अकोल्यात दिल्लीच्या टिमचे कोरोना सर्वेक्षण.! आज 21 रूग्ण तर संगमनेरात 16 रुग्णांची भर.!

सार्वभौम (संगमनेर/अकोले) :- 

                    अकोले तालुक्यात आज 21 तर संगमनेर तालुक्यात 16 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे, आनंदाची बाब अशी की, दोन्ही तालुक्यात कोरोनाच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. कारण, अगदी काल परवा संगमनेरात एकाच दिवशी 84 रुग्ण सापडले होते तर अकोल्यात 48 रुग्ण. त्यामुळे, येथे कोरोनाचा अतिरेख झाल्याचे दिसून आला. मात्र, सुदैवाने त्या दिवसानंतर कोरोनाची संख्या कमी-कमी होत गेली आहे. म्हणजे, जितके रुग्ण सापडते आहे तितकी संख्या नंतर कमी होताना दिसत आहे. अर्थातच तज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दिवाळीच्या दरम्यान कोरोचे संकट संपलेले राहील हे या आकडेवारीवरुन लक्षात येत आहे. आज अकोल्यात कुंभेफळ, म्हाळादेवी, इंदोरी, कोतुळ, बेलापुर,पाडाळणे व अकोले शहर अशा विविध ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण मिळून आले आहेत. तर संगमनेरात घुलेवाडी, ढोलेवाडी, संगमनेर शहर, चिकनी, बोटा अशा वेगवेगळ्या ठिकाणी 16 रुग्ण मिळून आले आहेत. 

संगमनेर तालुक्यात मालदाड रोड येथे 39 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे 17 वर्षीय तरुणी, गणेशनगर येथे 45 व 37 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 21 वर्षीय तरुण, ढोलेवाडीत 52 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 50 वर्षीय महिला, चिंचपूर येथे 65 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 13 वर्षीय मुलगा, चिकनीत 46 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय तरुण, 47 वर्षीय तरुण, घुलेवाडीत 47 वर्षीय महिला तर 25 वर्षीय तरुणी, बोटा येथे 45 वर्षीय पुरुष अशा 16 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. 

तर अकोले तालुक्यात कुंभेफळ येथे 70 व 58 वर्षीय पुरूष, 26 वर्षीय तरुण, 14 वर्षीय मुलगा, 53 वर्षीय महीला तर अवघ्या 02 वर्षीय चिमुकली, 11 वर्षीय मुलगी, 02 वर्षीय बालिका, म्हाळादेवी येथे 26 वर्षीय तरुणी, 07 वर्षीय बालक, 02 वर्षीचा चिमुकला, कोतुळ येथे 28 वर्षीय तरुण, 26 वर्षीय तरुणी, बेलापूर येथे 66 वर्षीय महीला, इंदोरी येथे 60 वर्षीय पुरूष, तर अकोले शहरातील पेट्रोल पंपाजवळील  08 वर्षीय मुलगा अशी एकुण 17 रुग्णांचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात पाडाळणे येथे 36 वर्षीय महिला तर टाहाकारी येथे 70 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महीला, तर पिंपळगाव निपाणी येथे 50 वर्षीय महिला अशा 21 व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या 552 झाली आहे.

तर अकोले तालुक्यात आज दिल्लीहून आयसीएमआरची टिम आली होती. त्यांनी तालुक्यातील केळुंगण गाव येथील 40 लोकांचे स्वॅब नेले आहेत. म्हणजे एकाच गावच्या चार कोपर्‍यातून प्रत्येकी 10 असे 40 रक्त सॅम्पल सर्वेक्षण म्हणून नेले आहे. त्यानुसार येथील रुग्णांची प्रतिकारशक्ती, अ‍ॅन्टीबॅडीज अशा अनेक तपासण्या करुन निष्कर्ष काढले जाणार आहे. तर हीच टिम मार्च महिन्यात देखील आली होती. मात्र, अकोले तालुक्यात तेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता. त्यामुळे त्यांनी पुन्हा येऊन केंद्रीय अहवाल पुर्ण केला आहे अशी माहिती आरोग्य अधिकारी इंद्रजित गंभिरे यांनी दिली. 

----------------------------------------- 

जाहिरात :- अकोलेसंगमनेर येथे 90 लाख वाचकांच्या लोकप्रिय रोखठोक सार्वभौमसाठी प्रतिनिधी पाहिजे आहेत. संपर्क - 8888782010, 8208533006