उसनवारी पैशातून तिघांनी मित्रास फाशी देऊन निळवंड्याच्या कॅनॉलमध्ये फेकले.! पाच दिवसांनी मिळाला मृतदेह.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील गोडसेवाडी शिवारात एका तरुणास उसनवारी पैशाच्या कारणाहून गळा आवळून ठार केले. तर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यास निळवंडे कॅनॉलच्या खड्ड्यात टाकून दिले. मात्र, हा प्रकार संगमनेर तालुका पोलिसांनी उघड केला आहे. यात रामदास कारभारी यरमल (वय 33, हल्ली रा. गोडसेवाडी, कायम रहिवासी साकूर जवळील शिंदोडी, ता. संगमनेर) यांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मयताच्या कुटुंबातील एका व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार गोकुळ भाऊसाहेब शिरतार, भाऊसाहेब राणु शिरतार व रमेश खंडू म्हस्कुले (तिघे रा. गोडसेवाडी, ता. संगमनेर, जि. अ.नगर) या तिघांना आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 8 ऑगस्ट रोजी संगमनेर पोलीस ठाण्यात माहिती मिळाली होती की, निमज गावच्या हाद्दीत पाण्याच्या बोगद्याजवळ एका तरुणाचा मृतदेह मिळून आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तेथे तत्काळ धाव घेत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याचा स्पॉट पंचनामा करुन बॅडीचे पोस्टमार्टम करण्यात आले होते. त्यानंतर हा तरुण कोण असावा? या दृष्टीने तपास सुरू झाला होता. मात्र, या तरूणाचा मृतदेह आणि चेहरा पुर्णपणे काळा पडल्यामुळे त्याची ओळख पटणे कठीण होते. त्यामुळे पोलिसांनी या मृतदेहाचे फोटा सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर हा तरुण त्याच परिसरात अवघ्या दोन ते तीन किमी अंतरावरील रहिवासी असल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर पोलिसांना त्याची ओळख पटली असता त्याच्या सपर्कात असणार्या व्यक्ती, मित्र आणि नातेवाईक यांच्याकडे सखोल चौकशी केली. त्यानंतर लक्षात आले की हा वाद केवळ पैशाच्या उसनवारी देण्या घेण्याहुन झाला होता. त्यानंतर यरमल यांच्या कुटुंबातील व्यक्तीने त्यास दुजोरा देत पोलिसांना काही माहिती दिली.
दरम्यान आरोपी व मयत यांच्यात किरकोळ वाद झाले होते. पैसा देवाण-घेवाणीतून त्यांचे नेहमी वाद होत होते. त्यामुळे, याचा एकापरचा काटा काढायचा म्हणून या तिघांनी यरमल यास मारुन टाकले व याने फाशी घेतली असा बनाव होऊ शकतो किंवा त्याने आत्महत्या केली असे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे या तिघांनी यरमल यास ठार करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा बनाव उघडा पाडून घटनेची उकल केली आहेे. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत व पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी करीत आहेत. अशी माहिती पोलीस ठाण्यातून मिळाली आहे. तर रात्री आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्याची चर्चा सुरू होती.
दरम्यान उसनवारी पैशामुळे गेल्या आठ दिवसांपुर्वी अकोले तालुक्यातील उंचखडक खुर्द येथे एका तरुणाचा खून झाला होता. तर त्या पाठोपाठ आता संगमनेरमध्ये देखील उसनवारी पैशातून पुन्हा खून झाला आहे. मैत्रीत व्यवहार करताना हजारदा विचार करा. मात्र, पैशासाठी एखाद्याचा जीव घेतला जावा.! ही बाब प्रचंड वेदनादायी आहे. त्यामुळे जे काही व्यवहार आहे. त्यात संभाषण ठेवा, पैसा आज ना उद्या मिळू शकतो. मात्र, मित्रांनी केलेला घात आणि गेलेला माणूस यांची परतफेड होत नाही. त्यामुळे व्यवहार करताना विचार करा आणि केलाच तर संयम ठेवा. एकमेकांना समजून घ्या. खून आणि मारामार्या हा अंतीम पर्याय असूच शकत काही त्यामुळे अशा प्रकारचे मागर्र् स्विकारु नका असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.