कोरोनाच्या विसर्जनाचा संकल्प करा! अकोल्यात 15 रुग्ण तर संगमनेरात 48 रुग्णांची भर.!
संगमनेर (अकोले/संगमनेर) :-
अकोले व संगमनेर दोन्ही तालुक्यात आज नवे रुग्ण मिळून आले आहेत. अकोल्यात 15 तर संगमनेरात 53 रूग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या 557 इतकी झाली आहे. संगमनेरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता दिसून येत आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी अनेकांनी सतर्क राहणे, स्वत:ची काळजी घेणे, गर्दी टाळणे, शासकीय नियमांचे पालन करणे अशा वेगवेगळ्या नियमांच्या सुचना देत आहे. त्यांचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे. जर संगमनेरमध्ये जनतेच्या बेजबाबदारपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्याचे परिणाम दिर्घकाळ सोसावा लागणार आहे. त्यामुळे, प्रत्येकाने काळजी घ्यावी अशी विनंती प्रशासन नागरिकांना वारंवार करत आहे. त्यामुळे, बाप्पाचे विसर्जन करताना श्रीगणेशाला पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालून कोरोनाचे देशातून कायमचे विसर्जन करायचे आहे.
तर संगमनेर तालुक्यात आज कोरोनाची मोठी आकडेवारी समोर आली आहे. कौठे धांदरफळ 60 वर्षीय पुरुष, मालदाड रोड 54 वर्षीय पुरुष, साईनगर 60 वर्षीय पुरुष, ढोलेवाडी 20 वर्षीय तरुण, 45 वर्षीय महिला व 20 वर्षीय तरुणी, घोडेकर मळा येथे 30 वर्षीय महिला, 4 वर्षीय चिमुकला, 12 वर्षीय मुलगा, 65 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा 65 वर्षीय महिला, 26 वर्षीय तरुण, 40 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द 18 वर्षीय मुलगा, 22 वर्षीय पुरुष, साळीवाडा येथे 36 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, माळीवाडा 45 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, खराडी येथे 13 वर्षीय मुलगा, मालदाड रोड 58 वर्षीय पुरुष, 25 तरुण, 21 त वर्षीय तरुण, मनोलीत 50 वर्षीय महिला, घासबाजार येथे 47 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी 70 वर्षीय पुरुष, सावरगाव तळ 65 वर्षीय पुरुष, सुदर्शन कॉलनी 45 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय तरुणी, पावबाकी रोड 23 तरुण, सुदर्शन कॉलनी 54 वर्षीय पुरुष, गोल्डन सिटी गुंजाळवाडी येथे 7 वर्षीय मुलगा व 32 वर्षीय महिला व 10 वर्षीय मुलगी, सुदर्शन कॉलनी येथे 42 वर्षीय महिला, मालदाड रोड 69 वर्षीय पुरुष, साकुर 57 वर्षीय महिला व 27 वर्षीय तरुण, गणेशनगर येथे 44 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथे 37 वर्षीय पुरुष, कुरण 52 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडीत 41 वर्षीय पुरुष, मनोली 52 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, घुलेवाडी 47 वर्षीय महिला अशा 48 जणांचे रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यात आता संख्या 1 हजार 704 इतकी झाली आहे.
तर आज अकोले तालुक्यात गणोरे येथे 38 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, 08 वर्षीय मुलगा, पिंपळगाव निपाणी येथील 30 वर्षीय पुरूष तर वारंघुशी येथे 35 वर्षीय पुरूष, 45 वर्षीय महीला धुमाळवाडी येथे 65 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय मुलगा, 31 वर्षीय महीला, गर्दणी येथे 60 वर्षीय पुरुष व धुमाळवाडी येथे 35 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे 57 वर्षीय महीला, कोतुळ येथे 30 वर्षीय महीला, 16 वर्षीय तरुणी, 15 वर्षीय बालक अशा 15 व्यक्तीचा कोरोना अहवाल आज पॅाझिटीव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील आजवर एकुण रुग्णसंख्या 527 वर गेली आहे.
