अकोल्यात नगरसेविकाच्या बहिनीचा कोरोनाने मृत्यु.! हा चौथा बळी तर संख्या 174 वर पोहचली.!


सार्वभौम (अकोले) :- 
                अकोले शहरातील एका नगरसेविकेच्या बहिनीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आज रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयातून ही माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, हा मृत्यू कोरोनाच्या कागदावर आला असला तरी या महिलेस यापुर्वी बर्‍याचशा आजारांंनी ग्रासलेले होते. त्यामुळे, कोविडशी लढता-लढता या भगिनिने आज अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात कोरोनाचा हा चौथा बळी गेला असून आजवर 174 रुग्ण तालुक्यात मिळून आले आहेत.
                     याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या दिड वर्षीपासून अकोले शहरातील पेठेत राहणार्‍या एका महिलेला काही आजारांनी ग्रासले होते. तेव्हापासून त्या आजारी होत्या. मात्र, जेव्हापासून कोविड-19 ची परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हापासून या ताईसाहेबांची त्यांच्या घरच्यांनी फार काळजी घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपुर्वी त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला असता त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, तेथे गेल्यानंतर त्यांना योग्यते सहकार्य झाले नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून सहकार्य करण्याची विनंती केली होती. संबंधित लोकप्रतिनिधींनी जिल्हा रुग्णालय आणि महसूल खात्याशी संपर्क देखील साधला होता. मात्र, फार काळ त्या कोरोनाशी झुंज देऊ शकल्या नाही.
                    दरम्यान सायंकाळी त्यांना जास्त त्रास होत असल्याची माहिती मिळाली होती. तर रात्री त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत प्रशासनाला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित व्यक्ती मयत झाली असून त्यांच्यावर नगरला अंत्यसंस्कार केले आहेत. याबाबत त्यांच्या घरच्यांना माहिती देण्यात आली आहे. तर हिच माहिती स्थानिक प्रशासनाला विचारली असता त्यांनी मयत व्यक्तीच्या पॉझिटीव्ह रिपोर्टबाबत दुजोरा दिला आहे. तर त्यांच्यासोबत जे दोन व्यक्ती होते. त्यांना उद्या खानापूर येथील कोविड सेंटर येथे क्वारंटाईन करण्यात येणार आहे. अशी माहिती आधिकार्‍यांनी दिली आहे. ही व्यक्ती दिर्घ अजाराने ग्रासलेली होती. त्यामुळे कोविड पेक्षा त्यांना अन्य त्रास जास्त होता. म्हणून कोणी यासंदर्भात अफवा पसरवू नये. त्यांचा कोणाशाही संपर्क आलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घ्या, अर्धवट माहिती पसरवू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे.