नामदारांचे काकांचा कोरोनाने घेतला बळी! संगमनेरात 48 तर अकोल्यात नऊ रुग्णांची भर! गावागावात आखे कुटुंब बाधित
सार्वभौम (संगमनेर/अकोले) :-
संगमनेरात कोरोनाने हाहाकार माजविला असताना भल्याभल्यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. यात नामदार महोदयांच्या काकाश्रींचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झाला आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. तर या काकाश्रींच्या संपर्कात आलेल्या तिघांना आज कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देखील आता उपचार सुरू करण्यात आले आहेत. आज संगमनेर तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. आज एकाच दिवसात 33 रुग्ण रॅपीड अॅन्टीजन टेस्टमधून तर 15 रुग्ण खाजगी रुग्णालयातून अशा 48 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर 20 रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तर अकोले तालुक्यात आज एकाच दिवशी नऊ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने घाबरुन न जाता आपापली काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढते आहे. त्यामुळे, येथील प्रशासन देखील कसोशीने काम करते आहे. मात्र, काही नागरिक अगदी बेजबाबदारपणे वागताना दिसत आहे. तर कोणी लग्न, वाढदिवस, पार्ट्या करताना दिसून येत आहे. संगमनेर आणि अकोले तालुक्यात असे अनेक लग्न आणि बर्थडे पार्ट्या सामाजिक आरोग्याला बाधक ठरल्या आहेत. मात्र, तरी देखील लोक सजगतेने वागताना दिसत नाही. त्यामुळे तालुक्यात रुग्णांची संख्या वाढते आहे. आता संगमनेरात राज्यातील एका मंत्र्याच्या काकांना कोरोनाची बाधा झाली होती. एका खाजगी रूग्णालयात ते उपचार देखील घेत होते. मात्र, त्यांना काल फारच त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांच्याकडे डॉक्टरांचे विशेष लक्ष होते. मात्र, तरी देखील रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे त्यांच्यावर पहाटे शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. दरम्यान घुलेवाडी परिसरात राहणार्या त्यांच्या घरातील आणखी तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, या कुटुंबाने धैर्याने कोरोनाला सामोरे गेले पाहिजे. दरम्यान संगमनेर तालुक्यात आज 48 रुग्ण रुग्ण मिळून आले आहे. त्यात तळेगाव दिघे, पिंपळे, घुलेवाडी, संगमनेर शहर अशा अनेक ठिकाणी सगळे कुटुंब कोरोना बाधीत झाले आहे. तर जोर्वे, कर्हे अशा वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 48 रुग्ण मिळून आले आहेत.
*तोंडाला मास्क लावा
*शक्यतो बाहेर पडणे टाळा
*गर्दीची ठिकाणे टाळा
*सॅनिटायझरचा वापर करा
*दोघांत योग्य अंतर ठेवा
*बोलताना,शिंकताना काळजी घ्या
*लहान वृद्धांना सांभाळा
*प्रशासनाचे नियम पाळा
*बाधित व्यक्तींना धिर द्या
* संरक्षण म्हणून काय कराला
*शक्यतो कोमट पाणी प्या
*शंका वाटल्यास वाफ घ्या
*सकस आहार कायम ठेवा
*काढा पिण्याची सवय ठेवा
*खाण्यात थंड पदार्थ टाळा
*डॉक्टरांशी बोलून निरसन करा
*वारंवार आपले हात धूवा