेर 08, राहाता 23, पाथर्डी 17, नगर ग्रामीण 28, श्रीरामपुर 18, कँटोन्मेंट 09, नेवासा 16, श्रीगोंदा 25, पारनेर 15, अकोले 12, राहुरी 13, शेवगाव 12, कोपरगाव 18, जामखेड 21 आणि कर्जत 02 अशा रुग्णांचा समावेश आहे. तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 101 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 49, संगमनेर 18, राहाता 02, नगर ग्रामीण 12,  श्रीरामपुर 02, पारनेर 04, अकोले 05, शेवगाव 01, कोपरगांव 04 आणि जामखेड 04 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 506 रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यात मनपा 191, संगमनेर 36, राहाता 28, पाथर्डी 20, नगर ग्रामीण 40, श्रीरामपूर 24, कॅन्टोन्मेंट 06, नेवासा 24, श्रीगोंदा 18, पारनेर 25, अकोले 20, राहुरी 07, शेवगाव 28, कोपरगाव 07,जामखेड 24, कर्जत 05, आणि मिलिटरी हॉस्पिटल 03 अशा रुग्णांचा समावेश आहे. तर आजवर बरे झालेली रुग्ण संख्या 12 हजार 153 इतकी असून उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या 2 हजार 988 इतकी आहे तर आजवर 193 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत एकूण रूग्ण संख्या 15 हजार 334 इतकी झाली आहे.

      तर अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये कोविड बाधित रुग्णांकडून उपचारा पोटी आकारण्यात येणाऱ्या बिलाची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास या बिलाची प्रथमतः नेमणूक करण्यात आलेल्या भरारी पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच  तपासणी अंती निश्चित होणारी बिलाची रक्कम संबंधित रुग्णालयास देण्यात यावी, असे आदेश आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यातील रुग्णालयांकडून कोविड बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणारे शुल्क व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत करण्यात येणारे उपचार व योजनेचा लाभ इत्यादी बाबतची तपासणी करणे कामी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये भरारी पथक स्थापन करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील काही रुग्णालयांमध्ये कोविड बाधीत रुग्णांकडून बिलापोटी शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादेपेक्षा जास्त दर आकारले  जात असल्या बाबतच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत होत्या. त्यामुळे कोविड बाधित रुग्णांचे रुपये 1 लाख पेक्षा जास्त रकमेच्या बिलांची भरारी पथकाद्वारे तपासणी करणे आवश्यक असल्याने हे आदेश जारी करण्यात आले आहेत. साथरोग अधिनियम 1897 अन्वय निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्राप्त अधिका रानुसार हे आदेश जारी करण्यात आले. भरारी पथक बिलांची तपासणी करून तपासणी अहवाल तहसीलदार तथा घटना व्यवस्थापन यांचेकडे सादर करतील. तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक यांनी भरारी पथकाने द्वारे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा वेळोवेळी आढावा घेऊन अहवाल दर सोमवारी या कार्यालयास सादर करावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.