अकोल्यात पुन्हा नऊ कोरोना रुग्णांची भर.! व्यापारी संघटनांच्या निर्णयावर मतभेद, अकोले बंदचा बार उडाला!

- महेश जेजुरकर
सार्वभौम (अकोले) :- 
                    अकोले तालुक्यात कोरोनाचे पुन्हा नऊ रुग्ण मिळून आले आहेत. त्यात कारखाना रोड येथे राहणार्‍या 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर शेरणखेल येथे आणखी चार रुग्ण वाढले आहेत. या व्यतिरिक्त  रेडे आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर टाहाकारी येथे नव्याने एका व्यक्ती बाधीत झाला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात आता कोरोना रुग्णांची संख्या  130 झाली आहे आहे.
                      याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेरणखेल येथे पहिल्यांदा एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली होती. त्याचा प्रादुर्भाव होत तेथे आखं कुटुंबा कोरोना बाधीत झाले आहे. त्यांच्यावर संगमनेर येथे  उपचार सुरू आहेत. तर कारखाना रोेडच्या रुपाने अकोले शहरात कोरोनाचा प्रदुर्भाव वाढता झाला होता. त्यानंतर येथील सर्व रुग्ण बरे झाले. मात्र, अवघ्या 10 दिवसांनतर  कारखाना रोड पुन्हा कोरोनाच्या अजेंड्यावर आला आहे. कोरोना रुग्णांची अकडेवारी पहाता शेरणखेल येथे 56 व 45 वर्षीय पुरुष तर 52 वर्षीय व 40 वर्षीय महीला असे चार रुग्ण आहेत. अकोले तालुक्याच्या अगदी जवळ रेडे येथे 56 वर्षीय महिला व 25 वर्षीय तरुणी तसेच अवघ्या 4 वर्षीची चिमुरडी कोरोना बाधित मिळून आली आहे. तसेच अकोल्याचे दक्षिण (नैऋत्य) टोक असलेल्या टाहाकारी येथील 26 वर्षीय तरुण तर कारखाना रोडवरील 50 वर्षीय व्यक्तीचा आहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
                             दरम्यान अकोले तालुक्यात व्यापारी संघटनांनी एक महत्वपुर्ण निर्णय घेतला होता. की जोवर कोरोनाची प्रादुर्भाव आहे. तोवर अकोले शहरातील सर्व दुकाने प्रत्येक शनिवारी बंद राहतील. मात्र, अकोले तालुक्यात या निर्णयाला हरताळ फासल्याचे पहायला मिळाले. याचे कारण म्हणजे, जेव्हा हा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हाच सामान्य आणि छोट्या व्यवसायीकांना यांनी विश्वासात घेतले नाही असा आरोप झाला होता. तेव्हापासून वादात सापडलेला हा प्रश्न आज पुन्हा ऐरणीवर आला आणि छोट्या दुकानदारांनी आपल्या दुकानांचे शटर उघडे केले. त्यामुळे अकोले बंदचा अक्षरश: फज्जा उडाल्या
- शंकर संगारे 
चे पहायला मिळाला.