मतिमंद मुलीवर बलात्कार, बाळ झाले पोटातच मयत.! अकोले तालुक्यात घटना, 5 तासात आरोपी ठोकल्या बेड्या.!

सार्वभौम (अकोले) :-

                 अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका मतिमंद मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केले होते. त्यांनतर ती गर्भवती राहिला असता तीने मृत मुलीस जन्म दिला आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार  अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी या घटनेचा सखोल तपास करुन पप्पू रंगनाथ फलके (रा. ब्राम्हणवाडा मुळवेहरे ता. अकोले) यास बेड्या ठोकल्या आहेत.


                           याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा शिवारात एक महिला व तिची मतिमंद मुलगी अशा दोघी मायलेकी रानात राहत होत्या. पीडित मुलीची आई शेतात गेल्यानंतर ही 32 वर्षीय तरुणी एकटीच घरात राहत होती. त्यावेळी आरोपी पप्पू तेथे येत असे व तिच्याशी गप्पा मारुन तिच्याशी शरिरीक संबंध करीत असे. गेल्या जानेवारी महिन्यापासून त्याने पीडितेवर अनेकदा अत्याचार केले होते. दरम्यान दोन दिवसांपुर्वी पीडित मुलीचे पोट फार दुखत होते.त्यामुळे तिला घारगाव येथे दवाखाण्यात नेण्यात आले. त्यानंतर समजले की, ही मुलगी गर्भवती आहे. त्यानंतर त्या आईला कळेनासे झाले की, हा प्रकार कसा घडला आहे. दरम्यान त्यांनी घरगाव पोलीस ठाणे गाठले. मात्र, या दरम्यान तिला प्रचंड त्रास होऊ लागला असता त्यांनी तिला तत्काळ आळेफाटा येथील रुग्णालयात पाठविले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, या मुलीच्या पाटोत अर्भक असून ते मयत झालेले आहे. त्यामुळे जर या मुलीस वाचवायचे असेल तर तत्काळ याचे अबॉर्शन करावा लागेल. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील प्रक्रिया केली असता ते बाळ मयत असल्याचे समोर आले.           

अकोले तालुक्यातील कारखाना रोड परीसरातील शिवसेना नेते शिवाजीराव शेटे यांचे वडील स्व. विठ्ठल सखाराम शेटे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, 1 मुलगी, तीन सुना, नातवंडे, असा मोठा परीवार आहे.  त्यांच्या अंत्यविधीसमयी राजकीय सामाजिक, शैक्षणिक'  क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 दरम्यान पीडित तरुणीची प्रकृती आता सुस्थितीत असून तिला या प्रकाराबद्दल विचारणा केली असता तिच्या सांगण्याहून हा प्रकार आईच्या लक्षात आला. त्यानंतर तीचे थेट पोलीस ठाणे गाठले. अकोले पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करुन आरोपी पप्पू रंगनाथ फलके यास ताब्यात घेतले. त्यानंतर पीडित मुलीस विचारणा केली असता यानेच हा प्रकार केल्याचे तिने सांगितले. तर आरोपी हा पीडित मुलीच्या घरापासून काही अंतरावर राहणारा आहे. त्यानेच हा प्रकार केल्याचे कबुल केले असून पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या आहेत. आज पुढील चौकशीसाठी त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर गुन्हा दाखल करुन या आरोपीस अवघ्या 5 तासात बेड्या ठोकण्यात अकोले पोलीस यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यात मोठमोठे गुन्हे दाखल झाले खरे. मात्र, अवघे दोन पोलीस अधिकारी असून देखील त्यांनी एकाही गुन्हा पेंडिंग ठेवलेला नाही. त्यामुळे, त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.