अकोले शहरातला पुन्हा बाधा! इंदोरी, निंब्रळ म्हळदेवी बाधित! तर संगमनेरात तब्बल 40 रुग्ण, पोलिसांना डिस्चार्ज.!

- शंकर संगारे
सार्वभौम (अकोले) :-
                    अकोले तालुक्यात इंदोरी परिसरात जो रूग्ण मिळून आला होता, त्याच्या संपर्कात आणखी दोन दोघा पतीपत्नी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर एकजण निंब्रळ येथील असून अकोले शहरातील शिवाजी चौकात एक रुग्ण कोरोना बाधित मिळून आला आहे. या व्यतिरिक्त म्हळादेवी येथे देखील एका रुग्ण कोरोनाचा मिळून आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात कोरोनाची संख्या 170 री पार करुन गेली आहे. त्यामुळे अकोल्यात बाधितांचे प्रमाण वाढते असून बरे होणार्‍यांची संख्या कमी होत चालली आहे.  
          तर संगमनेरात शहरासह तालुक्यात आज 40 रुग्णांची भर पडली आहे. त्यात रहेमतनगर, जाणतारोड परिसर, श्रमीकनगर, मालदाड रोेड येथे तीन अहवाल, धांदरफळ येथे एक महिला, आंबी खालसा येथील अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच शहरात मालदाड रोड, रंगारगल्लीत पाच, इंदिरानगर येथे चार, उपासनीगल्ली एक, चिखली एक, घुलेवाडीत सहा, नान्नज दुमारला येथे दोन, वडगाव पान येथे नऊ तर पोखरी येथे दोन असे 32 तर खाजगी प्रयोगशाळेतून 8 असे 40 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे संगमनेरात कोरोना बाधितांची संख्या आता 909 वर जाऊन पोहचली आहे. 
दरम्यान संगमनेरात कैद्यांच्या नंतर पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. शहर पोलीस ठाणे, पोलीस उपाधिक्षक कार्यालय, आश्वी पोलीस ठाणे आणि शहर वाहतूक शाखा अशा 15 पेक्षा जास्त पोलिसांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. मात्र, मोठ्या जिकरीने या पोलिसांनी कोरोनाशी केलेले युद्ध जिंकले आहे. शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भित! असे म्हणत आज त्यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
           
यावेळी त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. तर कोणी कोरोनाला घाबरु नये. उगच पैसा आडका खर्च करण्यापेक्षा प्रशासनाच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवावा, त्यांच्या सुचनांचे पालन करावे. या आजाराला घाबरुन न फक्त धैर्याने सामोेरे जावे तर प्रत्येक ठिकाणी काळजी घ्यावी. तसेच सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी हे स्वत: आपल्या कर्मचार्‍यांना घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यांनी सर्वांना पुष्पगुच्छ देऊन आपल्या कोविड योद्ध्यांचे स्वागत केले आहे. तर डॉक्टरांचे देखील त्यांनी आभार मानले आहे. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी देखील खाकीतील कोविड योद्ध्यांचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर हात ठेऊन लढण्याची उर्मी दिली.
           दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे बाधीत रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य होत आहे.  आज जिल्ह्यात एकूण ७५७ रूग्ण आढळून आले. यात,  जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब ४८, अँटीजेन चाचणीमध्ये ४०२ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत ३०७ रूग्ण बाधीत आढळून आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना टेस्ट लॅब आणि अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून ४५ हजार १७२ तपासण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी वावरताना आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, आज ७५७ बाधीत आढळून आल्याने आता उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २ हजार ९७६ इतकी झाली आहे तर जिल्ह्यात आज ३८५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४ हजार ९६५ इतकी झाली असून रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ६१.७५  इतकी झाली आहे.
   
    तर काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३८ रुग्ण बाधित आढळून आले बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये  श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर १७, राहुरी ०२,  मनपा ०५,  कॅन्टोन्मेंट ०५, पारनेर ०५, नेवासा ०१, कोपरगाव ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यानंतर आणखी १० जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहर ०४, नगर ग्रामीण ०१ - आलमगीर भिंगार, श्रीगोंदा  ०१ - बेलवंडी, कर्जत ०२- राशीन ०२, जामखेड ०१ - कोर्ट गल्ली, जामखेड, पाथर्डी ०१- जवखेडे, असे रूग्ण आढळून आले. तर अँटीजेन चाचणीत आज ४०२ जण बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये, मनपा ३६, संगमनेर १८,  राहाता ६२, पाथर्डी ४०, नगर ग्रामीण २८, श्रीरामपुर १५,  कॅन्टोन्मेंट १०,  नेवासा १७,  श्रीगोंदा २७, पारनेर २०, अकोले ०१, राहुरी ०३,  शेवगाव ३०,  कोपरगाव ६१, जामखेड १७ आणि कर्जत १७ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३०७i रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २६४, संगमनेर ०९, राहाता ०४, पाथर्डी ०३,  नगर ग्रामीण ०४, श्रीरामपूर ०७, नेवासा ०४, श्रीगोंदा ०२, पारनेर ०४, अकोले ०२, राहुरी ०२, शेवगाव ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज एकूण ३८५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १८९, संगमनेर ३१, राहाता १४, पाथर्डी २५, नगर ग्रामीणचे २४, श्रीरामपूर २९, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २४, श्रीगोंदा २, पारनेर ८, अकोले २, शेवगाव २, कोपरगाव ३, कर्जत १९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे बरे झालेले एकूण रुग्ण ४ हजार ९६५ झाले आहेत. तर उपचार सुरू असलेले रूग्ण २ हजार ९७६ इतके आहेत.  तर आजवर मृत्यू झालेल्यांची संख्या ९४ इतकी आहे.  तर एकूण रूग्ण संख्या ८ हजार ०३५ इतकी असल्याची माहिती नोडल अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर यांनी दिली आहे.