अकोले शहरात 4 रुग्ण, कळस झाले बाधित कोतुळचे रुग्ण वाढले.! तालुक्यात 16 रुग्णांची भर.!


सार्वभौम (अकोले) :- अकोले तालुक्यात, कोतुळ, हिवरगाव आणि कारखाना रोड येथे कोरोनाने नागरिकांना आता हैराण केले आहे. आज अकोले तालुक्यात पुन्हा नव्याने 16 रुग्णांची भर पडली आहे. हे सर्व एकमेकांच्या संपर्कात आलेले बधित रुग्ण आहे. त्यामुळे तालुक्यात आता कोरोना बाधितांची संख्या 275 इतकी झाली आहे. तर आठ जणांचा मृत्यु झाला आहे. आज सकाळपासून अकोले तालुक्यातील खानापूर कोविड सेंटर येथे 130 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यात 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर कोतुळचा एका रिपोर्ट संगमनेर येथून प्राप्त झाला आहे.

                             आज प्राप्त झालेल्या अहवालात मनोहरपूर येथे 15 वर्षीय तरुण, 40 वर्षीय पुरुष तर 34 वर्षीय महिला अशा तिघांना बाधा झाली आहे. तर हिवरगावला कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. तेथे आज पुन्हा अवघ्या 8 वर्षीय मुलीस, 51 वर्षीय पुरुष तर 46 वर्षीय महिलेसा कोरोनाचा प्रुदुर्भाव झाला आहे. तसेच गेल्या कित्तेक दिवसांपासून कळस हे सुरक्षित होते. आता मात्र तेथे 30 वर्षींय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तसेच अकोले शहराच्या लगत असणार्‍या कारखाना रोडचे कोरोना ग्रहन काही सुटता सुटत नाही. तेथे आज पुन्हा संपर्कात असलेल्या चौघांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात 42 वर्षीय पुुुरुष, 71 वर्षीय पुुुरुष, 16 वर्षीय बालक, 12 वर्षीय बालिका, देवठाण येथे 85 वर्षीय पुरुष तसेच कोतुळ येथे 41 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय तरुण, 45 वर्षीय महिला तर 56 वर्षीय पुुुरुष अशा 16 जणांना आज कोरोनाची लागण झाली आहे.

 

दरम्यान अकोले तालुक्यात कोरोनाचे काही ठराविक गावे बाधित होताना दिसत आहे. कदाचित त्यांच्यामुळे अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यामुळे तेथे स्थानिक व्यक्तींना ही साखळी तुटण्यासाठी काहीतरी उपायोजना करणे अपेक्षित आहे. जर काही दिवस येथील नागरिकांनी स्वत:ला होमक्वारंटाईन करुन घेतले तर त्याचा प्रदुर्भाव पुढे वाढणार नाही. मात्र कालच अगदी याच आठवड्यात कोतुळ येथून लग्नाचे वर्‍हाड संगमनेरला जात असेल आणि त्याच गावात कोरोनाचे रोज चार-पाच रुग्ण सापडत असेल तर प्रत्येकाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. असे न झाल्यास तालुक्यातील कोरोना हाताबाहेर जाऊ शकतो. त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी योग्य नियोजन व कठोर भुमिका घेणे आवश्यक आहे असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे.

- महेश जेजूरकर