संगमनेरात दिवसभरात 62 तर अकोल्यात 40 रुग्ण.! विसर्जनासाठी अकोल्यात नगरपंचायतीचा मोठा निर्णय व महत्वपुर्ण सुचना.!
- सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर/अकोले) :- संगमनेर आणि अकोले दोन्ही तालुक्यात रोज अर्धशतक रुग्ण मिळून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे हे निर्विवाद सत्य आहे. मात्र, या आकड्याला पुर्णविराम देण्यासाठी नागरिकांनी थोडेसे जबाबदारीने वागले पाहिजे. तर प्रशासनाने देखील तपासणीमध्ये होणार्या संदिग्धतेवर लक्ष दिले पाहिजे. वास्तवत: पुर्वीप्रमाणे आता क्षेत्र कंटेनमेंट करणे, तपासण्या करणे, बाजारहाट पुरविणे अशा प्रकारची कामे आता प्रशासनाला राहिले नाही. त्यामुळे, बाधितांचा शोध घेण्याच्या पलिकडे आता जागरुकता करण्यासाठी गाव पातळीवर वेगवेगळ्या उपायोजना राबविणे गरजेचे आहे. खरंतर कोरोनाची जी पुर्वीची भिती होती तीचे वलय आता कमी झाले आहे. तर जे भितीपोटी लोक मयत होत होते. ते देखील प्रमाण केवळ 10 ते 15 टक्के राहिले आहे. त्यामुळे, कोरोनाला येणार्या काळात बुळगेपणाचे स्वरुप येऊन तो अगदी थंडी तापासारखा आजार होणार आहे. फक्त त्यासाठी बाधितांना धीर देण्याची नित्तांत गरज असल्याचे समाजसेवकांना वाटते आहे. आत अकोल्यात 40 तर संगमनेरात दिवसभरात 62 रुग्ण मिळून आले आहेत. आता हे प्रशासनाचे अपयश नाही तर यश म्हणावे लागेल. कारण, बाधितांचा शोध घेतल्याशिवाय कोरोनाचा अंत नाही. हेच त्रिवार सत्य आहे.
संगमनेरमध्ये आज सकाळी 19 तर उशीरा आलेल्या अहवालात पुन्हा 43 रुग्ण नव्याने कोरोनाबाधीत आढळून आले आहे. यामध्ये शहरात 11 रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये जनतानगर येथे 48 वर्षीय, 26 वर्षीय व 19 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर खंडोबागल्ली येथे 36 वर्षीय पुरुष व 58 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर साळीवाडा येथे 78 वर्षीय वयोवृद्धास व चैतन्यनगर येथे 65 वर्षीय महिला तर माळीवाडा येथे 55 वर्षीय व 26 वर्षीय आणि 60 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर उपासनी गल्ली येथे 75 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर आज तालुक्यात 32 रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये कुरकुटवाडी येथे 46 वर्षीय महिला तर वडगावपान येथे 21 वर्षीय तरुण व 27 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर मेंढवन येथे 30 वर्षीय महिला व 34 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर गोरक्षवाडी येथे 68 वर्षीय व 28 वर्षीय पुरुषाला तर 34 वर्षीय महिला व 9 वर्षीय बालीकेस कोरोनाची बाधा झाली आहे. तर रहीमपूर येथे 65 वर्षीय महिला व 11 बालिकेस कोरोनाची बाधा झाली आहे. तर चिकणी येथे 53 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर राजापूर येथे 21 दिवसाच्या चिमुरडीस कोरोनाची बाधा झाली आहे. तर संगमनेर खुर्द येथे 32 वर्षीय पुरुष व निमगाव टेंभी येथे 26 वर्षीय तरुण व 2 वर्षीय बालकास कोरोनाची बाधा झाली आहे. तर पानोडी येथे 65 वर्षीय पुरुषास व 20 वर्षीय तरुणास कोरोनाची बाधा झाली आहे. तर गुंजाळवाडी येथे 52 वर्षीय व 8 वर्षीय बालक आणि 16 वर्षीय युवती व 43 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर घुलेवाडी येथे 40 वर्षीय पुरुष आणि 50 वर्षीय व 57 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर चंदनापुरी येथे पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये दोन पुरुष तर तीन महिलांचा समावेश आहे.