तर अहमदनगर जिल्ह्यात आज 419 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 17 हजार 176 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता 81.60 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 465 ने वाढ झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 584 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 131, अँटीजेन चाचणीत 139 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 195 रुग्ण बाधीत आढळले आहेत. तर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 69, संगमनेर 24, पाथर्डी 01, नगर ग्रामीण 03, नेवासा 01, पारनेर 07, अकोले 03, राहुरी 02, शेवगाव 19 आणि मिलिटरी हॉस्पिटल 02 अशा रुग्णांचा समावेश आहे. तसेच अँटीजेन चाचणीत आज 139 जण बाधित आढळून आले आहते. त्यामध्ये, मनपा 03, राहाता 15, पाथर्डी 01, नगर ग्रामीण 19, श्रीरामपुर 18, नेवासा 36, श्रीगोंदा 01, अकोले 09, शेवगाव 01, कोपरगाव 18, जामखेड 03 आणि कर्जत 15 अशा रुग्णांचा समावेश आहे.
तर या व्यतिरिक्त खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 195 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. त्यामध्ये, मनपा 113, संगमनेर 12, राहाता 06, पाथर्डी 01, नगर ग्रामीण 14, श्रीरामपुर 15, नेवासा 10, श्रीगोंदा 01, पारनेर 08, अकोले 01, राहुरी 08, शेवगाव 02, कोपरगांव 01, जामखेड 01 आणि कर्जत 02 अशा रुग्णांचा समावेश आहे. तर सध्या जिल्ह्यात एकूण 3 हजार 584 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये, मनपा 1 हजार 335, संगमनेर 264, राहाता 234, पाथर्डी 90, नगर ग्रा. 235, श्रीरामपूर 173, कॅन्टोन्मेंट 58, नेवासा 142, श्रीगोंदा 146, पारनेर 90, अकोले 150, राहुरी 99, शेवगाव 96, कोपरगाव 209, जामखेड 116, कर्जत 105, मिलिटरी हॉस्पीटल 36 आणि इतर जिल्हा 06 अशा रुग्णांचा समावेश आहे. तसेच आज 419 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, यामध्ये, मनपा 142, संगमनेर 18, राहाता 11, पाथर्डी 23, नगर ग्रा.15, श्रीरामपूर 22, कॅन्टोन्मेंट 08, नेवासा 14, श्रीगोंदा 19, पारनेर 18, अकोले 23, राहुरी 06, शेवगाव 10, कोपरगाव 53, जामखेड 24, कर्जत 13 अशा रुग्णांचा समावेश आहे तर आतापर्यंत, एकूण 17 हजार 176 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये, मनपा 7 हजार 98, संगमनेर 1 हजार 374, राहाता 784, पाथर्डी 855, नगर ग्रा. 1 हजार 73, श्रीरामपूर 693, कॅन्टोन्मेंट 475, नेवासा 612, श्रीगोंदा 651, पारनेर 691, अकोले 366, राहुरी 338, शेवगाव 490, कोपरगाव 679, जामखेड 417, कर्जत 486, मिलिटरी हॉस्पीटल 73, इतर जिल्हा 20 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे आणि आतापर्यंत कोरोना मुळे 290 रुग्ण दगावले आहेत. यामध्ये, मनपा 122, संगमनेर 27, राहाता 10, पाथर्डी 10, नगर ग्रा.17, श्रीरामपूर 15, कॅन्टोन्मेंट 11, नेवासा 09, श्रीगोंदा 13, पारनेर 13, अकोले 03, राहुरी 12, शेवगाव 07, कोपरगाव 08, जामखेड 07 आणि कर्जत 06 अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यात बरे झालेली रुग्ण संख्या 17 हजार 176 असून उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या 3 हजार 584 इतकी असून 290 जणांचा मृत्यु झाला आहे. तर आजवर एकूण रूग्ण संख्या 21 हजार 5 इतकी आहे.
---------------------------------------
धन्यवाद.! मी सागर शिंदे, आपण माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांचा मी ऋणी आहे. प्रत्येकाला रिप्लाय देणे गृप पाहणे, ज्यांनी बोलविले त्यांच्यापर्यंत पोहचणे शक्य झाले नाही. मात्र, आपल्या भावना माझ्यापर्यंत पोहचल्या आहेत. आपण फोन, मेसेज, व्हॉटसअॅप, फेसबुक व प्रत्येक्ष भेटून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपला मी शतश: आभारी आहे.