अब की बार.! कोरोना आठसौ के पार! एकाच दिवशी संगमनेरात कोरोनाचे 24 रुग्ण तर अकोल्यात 12 रुग्णांची भर!


- सुशांत पावसे
संगमनेर (सार्वभौम) :- 
                 संगमनेरमध्ये आज पुन्हा नव्याने 24 रुग्ण कोरोना बाधीत आढळून आले आहे. आज दुपारी मिळालेल्या अहवालात 12 तर सायंकाळी मिळालेल्या अहवालात 12 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 9 रुग्ण कोरोनाबाधीत आहे. शहरातील संजयगांधीनगर येथे 20 वर्षीय महिला, 8 वर्षीय बलिकेला तर 55 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर विद्यानगर येथे 17 व 16 वर्षीय युवकाला तर 40 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. ताजने मळा येथे एक कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आला आहे. तर नेहरूचौक येथे 66 वर्षीय वयोवृद्धाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर तालुक्यातील आज 13 रुग्ण आढळुन आले आहे.
             यामध्ये कोल्हेवाडी येथे 30वर्षीय पुरुष तर गुंजाळवाडी येथे 21 वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. निमगाव पागा येथे 33 वर्षीय पुरुष तर कसारा दुमाला येथे 71 वर्षीय वयोवृद्धाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर सुकेवाडी 57 वर्षीय महिला तर चंदनापुरी येथे 65वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर घुलेवाडी येथे 20 व 24 वर्षीय युवकाला व 70 वर्षीय इसमाला आणि 29 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. पठारभागावरील बोटा येथे 34 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे.तर खराडी येथे 70 व 40 वर्षीय पुरुषाला आणि 11 वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे कोरोनाबधितांचा आकडा आगेकूच होत आठ शतक पुर्ण केले आहे. शहरासह तालुक्यातील एकुण कोरोना बधितांचा आकडा 803 वर जाऊन पोहचला आहे.
                     
   तर अकोले तालुक्यात शहरातील सुभाषरोड येथील 55 व 57 वर्षीय महिला, 04 वर्षाची चिमुरडी तर तहसिल कचेरी जवळील कॉलणीत पोलीस कर्मचार्‍यांच्या कुटुंबात 50 वर्षीय,28 वर्षीय महीला 33 वर्षीय पुरुष 07 व 06 वर्षीय लहान बालके व 4 वर्षाच्या चिमुरडीला कोरोनाची बाधा झाली आहे. तर तालुक्यातील उंचखडक येथील 60 वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात शहरातील जुन्या स्टेटबँक रोडवरील मेडिकल चालविणार्‍या 35 वर्षीय तरुण व मवेशी धामणवन येथील रहिवासी व चाकण पुणे येथे कंपनीत असलेला 29 वर्षिय तरुण अशा 12 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे तालुक्यात रुग्णांची 148 वर गेली आहे.
- महेश जेजूरकर