वाळुतस्काराने केला शालेय मुलीवर अत्याचार.! बालिका गर्भवती.! खानापूर पुन्हा चर्चेत, आरोपी अटक.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यातील खानापूर येथे पुन्हा एका 17 वर्षीय शालेय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही मुलगी दिड महिन्याची गरोदर असून आरोपीने तिला पळवून नेल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर रामनाथ कृष्णा खडके (रा. खानापूर, ता. अकोले) यास पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयाने पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसरी धक्कादायक माहिती म्हणजे फक्त अकोले पोलीस ठाण्यात गेल्या वर्षभरात तब्बल 15 गुन्हे अत्याचाराचे दाखल झाले आहे. तर राजूर पोलीस ठाण्यात देखील सरासरी 8 ते 10 गुन्हे आहेत. त्यामुळे, तालुक्यात समाज जागृतीचे प्रमाण कमी असल्याचे दिसते आहे. तर केवळ अल्पवयीन अॅक्ट (पोस्को) माहित नसल्यामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाल्याचे पहावयास मिळत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी रामनाथ खडके हा मुळ खानापूर येथील रहिवासी आहे. त्याच्यावर आता अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यापुर्वी त्याच्यावर वाळु तस्कारीचा गुन्हा दाखल आहे. त्याने गर्दनीच्या एका 17 वर्षीय शालेय मुलीस प्रेमाच्या मोहात पाडले. मी तुझ्याशी लग्न करेल, तुला सुखात ठेवेल असे सांगून तिच्याशी लगट केली. मुलगी लहान असल्यामुळे तिला तिचे स्वहीत समजले नाही. खडके याने तिला विश्वासात घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. दरम्यान 26 ऑगस्ट रोजी खडके याने पीडित मुलीस पळवून नेत लग्न करण्याचे आमिष दाखविले व तिला खानापूर येथे ठेवले. या दरम्यान पीडित मुलीच्या घरच्यांनी तिचा शोध सुरू केला असता ती खडके याच्याकडे मिळून आली. त्यानंतर मुलीच्या पालकांनी तिला रुग्णालयात दाखल करुन तिची मेडिकल केली असता त्यात लक्षात आले की, ती दिड महिन्याची गरोदर आहे. त्यानंतर याप्रकरणी रामनाथ खडके याच्या विरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान गेल्या आठ महिन्यापुर्वी खानापूर परिसरात एका आदिवासी मुलीवर सामुहीक बलात्कार करुन तिला ठार करण्यात आले होते. त्यात पोलिसांनी तर पहिल्यांदा चोर सोडून सन्याशालाच फाशी देण्याचे प्रयत्न केला होता. मात्र, खरे नराधम पुढे आल्यानंतर पहिल्या आरोपीला निर्दोष म्हणून त्याचे 169 करण्यात आले. या घटनेच्या पाठोपाठ साखर कारखाण्यातील एका कर्मचार्याने याच परिसरात एका शेळ्या वळणार्या मुलीवर अत्याचार केला होता. ही दोन्ही प्रकरणे लोक विसरतात कोठे नाहीतर आता पुन्हा याच परिसरात या अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊन ती गर्भवती राहिली आहे. यात एक विशेष बाब म्हणजे अकोले पोलीस ठाण्याच्या हाद्दीत गेल्या वर्षभरात 15 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, केवळ येथे एका पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे व एक पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमणे हे दोनच अधिकारी असून ते अशा गंभीर गुन्ह्यांसह येथील कायदा व सुव्यवस्था राखत आहेत. त्यांचे खरोखर कौतुक केले पाहिजे.
-----------------------------------------
जाहिरात :- अकोले व संगमनेर येथे 90 लाख वाचकांच्या लोकप्रिय रोखठोक सार्वभौमसाठी प्रतिनिधी पाहिजे आहेत. संपर्क - 8888782010, 8208533006