परवा कोठडी, काल पोलीस ठाणे अन आज पोलीस कॉलनी बाधित.! संगमनेरात पुन्हा २१ रुग्णांची भर ! तर अकोले शहरात चार रुग्ण.!


सार्वभौम (संगमनेर) :- 
        संगमनेरमध्ये कोरोना विषाणुचा फैलाव जुलै नंतर या महिन्यात देखील झपाट्याने होत आहे. आज आलेल्या अहवालात पुन्हा नव्याने २१ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये शहरात १५ रुग्ण आढळून आले आहे. शहरातील घासबाजार येथे ७७ व ५१ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर इंदिरानगर येथे ८१ वर्षीय वयोवृद्धाला तर ७१ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. मालदाड रोड येथे २९ वर्षीय महिला तर पोलीस कॉलनी येथे २३ व २२ वर्षीय महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर घासबाजार येथे ७२ वर्षीय पुरुषाला तर संजयगांधीनगर येथे ३२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर लालतारा हाऊसिंग येथे २१ व १८ वर्षीय महिला तर १५ व४३ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यात आज सहा रुग्ण आढळून आले आहे. त्यामध्ये खांबा येथे ५५ वर्षीय तर चंदनापुरी येथे ७९ वर्षीय वयोवृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. तर खराडी येथे २७ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच सुकेवाडी येथे ६५ वर्षीय इसमाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर घुलेवाडीमध्ये आता कोरोना थांबता-थांबेना आज पुन्हा एक कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला आहे. घुलेवाडी येथे २३ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे एकूण कोरोना बधितांचा आकडा आता ७७९ वर जाऊन पोहचला आहे. तर अकोले शहरात पाच रुग्ण मिळून आले आहेत. त्यात शहरातील नवलेवाडी परिसरात रहाणारा २७ वर्षीय मुलगा, तसेच कारखानारोड वरील ५१ वर्षीय व्यवसायिक, सांगवी रोड, कळस येथील ५५ वर्षीय पुरुष व बोरी कोतुळ येथील ५६ वर्षीय पुरुष तर अकोले गावठाणातील सुभाष रोडवरील एक व्यक्ती यांचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
                  जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 535 ने वाढ झाली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये 34, अँटीजेन चाचणीत 284 आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या 217 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1 हजार 795 इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज 279 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता 3 हजार 639 इतकी झाली आहे. काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत 24 रुग्ण बाधित आढळून आले होते.त्यामध्ये मनपा 09, नेवासा 13, जामखेड 02 अशा 24 रुग्णांचा समावेश होता. त्यानंतर आणखी 10 रुग्णांचा अहवाल बाधित आढळून आला. यात, नेवाशातील चांदा 1, अहमदनगर शहर 02, अकोले  तालुक्यात 9, त्यात शेरणखेल 04, रेडे 03, कारखाना रोड व  टहाकारी अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान अँटीजेन चाचणीत आज 284 जण बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये, संगमनेर 27, राहाता 09, पाथर्डी 25, नगर ग्रामीण 15, श्रीरामपुर 12,  कॅन्टोन्मेंट 13, नेवासा 20, श्रीगोंदा 60, पारनेर 17, राहुरी 06, शेवगाव 43, कोपरगाव 12, जामखेड 22 आणि कर्जत 03 अशा रुग्णांचा समावेश आहे. तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 217 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे . यामध्ये, मनपा 175, संगमनेर 05, राहाता 13, पाथर्डी 04, नगर ग्रामीण 05, श्रीरामपूर 04, कॅन्टोन्मेंट 01, नेवासा 01, श्रीगोंदा 01, पारनेर 04, शेवगाव 02, कोपरगाव 01 आणि कर्जत येथील 01 रुग्णांचा समावेश आहे.
- सुशांत पावसे,