संगमनेरात पुन्हा 19 रुग्णांची भर.! अकोल्यात प्रतिबंधासाठी मोठा निर्णय, कोरोना तपासणी आता तुमच्या दारी.!

सार्वभौम (संगमनेर) :- 

                    संगमनेरमध्ये काल रात्री आलेल्या अहवालात 36 रुग्ण आढळून येत नाही तेच आज सकाळी पुन्हा 19 रुग्ण नव्याने कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसात शहरामध्ये कोरोना आटोक्यात आल्याचे दिसून येत होते. परंतु आज सकाळी आलेल्या अहवालात शहरात 10 रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी अधिक दिसून येत होता तेथे पुन्हा कोरोनाबाधीत रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. तर अकोले तालुक्यात तहसिलदार मुकेश कांबळे व आरोग्य अधिकारी इंद्रजित गंभीरे यांनी एक नवा फंडा काढला आहे. पुर्वी कोरोनाची तपासणी करण्यासाठी थेट नगर जिल्ह्यात जावे लागत होते. त्यानंतर ती सुविधा थोडी जवळ म्हणजे संगमनेर येथे करण्यात आली. मात्र, तरी देखील काही आडथळे निर्माण होऊ लागले त्यानंतर पुढील उपायोजना म्हणून थेट अकोले शहरालगत खानापूर येथे कोविड सेंटर उभे करण्यात आले तर तेथेच कोरोनाची रॅपीड अँन्टीजन टेस्ट होऊ लागली. आता त्यापेक्षा प्रशासनाने नगारिकांचे टेन्शन दुर करण्यासाठी आणखी भारी उपायोजना केली आहे. ती अशी की, अकोले तालुक्यात एकूण 10 पीएससी आहेत. ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होतो, त्या भागात आता तुम्हाला तुमच्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तुमची तपासणी होणार आहे. त्यामुळे, ना तुमच्या दारात अ‍ॅम्ब्युलन्स येईल ना तुम्हाला सामाजिक हेटाळणीला सामेरे जावे लागेल. तसेच ना तुम्हाला तपासणी करण्यासाठी इकडे-तिकडे भटकावे लागेल. त्यामुळे, आता तपासणी तुमच्या दारी असे म्हटले तरी काही वावघे ठरणार नाही. काल तालुक्यात कोतुळ, ब्राम्हणवाडा, देवठाण, खानापूर, म्हाळदेवी, समशेरपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी केंद्र केले आहे. विशेष म्हणजे आज जितके रूग्ण सापडणार आहे. तितके रुग्ण कमी होऊन तालुका कोरोनामुक्त होण्यासाठी मदत होणार आहे.  

 शहरात कुरणरोड येथे 67 वर्षीय पुरुष तर गोल्डन सिटी येथे 21 वर्षीय पुरुष तर साळीवाडा येथे 30 वर्षीय महिला तर खंडोबा गल्ली येथे 65 वर्षीय पुरुष तर घासबाजार येथे 36 वर्षीय महिला व 10 आणि 5 वर्षीय बालीकेला कोरोनाची बाधा झाली आहे तर नंदनवन कॉलनी येथे 65 वर्षीय महिला तर माळीवाडा येथे 70 व 49 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर आज सकाळी आलेल्या अहवालात तालुक्यात 9 रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये जवळेबाळेश्वर येथे 29 वर्षीय पुरुष तर साकुर येथे 65 वर्षीय महिला तर घुलेवाडी येथे 50 वर्षीय पुरुष व घारगाव येथे 55 वर्षीय पुरुष तर पानोडी येथे 55 वर्षीय महिला व मेंढवन येथे 65 वर्षीय पुरुष तर चिकणी येथे 28 वर्षीय युवक आणि चंदनापुरी येथे 41 वर्षीय पुरुष व राहणे मळा येथे 29 वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात एकुण कोरोना बाधीतांची संख्या जुलै-ऑगस्ट महिन्यात झपाट्याने वाढ होऊन 1 हजार 450 वर जाऊन पोहचली आहे.                                


                       तर आज सकाळी नव्याने तीन रुग्ण मिळून आले आहेत. त्यात ढोकरी येथे 80 व 65 वर्षीय पुरूष यांचे शिर्डी येथून रिपोर्ट प्राप्त झाले आहे. तर कोंभाळणे येथे 55 वर्षीय पुरुष, राजुरच्या जवळील जामगावात 44 वर्षीय पुरुष आणि म्हाळदेवी येथे 50 वर्षीय पुरुष अशा एकूण पाच जणांचे खाजगी अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. आता जसजशी बाधितांची संख्या वाढते आहे तसतसे प्रशासनाचे गोंधळ उडताना दिसतो आहे. त्यामुळे, नियोजनाचा आभाव आणि आकडेवारीत संदिग्धता हे वारंवार समोर येऊ लागले आहे. मात्र, ज्याला कोणाला त्रास होत असेल किंवा बाहेर तपासणीला जात असेल त्यांनी किमान स्थानिक प्रशासनाला माहिती दिली पाहिजे. जेणे करुन आपल्यामुळे आपल्या गावात किंवा कुटुंबाला त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. मात्र, असे न होता आजही नागरिकांमध्ये बेजबाबदारपणा दिसून येत आहे. 
             दरम्यान, संगमनेर शहरातील गल्लीबोळासह तालुक्यातील 96 गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. शहरात आजपर्यंत 604 रुग्ण आढळून आले आहे. तर तालुक्यात 846 रुग्ण आढळून आले आहे.सुरवातीस लॉकडाऊनच्या काळात जिथे कोरोनाबाधीत रुग्ण सापडले नाही तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव आता दिसून येत आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यात कोरोनाबधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन 23 गावांमध्ये दोन अंकी आकडे कोरोनाबाधीत सापडले आहेत. तर कुरण मध्ये सुरवातीस कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक दिसून आला होता पण तो आता थंडवला आहे. कुरण येथे आजपर्यंत 60 रुग्ण आढळून आले आहे. परंतु घुलेवाडी येथे कोरोना थांबायचे नाव घेत नाही. येथे थेंबे-थेंबे तळेसाचे असाच काहीसा प्रकार दिसून येत आहे. तेथे रोजच कोरोनाबधित रुग्ण आढळून येत आहे. घुलेवाडी येथे  आज अखेरपर्यंत 97 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहे. येथे कोरोनाबाधितांनी उच्चटन गाठले आहे. मात्र, प्रशासन येथे कसोनीशी प्रयत्न करत आहे. पण येथे सोसायटी मोठ्या प्रमाणात असल्याने येणार्‍या-जाणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रशासनाची येथे दिवसं-दिवस डोके-दुखी वाढत आहे.

- सुशांत पावसे