संगमनेरात 42 रुग्ण बाधित तर अकोल्यात 12 पॉझिटीव्ह! देवठाण पाच दिवस गाव बंद.! मेहेंदुरीला नव्याने बाधा!
सार्वभौम (अकोले-संगमनेर) :-
संगमेनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रोज 30 ते 40 च्या सरासरीने रुग्ण मिळून येत आहे. मात्र, जितके रूग्ण सापडतील तितके चांगले आहे. त्यामुळे येथील बाधितांपासून होणारा प्रदुर्भाव टळला जाणार आहे. आज देखील 42 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर अकोले तालुक्यात देखील 12 रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यात सव्वादोनशे तर संगमनेरात कोरोनाने अकराशेकडे वाटचाल केल्याचे दिसते आहे. ही अकडेवारी आता तोवर वाढती राहणार आहेे. जोवर प्रत्येक व्यक्ती स्वत:हून स्वत:ची व दुसर्यांची देखील काळजी घेत नाही. त्यामुळे कोरोनाला हरविण्यासाठी आता शासन आणि प्रशासन हे महत्वपुर्ण भुमिकेत काही तर प्रत्येक नागरिक हाच कोरोनाचा नायनाट करु शकतो हेच वास्तव आहे.
संगमनेर शहरात आज 31 रुग्ण रॅपीड अॅन्टीजन टेस्टमध्ये मिळून आले आहेत तर 11 रुग्ण जिल्हा रूग्णालयात कोरोना पॉझिटीव्ह मिळून आले आहेत. यात घुलेवाडी येथे चार, पिंपारणे येथे 3, चिंचोरी गुरव, वेल्हाळे, राजापूर, वडगाव पान, संगमनेर शहर आणि ग्रामीण अशा वेगवेगळ्या ठिकाणी असे 42 रुग्ण एकट्या संगमनेर तालुक्यात मिळून आले आहेत. आता एक गोष्ट सर्वसाधारण रित्या लक्षात आली आहे की, गेल्या काही दिवसांपुर्वी अगदी गल्ली बोळात सिंगल व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह मिळून येत होता. त्यामुळे ते फार घातक होते. आता मात्र ते प्रमाण फार कमी झाले आहे. आता एकाच वेळी सर्व कुटुंब बाधित होताना दिसत आहे. तर सामाजिक प्रदुर्भाव कमी होत चालल्याचे लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यासाठी ही अदखलपात्र का होईना परंतु काहीशी आनंदाची गोष्ट आहे.
तर अकोले तालुक्यात देखील कोरोनाचे रोज 10 ते 20 रुग्ण मिळून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे दिसते आहे. आज एकाच दिवशी अकोले तालुक्यात 12 रुग्णांची भर पडली आहे. त्यात कोतुळ येथे 35 व 40 वर्षीय महिला तर 5 वर्षाचे बालक आणि 30 वर्षीय तरुण तसेच शिवाजीनगर परिसरात 52 वर्षीय पुरूष तर 50 वर्षीय महिला, देवठाण येथे 50 व 45 वर्षीय पतीपत्नी, तसेच संगमेनर येथे खाजगी लॅबमध्ये तपासणी करणार्या तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात अकोले शहरातील शेटेमळा येथे एक, मेहेंदुरी येथील एक तर अकोले शहरातील लोकमान्य रोड येथे एक असे तीन तर एकूण 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. तर देवठाण येथे रुग्ण वारंवार रुग्ण मिळून येत असल्यामुळे तेथील नागरिकांनी स्वयंस्पुर्तीने गाव पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अजुबाजुच्या गावांनी तेथे येऊन गर्दी करु नये. हे गाव थेट रविवार दि. 16 ऑगस्ट रोजी खुले होणार आहे. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. करोना समितीच्या बैठकीला तहसीलदार मुकेश कांबळे, मंडल अधिकारी ज्योती काथेपुरे, सरपंच रोहिणी सोनवणे, पोलीस पाटील राधाकृष्ण जोरवर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी नागरे, तलाठी बाळकृष्ण सावळे, ग्रामसेवक राजेंद्र वरपे, आरोग्य सेवक जयकुमार पाटील, आरोग्य सेविका विमल परते आदी उपस्थित होते.