संगमनेर तालुक्यात डॉक्टरने गुंगीचे औषध देऊन पेशन्टवर केले अत्याचार.! चित्रफितही काढली, डॉक्टर.! हे वागणं बरं नव्हं..!


सार्वभौम (संगमनेर) :- संगमनेर तालुक्यातील सारोळा पठार परिसरात एका डॉक्टरने घृणास्पद कृत्य केल्याची घटना उघड झाली आहे.  डॉक्टर महाशयांनी उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेस सलाईनमध्ये गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध करीत तिच्यावर अत्याचार केल्याची समोर आले आहे. हा प्रकार येथेच थांबला नाही तर तिला बदनाम करण्याची धमकी देत तिच्यावर संगमनेर शहरातील लॉज आणि वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार अत्याचार करण्यात आले. हा प्रकार दि. 25 सप्टेंबर 2018 ते दि. 8 ऑगस्ट 2020 या दरम्यान वेळोवेळी घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेले दिलेल्या फिर्यादीत नुसार घारगाव पोलीस ठाण्यात डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात डॉ. सय्यद दाऊद मोमीन (रा. सारोळा पठार, ता. संगमनेर) यांना आरोपी करण्यात आले आहे.

याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुमारे दोन वर्षापुर्वी म्हणजे दि. 25 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास त्या मोमीन यांच्या दवाखाण्यात गेल्या होत्या. त्यांना टायफाईड झाल्यामुळे त्यांना शहरातील एका महिला डॉक्टरांनी दिलेल्या उपचाराच्या सुचनेप्रमाणे त्यांनी उपचार घेणे आवश्यक होते. त्यामुळे पीडित महिला या दवाखाण्यात गेली होती. त्यानंतर मोमीन याने संबंधित महिलेची तपासणी केली असता त्यांना सलाईक आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार डॉक्टरने सलाईन लावले. त्यावेळी या डॉक्टरने त्यात गुंगीचे इंजेक्शन देऊन पीडित महिलेवर जबरी संभोग केला असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तर, हा प्रकार येथेच थांबला नाही तर या डॉक्टरने अत्याचार करताना देखील त्याची चित्रफित तयार केली आणि नंतर ती पीडित महिलेस दाखविली. ही क्लिप व्हायरल करुन ती नवर्‍यास व नातेवाईकांना दाखविण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेस वारंवार मोबाईवर मेसेज टाकून बोलावन घेणे, धमक्या देणे अशा प्रकारे महिलेवर मानसिक दबाव आणला.

दरम्यान आपली बदनामी होऊ नये, तसेच नातेवाईक व समाज यात बदनामी होऊ नये यासाठी ती शांत राहिली. मात्र, गेल्या 2 वर्षात 15 वेळेस त्याने पीडित महिलेचा फायदा घेत त्याच्या दवाखाण्यात त संगमनेर शहरातील एका लॉजवार तिच्यावर अत्याचार केले. असे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान आरोपी हा शनिवार दि. 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेच्या राहत्या घरी गेला होता. तेव्हा ती कुकुट पालन येथील शेडमध्ये काम करत होती. तेव्हा हा तेथे गेला व त्याने शरिरसुखाची मागणी केली. त्यावेळी या महिलेने नकार दिला असता आरोपीने त्याच्या जवळच पडलेल्या खोर्‍याच्या दांड्याने पीडित महिलेच्या नडगीवर मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत तुझ्या नवर्‍याला खोट्या केसमध्ये अडकवतो, तुझ्या मुलांना जीवंत सोडत नाही अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी पीडित महिलेने बुधवार दि. 12 ऑगस्ट रोजी थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले व पोलीस निरीक्षक आंबादास भुसारे यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. त्यांनतर साहेबांनी कोणताही विलंब न लावता वारंवार बलात्कार कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यात किती तत्थ्य आहे. हे तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. एखाद्या महिलेना फिर्याद दिल्यानंतर ती दाखल करुण घेणे हे पोलिसांचे काम आहेच. ते काय खरे-काय खोटे ते तपासात निष्पन्न होते तर न्यायालयात त्याचा न्यायनिवाडा होतो. त्यामुळे घारगाव पोलीस या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी मार्गस्त झाले आहे. या घटनेतचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे करीत आहेत.