उसनवारीचे पैसे मागितल्याने त्याने एका टोल्यात मित्राला ठार मारले, अकोल्यातील ऊंचखडक येथील प्रकार!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यातील उंचखडक खुर्द येथे उसनवारी पैशाच्या वादातून दोघांमध्ये वाद झाले होते. वेळीच पैसे न दिल्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि जो पैसा मागतो त्याच्या डोक्यात विटाचा टोला मारून त्यास जाग्यावर ठार मारले. ही घटना शनिवार दि. 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात या घटनेची नोेंद करण्यात आली आहे. यात तुकाराम बुधा उघडे (वय 60, रा. उंचखडक खुर्द, ता. अकोले) असे मयत झालेल्याचे नाव आहे. तर यात कैलास यशवंत घोडके (वय 40) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपुर्वी कौलास घोडके हा प्रचंड अडचणीत होता. त्यामुळे त्याने तुकाराम उघडे यांच्याकडून काही उसनवारी पैशांची मागणी केली होती. मात्र, मयत उघडे यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्याने त्याच्या जवळच्या नातेवाईकांकडून पैसे घेऊन दिले. मात्र, घोडके याचे जो वायदा केला होता. त्या ठरलेल्या कालावधीत याची रक्कम मिळली नाही. त्यामुळे, उघडे यांच्याकडे त्याचे नातेवाईक वारंवार पैशाची मागणी करीत होते. समोरुन मागणी होत असल्यामुळे उघडे याने घोडकेकडे पैशाचा तगादा लावला. दोघे एकाच बैठकीचे मेंबर असल्यामुळे त्यांच्यात या पैशाहून वारंवार वाद होत होते.
दरम्यान शनिवारी सायंकाळी दोघे ताईट होऊन समोरासमोर आले. त्यांच्यात उंचखडक खुर्द येथील बस स्थानकाच्या जवळ किरकोळ वाद झाले. मात्र, वारंवार पैसे मागणीमुळे घोडके यांने रागाच्या भरात जवळच पडलेली विट उचलली आणि उघडेच्या डोक्यात टाकली. हा प्रकार झाल्यामुळे तो जमिनीवर कोसळला. दरम्यानच्या काळात घोडके यांने तेथून काढता पाय घेतला. उघडे सायंकाळी उशिरापर्यंत तेथे पडून होता. मात्र, तो नशाधीन आहे असे समजून अनेकांनी दुर्लक्ष केले. मात्र, जेव्हा काही लोकांना संशय आले तेव्हा त्याला तपासले असता त्याचा श्वासोच्छवास बंद झालेला होता. त्यामुळे सगळे गावकरी एक झाले आणि हा प्रकार कोणी केला असावा अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर या घटनेवर प्रकाश पडला व पोलिसांनी एक संशयित म्हणून कैलास घाडके यास ताब्यात घेतले आहे.
दरम्यान अकोले पोलीस ठाण्याच्या हाद्दीत गेल्या 10 महिन्यात मोठमोठे क्राईम घडलेले आहेत. मात्र, पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांच्या टिमने आजवर एकाही गुन्हा प्रलंबित आणि कायम तपासावर ठेवलेला नाही. तर अकोले पोलीस ठाणे इतके मोठे कार्यक्षेत्र असून तेथे एक पोलीस निरीक्षक आणि फक्त पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमने हे दोनच अधिकारी आहेत. केवळ या दोन पोलीस अधिकार्यांच्या बळावर आजवर अकोल्यात अद्याप कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. त्यामुळे, उद्या ज्या काही पोलीस अधिकार्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यात पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी अकोले तालुक्याचा विचार प्रामुख्याने करावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.