संगमनेरात 42 तर अकोल्यात एक मयत 6 नवे रूग्ण.!

सार्वभौम (संगमनेर) :-

                         संगमनेर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण समांतर पातळीवर टिकून आहेत. 40 ते 50 या दरम्यानचे रोज रुग्ण मिळून येत आहेत. त्यामुळे, येथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यापेक्षा तो कामय टिकून राहिल असे वाटते आहे. गणपत्ती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर कोरोनाची संख्या फार वाढेल असे वाटत होते. मात्र, त्या तुलनेत अकोले व संगमनेर तालुक्यात फारशी आकडेवारी पुढे गेली नाही. आता बाप्पाने विसर्जनासोबत कोरोनाचे संकट देखील घेऊन जावे. अर्थातच विसर्जनानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणारच आहे. कारण, कितीही नाही म्हटलं तरी संगमनेर आणि अकोले मार्केट या दहा दिवसात फुल होते. मात्र, तुलनात्मक अकोल्यात त्याचा तोटा कोठे जाणवला नाही. मात्र, संगमनेरात एकाच दिवशी 84 पर्यंत रुग्ण जाऊन पोहचले. त्यामुळे, नागरिकांचा बेजबाबदारपणा येथे पहायला मिळाला.

तर आज संगमनेर तालुक्यात 42 रुग्ण मिळून आले आहेत. त्यात शिवाजीनगर येथे, 34, 55 व 61 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 64 वर्षीय पुरुष, स्वामीसमर्थ नगर येथे 40 वर्षीय पुरुष, उपासनी गल्ली येथे 15 वर्षीय बालक व 35 वर्षीय महिला, गणेश नगर येथे 34 वर्षीय महिला, पावबाकी रोड येथे 64 वर्षीय पुरुष तर वडगल्ली येथे 45 वर्षीय महिला, कौठे कमलेश्वर येथे 24 वर्षीय तरुण, आभाळवाडी येथे 29 वर्षीय तरुण, बोटा येथे 31, 34, 36 व 65 वर्षीय पुरुष तसेच 16 वर्षीय बालिका व 24 आणि 27 वर्षीय तरुणी, चंदनापुरी येथे 7 व 13 वर्षीय बालक तर अवघ्या 3 वर्षाची चिमुरडी त्याच बरोबर 26, 24, 25 वर्षीय तरुणी तर 36 व 40 वर्षीय महिला आणि 32 वर्षीय पुरुष, शिबलापूर येथे 20 वर्षीय तरुण व 42 वर्षीय पुरुष, पानोडी येथे 27 वर्षीय तरुण, सोनेवाडी येथे 59 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे अवघ्या 05 वर्षीचा मुलगा, 27 वर्षीय तरुणी, निमोण येथे 52 वर्षीय पुरुष, जोर्वे येथे 57 वर्षीय पुरुष, कौठे धांदरफळ येथील 55 वर्षीय पुरुष, कनोली येथे 50 वर्षीय पुरुष, जाखुरी येथे 36 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे 80 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष आणि हिवरगाव पावसा येथे 45 वर्षीय पुरुष अशा 42 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

                       आज अकोले तालुक्यात सहा रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर धुमाळवाडी येथे राहणार्‍या 69 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. हा व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून संगमनेर येथे अ‍ॅडमिट झाला होता. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना तत्काळ संगमनेरला हलविण्यात आले होते. त्याची माहिती स्थानिक प्रशासनाला नव्हती. मात्र, जेव्हा संगमनेरमध्ये त्यांची तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर स्थानिक प्रशासनाला माहिती कळताच त्यांनी धुमाळवाडी परिसरात मयत व्यक्तींच्या संपर्कात जे आले होते त्यांची तपसाणी करून घेतली. त्यात अनेकजण पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले होते. आज ज्या व्यक्तीस पहिल्यादा बाधा झाली होती. तो व्यक्ती मयत झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली.

                        तर अज अकोले तालुक्यात पुन्हा सहा रुग्ण मिळून आले आहेत. त्यात पाडाळणे येथे 25 व 33 वर्षीय तरुण तर ब्राम्हणवाडा येथे 56 व 64 वर्षीय पुरुष यांचे रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टमध्ये रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर आज खाजगी लॅबमधून दोन रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यात अकोले शहरात सारडा पेट्रोलपंपाच्या मागे 37 वर्षीय पुरुष व कुंभेफळ येथे 21 वर्षीच्या तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर धुमाळवाडी येथे राहणार्‍या 69 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. हा व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून संगमनेर येथे अ‍ॅडमिट झाला होता. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना तत्काळ संगमनेरला हलविण्यात आले होते.   

आता अकोले तालुक्यात पाहिला रुग्ण लिंगदेव येथे सापडला होता तर दुसरा ढोकरीत आणि गेल्या कित्तेक दिवसानंतर शहराला बाधा झाली ती म्हणजे कारखाना रोडच्या माध्यमातून. त्यानंतर एक-एक गाव बाधित होऊ लागले. आता 191 गावांपैकी 57 गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तर 134 गाव अजुनही कोरोनामुक्त आहे. तर आजवर ढोकरीत 7 रूग्ण, रेडे 16, लिंगदेव 6, पिंपळगाव खांड 4, वाघापूर 7, कोतुळ 46, धामनगाव पाट 3, समशेरपुर 15, पिंपळगाव निपाणी 2, विरगाव 3, जांभळे 6, बोरी 4, ब्राम्हणवाडा 43, काळेवाडी 1, केळुंगण 1, चाँदसुरज 1, देवठाण 17, अकोले शहर 127, चास 7, उंचखडक बु 4, लहित 8, कळंब 2, बहिरवाडी 7, राजूर 6, पेंडशेत 2, गोडेवाडी 3, नवलेवाडी 6, माणिकओझर 21, बदगी बेलापूर 1, निंब्रळ 5, औरंगपूर 2, शेरणखेल 15, चितळवेढे 1, पैठण 1, टाहाकरी 1, कळस बु 9, सुगाव 1, मोग्रस 2, बांगरवाडी 2, इंदोरी 11, म्हाळदेवी 5, धामनगाव आवारी 3, खिरविरे 2, पिसेवाडी 1, विठा 1, हिवरगाव आंबरे 30, मनोहरपूर 18, कुंभेफळ 2, मेहेंदुरी 6, कोहणे (विहीरे) 1, खानापूर 5, अंभोळ 2, जामगाव 1, अंबड 1, गणोरे 1, पाडाळणे 2,  अशा 509 रुग्नांची नोंद आरोग्य विभागाच्या नोंदवहीत करण्यात आली आहे. 

* काय करावे?
*तोंडाला मास्क लावा
*शक्यतो बाहेर पडणे टाळा
*गर्दीची ठिकाणे टाळा
*सॅनिटायझरचा वापर करा
*दोघांत योग्य अंतर ठेवा
*बोलताना,शिंकताना काळजी घ्या
*लहान वृद्धांना सांभाळा
*प्रशासनाचे नियम पाळा
*बाधित व्यक्तींना धिर द्या

* संरक्षण म्हणून काय कराला

*शक्यतो कोमट पाणी प्या
*शंका वाटल्यास वाफ घ्या
*सकस आहार कायम ठेवा
*काढा पिण्याची सवय ठेवा
*खाण्यात थंड पदार्थ टाळा
*डॉक्टरांशी बोलून निरसन करा

*वारंवार आपले हात धूवा