अकोल्यात एकाच वेळी 11 रुग्ण, पोलिसाचे आखं कुटुंब बाधित! उंचखडकला पुन्हा कोरोनाची लागण! संगमनेरात पाच रुग्ण!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले शहरात कोरोनाचे 10 रुग्ण मिळून आले आहे. त्यात पोलिसांचे आखं कुटुंब कोरोना बाधित आले असून अगस्ति चित्रपट गृहाजवळ तीन तर एक तहसिल कार्यालयाच्या मागील बाजूस एक आणि उंचखडक बु येथील एक असे दहा रिपोर्ट अकोले तालुक्यात मिळून आले आहेत. या रिपोर्टमध्ये कळस असा उल्लेख केलेला आहे. मात्र, कळस येथील व्यक्ती अकोल्यात राहण्यासाठी आहे. त्यामुळे कळसला कोणताही धोका नाही. त्यामुळे कोणी धबरु नये अथवा अफवा पसरवू नये. तर संगमनेरात पाच जणांचे पॉझिटीव्ह आले आहेत.
यात अकोले शहरातील एक पोलीस कर्मचारी संगमनेर शहर वाहतूक शाखेत कार्यरत आहे. त्यामुळे, हे कोविड योद्ध आपले कार्य बजावत असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. ते अकोले ते संगमनेर असे ये-जा करीत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. खरंतर पोलीस हे कामात कोणतीही कुचराई न करता आपले कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे, त्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांची काळजी व त्यांच्या कुटुंबाची काळजी शासकाने घेतली पाहिजे हा मुद्दा आज सकाळी रोखठोक सार्वभौमने जिल्हाधिकारी फेसबुक ऑनलाईन आले तेव्हा मांडला होता. आमच्या पाच प्रश्नांपैकी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तीन प्रश्नांचे अगदी सविस्तर विश्लेषण केले व त्यावर उपाय सांगितले. त्यात हा पोलिसांचा आणि सरकारी कर्मचार्यांच्या आरोग्याचा प्रश्न मांडला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पोलीस अस्थापनाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. तशा सुचना त्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे, जे रिकाम्या बोंबा ठेकत फिरता त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर वाईट वाटते. मात्र, हे पोलीस योद्धे आहेत त्यांच्या कुटुंबाला आधार देणे गरजेचे आहे.
तर दुसरीकडे अगस्ति चित्रपट गृह या परिसरात तिघांना कोरोनाची बाधा झाली आहे. यांचे एक दुकान असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या पलिकडे याच कुटुंबात जो व्यक्ती कोरोना बाधीत झाला आहे. तो त्याच्या एका मित्राला जाऊन भेटला. त्याचे जुनी स्टेट बँक रोडवर एक मेडिकल आहे. त्याला तरुणाला देखील कोरोनी बाधा झाली आहे. हा अहवाल खाजगी रुग्णालयातून मिळाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर उंचखडक बु येथे देखील एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. यापुर्वी येथे जे दोन रुग्ण मिळून आले होते. ते ठणठणीत होऊन घरी येतात कोठे नाहीतर पुन्हा उंचखडख कोरोनाच्या अजेंड्यावर आले आहे. असे तालुक्यात 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.