संगमनेरात माजी नगराध्यक्षाच्या घरात दोन कोरोनाचे रुग्ण! तर आज 29 रुग्णांची भर, अकोल्यात 11 रुग्ण एक मयत !
सार्वभौम (अकोले/संगमनेर) :-
संगमनेर शहरात व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी होता होत नाही. आता शहरातील बड्या कॉलन्या आणि गल्ली बोळानंतर बड्या-बड्या घरांमध्ये कोरोनाने प्रवेश केला आहे. यापुर्वी देखील आजी-माजी नगरसेवकांना कोरोनाने छेडले होते. आता देखील आज एका विद्यामान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या घरात कोरोनाची बाधा झाली आहे. नगरसेवक यांची पत्नी व मुलास कोरोनाची बाधा झाली आहे. तर पंचायत समिती येथे दोन विस्तार अधिकार्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर अकोले तालुक्यात आज एकाच दिवशी 11 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून काल एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात कोरोनाचे रूग्ण कमी होत नसून ती संख्या वाढती असल्याचे दिसते आहे.
google.com, pub-5174737680906741, DIRECT, f08c47fec0942fa0
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज संगमनेरमध्ये चैतन्यनगर येथे 43 वर्षीय महिला, नवघर गल्ली येथे 70 वर्षीय पुरुष, वकील कॉलनी येथे 85 वर्षीय पुरुष, घोडेकर मळा येथे 54 वर्षीय पुरुष, पावबाकी रोड येथे 46 वर्षीय पुरुष, खंडोबा गल्ली येथे 69 वर्षीय पुरुष, जोर्वे येथे 75 वर्षीय महिला, निंभाळे 28 वर्षीय पुरुष तर 52 वर्षीय महिला, साळीवाडा येथे 68, 35 वर्षीय महिला तर 14 वर्षीय बालिका तसेच 45 वर्षीय पुरुष आणि 12 वर्षीय बालक गुंजाळवाडी येथे 65 वर्षीय महिला, इंदिरानगर येथे 42 वर्षीय महिला व 22 वर्षीय तरुणी, ढोलेवाडी येथे 26 वर्षीय तरुण, लालतारा हाऊसिंग येथे 30 वर्षीय तरुणी, इंदिरानगर येथे 40 वर्षीय पुरुष, सुकेवाडीत 38 व 67 वर्षीय पुरुष तर 16 वर्षीय बालिका, जनता नगर येथे 51 व 74 वर्षीय पुरुष तर 21 वर्षीय तरुण, कुरण येथे 48 वर्षीय पुरुष, पंचायत समिती संगमनेर येथे 49 वर्षीय पुरुष, चैतन्यनगर संगमनेर येथे 20 वर्षीचा तरुण अशा 29 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.
तर आता अकोले तालुक्यात पुन्हा 11 रुग्णांची भर पडली आहे. यात अकोले शहरात खाजगी अहवालात आलेल्या माहितीनुसार केजी रोड येथे 38 वर्षीय पुरुष बाधात झाला आहे. तर कोतुळ येथे एकाच दिवशी येथे पाच रुग्ण मिळून आले आहेत. त्यात 26, 28 व 30 वर्षीय तरुण आणि 30 वर्षीय तरुणी व अवघ्या दिड वर्षाचे चिमुकले बालक यांचा सामावेश आहे. हे सर्व संपर्कात आलेले रुग्ण आहेत. तर मोग्रस येथे देखील 47 वर्षीय पुरूषाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर काल रात्री इंदोरी येथील 74 वर्षीय वृद्ध व्यक्तीने कोरोना झाल्यानंतर अखेरचा श्वास घेतला आहे. त्या पाठोपाठ हिवरगा आंबरे आणि समशेरपुरला पुन्हा कोरोनाने ग्रासले आहे. त्यामुळे आज दिवसभरात अकोले तालुक्यात कारोना बाधितांची संख्या 11 वर गेली आहे. तर हिवरगाव आंबरे येथे 34 वर्षीय पुरुष मिळून आला आहे तर हे गाव नव्याने बधित झाले आहे. तर त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या आता 11 झाली असून तालुक्यात ही संख्या 272 वर जाऊन पोहचली आहे.