तर तर आज सकाळी संगमनेर तालुक्यात पुन्हा 19 रुग्णांची भर पडली आहे. त्यात शहरात कुरणरोड येथे 67 वर्षीय पुरुष तर गोल्डन सिटी येथे 21 वर्षीय पुरुष तर साळीवाडा येथे 30 वर्षीय महिला तर खंडोबा गल्ली येथे 65 वर्षीय पुरुष तर घासबाजार येथे 36 वर्षीय महिला व 10 आणि 5 वर्षीय बालीकेला कोरोनाची बाधा झाली आहे तर नंदनवन कॉलनी येथे 65 वर्षीय महिला तर माळीवाडा येथे 70 व 49 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर आज सकाळी आलेल्या अहवालात तालुक्यात 9 रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये जवळेबाळेश्वर येथे 29 वर्षीय पुरुष तर साकुर येथे 65 वर्षीय महिला तर घुलेवाडी येथे 50 वर्षीय पुरुष व घारगाव येथे 55 वर्षीय पुरुष तर पानोडी येथे 55 वर्षीय महिला व मेंढवन येथे 65 वर्षीय पुरुष तर चिकणी येथे 28 वर्षीय युवक आणि चंदनापुरी येथे 41 वर्षीय पुरुष व राहणे मळा येथे 29 वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोना बधितांच्या संख्येत आणखी 62 जणांची भर पडुन 1 हजार 493 वर जाऊन पोहचली आहे.
तर आज अकोले तालुक्यात जामगाव येथे 44 वर्षीय पुरुष, हनुमान मंदीरा अकोले येथे 49 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 66 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय महिला, लहित येथे 67 वर्षीय पुरुष, वाघापूर येथे 22 वर्षीय तरुण, धामनगाव पाट 15 वर्षीय बालक, ढोकरी येथे 80 वर्षीय पुरुष, कोंभाळणे येथे 55 वर्षीय पुरुष, म्हाळादेवी येथे 55 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे 50 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय तरूणी, 47 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरुष, महालक्ष्मी कॉलनी येथे 55 वर्षीय पुरुष, ढोकरी येथे 62 वर्षीय पुरुष, हिवरगाव आंबरे येथे 40 वर्षीय पुरुष, अकोल्यातील शेटेमळा येथे 59 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे 60 वर्षीय महिला, 34, 50 व 90 वर्षीय पुरुष, पाडाळणे येथे 67 वर्षीय महिला, अंभोळ येथे 70 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 40 वर्षीय महिला तर अवघ्या पाच वर्षाची बालिक आणि 22 वर्षीय तरुणी, मनोहरपूर येथे 13 व 14 वर्षीय बालक, 17 व 21 वर्षीय तरुणी, 69 वर्षीय महिला, नवलेवाडी येथे 54 वर्षीय पुरुष, 49 वर्षीय महिला, धुमाळवाडी येथे 20 वर्षीय तरुण, खानापूर येथे 53 वर्षीय महिला, तर ढोकरी येथे 48 व 35 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, शेकईवाडी येथे 31 वर्षीय महिला तर राजुरच्या जामगाव येथे 47 वर्षीय महिला अशा 40 जणांचे रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आजकाल तालुक्यात सर्व उच्चांकी आकडे समोर येताना दिसत आहे.
महत्वाचे..
सुनो शहर वासियों...!
तर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अकोले नगरपंचायतीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या अकोले शहरामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क रहाणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये विनाकारण गर्दी करू नये. तसेच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. शहरात फिरताना 100 टक्के मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. शहरातील व्यापारी व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत तसेच वय वर्षे 60च्या पुढील नागरिक व वय वर्षे 10 च्या आतील मुलांनी घराबाहेर पडू नये. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर विसर्जनवेळी गर्दी टाळणेकरीता अकोले नगरपंचायत मार्फत शहरातील प्रमुख ठिकाणी घरगुती व सार्वजनिक गणेश मुर्तीचे एकत्रीकरण करुन विधिवत विसर्जन करणेबाबत नियोजन करणेत आलेले आहे. त्यासाठी निर्धारीत केलेल्या जागांमध्ये अकोले शहरातील महात्मा फुले चौक, अगस्ती कमान, व नवलेवाडी फाटा अशी ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. तरी अकोले नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी आपले घरातील गणेश मुर्ती या ठिकाणी आणुन द्याव्यात. अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी 11.00 वाजेपासून ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत या वेळेत सदर ठिकाणी ट्रॅक्टर व ट्रॉली उभे केले जाणार आहेत. अशी माहिती मुख्याधिकार विक्रम जगदाळे यांनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना दिली.
सागर शिंदे
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 87 लाख वाचक)