जमिनीच्या वादात येथे रोज रक्तपात होतो आहे. तिघांना बेदम मारहाण! संगमनेरात सात जणांवर गुन्हा दाखल!


सार्वभौम (संगमनेर) :- 
                       संगमनेर शहरातील पावबाकी परिसरात झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कारणाहून दोन गटात वाद झाले. यात सात जणांनी एका महिलेसह तिघांना दगड व लाकडी दांड्याने मारहण केली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी दि. 4 रोजी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत चंद्रकला सुनिल सातपुते व त्यांचा पती तसेच दिर अशा तिघांना मार लागला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
                      याबाबत सविस्तर माहिती अशी की, सागर भाऊसाहेब सातपुते व सुनिल सातपुते यांची शेजारी-शेजारी जमीन आहे. त्यांच्या सामाईक बांधावर एक झाड असून त्याच्या फांद्या तोडण्याच्या कारणाहून दोन्ही नेत्यागोत्यात वाद झाले होते. त्यामुळे आरोपी सागर भाऊसाहेब सातपुते, भाऊसाहेब मनाजी सातपुते, स्वप्नील गडाख व त्याच्या अन्य दोन साथिदार, सरुभाई भाऊसाहेब सातपुते, मंदाबाई सातपुते, अश्वीनी सातपुते या सर्वांनी मिळून हातात काठ्या घेऊन चंद्रकाला व त्यांच्या दिरास शिविगाळ दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सागर सातपुते याने सुुनिल सातपुते आणि चंद्रकाला यांचा दिर यांना दगडने मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे.
               दरम्यान संगमनेरात शेतीच्या वादाहून होणारे प्रकार काही थांबता थांबत नाही. एकीकडे कोरोनाचे संगमनेरात अव्वल स्थान गाठले आहे तर दुसरीकडे जमिनीच्या वादात आणि कत्तलखाणे यात देखील संगमनेर अव्वल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी यावर योग्य उपायोजना राबविल्या पाहिजे. कारण, येथे जमिनीच्या किरकोळ वादातून रोज रक्त सांडते आहे. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे.