अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी तर पुन्हा सहा पॉझिटीव्ह.! माणसे कोरोनाने नव्हे, भितीने मरत आहेत.!
- शंकर संगारे
सार्वभौम (अकोले) :- अकोले तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काल 12 रुग्ण मिळून आल्यानंतर आज पुन्हा सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात कोतुळ येथे पाच तर मोग्रस येथे एका व्यक्तीचा सामावेश आहे. तर याच तडाख्यात इंदोरी येथील एक उद्योजकाच्या वडिलांचा कोरोना पॉझिटीव्ह असताना मृत्यू झाला आहे. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांना अखेरचा श्वास घेतला अशी माहिती स्थानिक व्यक्तींनी दिली आहे. मात्र, तरी देखील त्यांची गणना कोरोना पॉझिटीव्ह यात धरली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहे. तर आता इंदोरीत नऊ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यात बोलबोल करता 225 आकडे कोरोनाने पार केला आहे. खरंतर रुग्ण मिळून येणे हेच प्रशासन आणि अकोलेकरांचे अपयश आहे. तर कोरोनावर कोणत्याही प्रकारची लस नाही, त्यामुळे छा-छू उपचारांनी तो बरा होतो, एव्हाणा उपचार देखील केले नाही तरी रुग्ण बरा होते. हे देखील अकोल्यात कोरोना बाधित झालेल्या पोलीस कुटुंबातील लहान-लहान मुलांनी सिद्ध करुन दाखविली आहे. कारण, या घरात सहा रुग्ण बाधित झाले होते. त्यापैकी जे लहान मुले होते. त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह दाखविले खरे, मात्र त्या लहान मुलांना सहा दिसत क्वारंटाईन केले असता अवघी एक गोळी देखील त्यांना दिली नाही. सहा दिवसांनी त्यांना घरी जा असे आदेश दिले गेले. हीच ओरड पोलीस कुटुंबाने केली मात्र, आजही ते मुली अगदी ठणठणीत आहे. त्यामुळे, कोरोनाचा बागुलबुवा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अर्थात यातून घेण्याजोगे इतकेच आहे की, निव्वळ कोरोनाला घाबरुन मानसे मरत आहे. मात्र, कोरोनाने माणसे मरत नाहीत, हे सांगण्यासाठी नेमके काय करणे अपेक्षित आहे. हेच कळत नाही.
आता अकोले तालुक्यात पुन्हा सहा रुग्णांची भर पडली आहे. यात सध्यातरी कोतुळ हे कोरोनाच्या अजेंड्यावर असल्याचे दिसते आहे. आज एकाच दिवशी येथे पाच रुग्ण मिळून आले आहेत. त्यात 26, 28 व 30 वर्षीय तरुण तर 30 वर्षीय तरुणी व अवघ्या दिड वर्षाचे चिमुकले बालक यांचा सामावेश आहे. हे सर्व संपर्कात आलेले रुग्ण आहेत. तर मोग्रस येथे देखील 47 वर्षीय पुरूषाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर काल रात्री इंदोरी येथील 74 वर्षीय वृद्ध व्यक्तीने कोरोना झाल्यानंतर अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या कुटुंबात ज्या व्यक्तींना बाधा झाली होती. त्यांच्यावर संगमनेर येथे उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता कोरोनाने मयत झालेल्यांची संख्या आता सातवर जाऊन पोहचली आहे.