अकोल्यात पुन्हा 10 रुग्णांची भर, राजुरमध्ये तीन रुग्ण, संख्या 256 वर, वाशेरा, हिवरगाव, नवलेवाडी कारखाना रोड पुन्हा बाधित.!
- आकाश देशमुख
सार्वभौम (अकोले) :- अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रदुर्भाव वाढताना दिसून येत आहे. आजवर बाधितांची संख्या 246 वर होती त्यात 10 ने भर पडली असून ती 256 इतकी झाली आहे. अकोले तालुक्याचे सुदैव असे की, येथे नव्या गावांना बाधा होण्याचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे, पुर्वी ज्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण होते. त्याच गावांमध्ये करोनाचा प्रदुर्भाव दिसून यात असल्याचे लक्षात आले आहे. ही तालुक्यासाठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे. आज 77 जणांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली होती. त्यात 9 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात नवलेवाडी, राजूर, वाशेरे, शिवाजीनगर, धामनगाव आवारी अशा नाही ठिकाणांचे अहवाल प्राप्त झाले आहे.
अकोले तालुक्यातील आज नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात हिवरगाव आंबरे येथे 52 वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे 59 वर्षीय पुरूष तर 51 वर्षीय महिला, वाशेरे येथे 85 वर्षीय वृद्ध महिला, धामनगाव आवारी येथे 60 वर्षीय महिला, कारखाना रोड येथे 35 वर्षीय महिला, अकोले शहराच्या नजीक उच्चभ्रु वसााहतीचे शिवाजीनगर येथे 23 वर्षीय महिला तर राजूर येथे 43 वर्षीय पुरुष तर 34 वर्षीय महिलेचा सामावेश आहे. तर यात राजूर येथील वंजार गल्ली मध्ये एक 75 वर्षीय वृद्ध आजोबा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान राजूर येथील रुग्णाच्या संपर्कातील 12 लोक अकोले तालुक्यातील खानापूर कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते. त्यापैकी दोन अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. सदर 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीही संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती अकोले तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर गंभीरे यांनी दिली आहे. तर या कोरोना पॉझिटिव्ह रुगणाच्या मुलाचा भेळीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडून राजूर व परिसरात भेळीची मोठ्या प्रमाणात विक्री झालेली आहे. तरी राजूर व परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन राजूर ग्रामपंचायत व राजूर पोलीस स्टेशनने केले आहे .राजूर ग्रामपंचातने सदर गल्लीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे सदर गल्ली चार ही बाजूने सील केली असून खबरदारी म्हणून राजूर परिसरात दवंडीमार्फत जनजागृती करण्यात आली आहे.तर या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरच्या लोकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन प्रशासनास मदत करावी, तसेच काही सिमटन्स नसल्यास स्वयंप्रेरणेने होमक्वारंटाईन होऊन घ्यावे. दरम्यान इतके सगळे माहित होऊन देखील राजूर बाजारपेठेत गर्दी असल्याचे दिसून आले. त्यामुळे येथील नागरिकांनी काही गांभीर्य नाही की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर ज्यांचा फार महत्वाचे काम असेल त्यांनीच घराबाहेर पडावे अशी विनंती करण्यात आली आहे.
-----------------------------------------------------
रोखठोक सार्वभौम या 83 लाख वाचकांच्या पोर्टलवर जाहिरातीसाठी संपर्क साधा : 8888782010, 8208533006, संगमनेर :- 8308139547, राजूर : 9011223312, अकोले 9373239144