बाप्पा.! कोरोनाचे राज्य जाऊदे आणि बळीचे राज्य येऊ दे.! संगमनेरला 30 कोरोना बाधित तर अकोल्यात 12 जणांना बाधा.!
सार्वभौम (संगमनेर) :- संगमनेरात श्रीगणेशाच्या आगमनानंतर कोरोनाचे देखील दमदार आगमन आज झाले आहे. संगमनेरात 30 तर अकोल्यात 12 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकीकडे बहुतांशी घरात बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात आज आनंदाचे वातावरण आहे. मात्र, ज्यांच्या घरात कोरोनाचे आगमन झाले आहे. त्यांना आधार देण्याचे उत्तरदायीत्व आपले आहे हे कोणी विसरता कामा नये. तर, कोरोनाच्या भितीपोटी अनेक मंदिरे बंद झाली आहेत. तर काही ठिकाणी देवांना देखील मास्क लावण्यात आले आहेत. त्यामुळे, बाप्पा तुम्हाला बेजबाबदारपणे वागण्याचे संदेश देत नाही. तर उलट गर्दी करु नका, सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी करा, सॅनिटायझरचा वापर करा. सार्वजानिक ठिकाणी जाण्याचे टाळा, योग्य आहार घ्या, घरातील वृद्ध व बालकांची काळजी घ्या.! अशा प्रकारच्या प्रशासकीय नियमांचे पालन हेच गणरायासाठी महत्वाचे असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्या संकटावर मात करण्यासाठी बाप्पा आपल्याला बळ देईल. यात शंका नाही. फक्त आपण नियमांचे पालन करु व विनंती करु की, बाप्पा ईडा पिडा जाऊदे आणि पुन्हा नगरिकांना स्वातंत्र्य उपभोगणारे राज्य निर्माण होऊदे.!
आज अकोले शहरातील महालक्ष्मी रोडवरील अगस्तीनगर येथे राहणार्या 48 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे 69 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 56 वर्षीय महीला, कोतुळ येथे 67 वर्षीय पुरुष, अशी चार व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला. तर कोतुळ ग्रामीण रूग्णालयात घेण्यात आलेल्या रॅपिड अँन्टीजन टेस्टमध्ये ब्राम्हणवाडा येथे 68 वर्षीय पुरूष, 62 वर्षीय महीला 80 वर्षीय पुरूष, 68 वर्षीय महीला, चास येथील 32 वर्षीय महीला अशी पाच तर देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या रॅपिड अँन्टीजन टेस्टमध्ये हिवरगाव आंबरे येथे 50 वर्षीय पुरूष व 09 वर्षीय लहान मुलगा अशा दोन व्यक्ती पॅाझिटीव्ह आल्यात आहेत. तसेच संगमनेर येथील कोविड सेंटरच्या अँन्टीजन टेस्टमध्ये तालुक्यातील चितळवेढे येथे 30 वर्षीय तरुणाचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यात आज खाजगी प्रयोगशाळेत 04 व अँन्टीजन टेस्ट मध्ये 08अशी एकुण 12 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तर तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या 373 झाली आहे.त्यापैकी 245 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे तर 9 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 119 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
तर संगमनेरमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. काल 13 तर आज पुन्हा नव्याने 30 रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. त्यामध्ये शहरात 12 तर तालुक्यात 18 रुग्ण आढळून आले आहे. शहरातील अभिनवनगर येथे 27 वर्षीय महिला तर खंडोबा गल्ली येथे 50 वर्षीय पुरुष तर संतोषीमाता नगर येथे 28वर्षीय तरुण तर वाडगल्ली येथे 47 वर्षीय पुरुष व कुरण रोड येथे 72 वर्षीय वयोवृद्ध तर विद्यानगर येथे 64 वर्षीय पुरुष तर देवाचा मळा 32 वर्षीय पुरुष व कुंभारगल्ली 31 वर्षीय पुरुष तर जनतानगर 42 वर्षीय महिला तर इंदिरानगर 30 वर्षीय पुरुष व घोडेकरमळा येथे 5 व 2 वर्षीय बालकांस कोरोनाची बाधा झाली आहे. तर ग्रामीण भागात आज हिवरगावपावसा येथे 55 व 42 वर्षीय पुरुष तर पिंपळे येथे 41 वर्षीय पुरुष व शिपलापुर येथे 42 वर्षीय पुरुष तर कोल्हेवाडी येथे 62 वर्षीय पुरुष तर घुलेवाडी येथे सात कोरोनाबाधीत रुग्ण सापडले आहे त्यात चार पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. तर चिकणी येथे 45 वर्षीय पुरुष व सोनुशी येथे 54 वर्षीय पुरुष व चित्तळवेडे येथे 30 वर्षोय पुरुष तर आश्विखु येथे 30 वर्षीय पुरुष व खांबे येथे 27 वर्षीय पुरुष व मनोली येथे 59 वर्षीय पुरुषास कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोनाबधितांच्या संख्येत तीसने भर पडुन 1 हजार 353 वर जाऊन पोहचली आहे.