अकोल्यात कोरोनाचे 40 तर संगमनेरात 19 रुग्ण.! अँन्टीजनमुळे संख्या वाढली.!
अकोले तालुक्यात आज कोरोनाचे अक्षरश: थैमान घातल्याचे पहावयास मिळाले आहे. आज एकाच दिवशी 40 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जेथे रुग्ण वाढतील तेथील पीएससीवर आता तपासणी होणार आहे. त्यामुळे, जितके तपासणी संख्या होईल तितके लोक बाधित मिळून येणार आहे. त्यामुळे, असे झाले तर बाधित असणारा व्यक्ती लवकर डिटेक्ट झाला तर त्याच्यापासून प्रादुर्भाव होणे टळणार आहे. त्यामुळे, हे रुग्ण सापडून येतात म्हणून घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नाही. बाधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे हाच कोरोनाला नष्ट करण्याचा वास्तव मार्ग आहे. त्यामुळे, घाबरु नका, सामोरे जा, काळजी घ्या, असा संदेश प्रशासनाने दिला आहे. तर हीच परिस्थिती संगमनेरात पहावयास मिळते आहे. मात्र, दुर्दैवाने येेथे रोज तोच वाढता आकडा असल्यामुळे, लोक काळजी घेतात की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण, काल 36 आल्यानंतर आज पुन्हा सकाळी 19 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
त्यात अकोले तालुक्यात जामगाव येथे 44 वर्षीय पुरुष, हनुमान मंदीरा अकोले येथे 49 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 66 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय महिला, लहित येथे 67 वर्षीय पुरुष, वाघापूर येथे 22 वर्षीय तरुण, धामनगाव पाट 15 वर्षीय बालक, ढोकरी येथे 80 वर्षीय पुरुष, कोंभाळणे येथे 55 वर्षीय पुरुष, म्हाळादेवी येथे 55 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे 50 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय तरूणी, 47 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरुष, महालक्ष्मी कॉलनी येथे 55 वर्षीय पुरुष, ढोकरी येथे 62 वर्षीय पुरुष, हिवरगाव आंबरे येथे 40 वर्षीय पुरुष, अकोल्यातील शेटेमळा येथे 59 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे 60 वर्षीय महिला, 34, 50 व 90 वर्षीय पुरुष, पाडाळणे येथे 67 वर्षीय महिला, अंभोळ येथे 70 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 40 वर्षीय महिला तर अवघ्या पाच वर्षाची बालिक आणि 22 वर्षीय तरुणी, मनोहरपूर येथे 13 व 14 वर्षीय बालक, 17 व 21 वर्षीय तरुणी, 69 वर्षीय महिला, नवलेवाडी येथे 54 वर्षीय पुरुष, 49 वर्षीय महिला, धुमाळवाडी येथे 20 वर्षीय तरुण, खानापूर येथे 53 वर्षीय महिला, तर ढोकरी येथे 48 व 35 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, शेकईवाडी येथे 31 वर्षीय महिला तर राजुरच्या जामगाव येथे 47 वर्षीय महिला अशा 40 जणांचे रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आजकाल तालुक्यात सर्व उच्चांकी आकडे समोर येताना दिसत आहे.
तर आज सकाळी संगमनेर तालुक्यात पुन्हा 19 रुग्णांची भर पडली आहे. त्यात शहरात कुरणरोड येथे 67 वर्षीय पुरुष तर गोल्डन सिटी येथे 21 वर्षीय पुरुष तर साळीवाडा येथे 30 वर्षीय महिला तर खंडोबा गल्ली येथे 65 वर्षीय पुरुष तर घासबाजार येथे 36 वर्षीय महिला व 10 आणि 5 वर्षीय बालीकेला कोरोनाची बाधा झाली आहे तर नंदनवन कॉलनी येथे 65 वर्षीय महिला तर माळीवाडा येथे 70 व 49 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर आज सकाळी आलेल्या अहवालात तालुक्यात 9 रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये जवळेबाळेश्वर येथे 29 वर्षीय पुरुष तर साकुर येथे 65 वर्षीय महिला तर घुलेवाडी येथे 50 वर्षीय पुरुष व घारगाव येथे 55 वर्षीय पुरुष तर पानोडी येथे 55 वर्षीय महिला व मेंढवन येथे 65 वर्षीय पुरुष तर चिकणी येथे 28 वर्षीय युवक आणि चंदनापुरी येथे 41 वर्षीय पुरुष व राहणे मळा येथे 29 वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात एकुण कोरोना बाधीतांची संख्या जुलै-ऑगस्ट महिन्यात झपाट्याने वाढ होऊन 1 हजार 450 वर जाऊन पोहचली आहे.