कोरानाचा काला.! जेथे रूग्ण मयत तेथेच दहिहांडीचा कार्यक्रम! अकोल्यात 18 तर संगमनेरात 19 रुग्ण! व्हिडिओ पहा.!
सार्वभौम (अकोले/संगमनेर) :-
अकोले तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आजकाल वाढतेच आहे. त्यामुळे तालुक्यात आता रुग्णांची संख्या 246 इतकी झाली आहे. मात्र, जसजसे रुग्ण वाढत चालले आहे. तसतसे प्रशासन ढिल्ले झाल्याचे दिसू लागले आहे. कारण, काल मुख्याधिकारी आणि आरोग्य अधिकारी हे तालुक्यात अनुपस्थित होते. तर तालुका अक्षरश: पोरका झाला आहे की काय? असे चिन्ह दिसून आलेे. कारण, ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण होता. त्या परिसरात चक्क लोक दहिहांडी फोडताना दिसून आले. भलेही मयत रुग्ण शेतात राहत होता. मात्र, त्यांची उठबस या परिसरात होती. त्यामुळे प्रशासनाने हा परिसत कंटेनमेंट का केला नाही. याबाबत सगळेच अनभिज्ञ आहेत. मात्र, लोक स्वत:साठी बचावात्मक कारणे सांगून प्रशासनाच्या डोळ्यात धुळ फेकू शकते, मात्र कोरोनाच्या नाही. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे.
तर अकोल्यात एक गोष्ट महत्वाची म्हणजे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नुकतेच बदलून गेले आहेत. त्यांच्या जागी नव्याने दुसरे साहेब हजर झाले आहेत. मात्र, या आदला बदलीच्या काळात कारखाना रोडकडे कोणी लक्ष द्यायला उरले नाही की काय? असा प्रश्न उभा राहिला आहे. काल ज्या घरात रुग्ण मयत झाला. तो परिसर कंटेनमेंट झोन का झाला नाही, हाच प्रश्न अनेकांनी उभा केला आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असून प्रशासनाला त्याचा विसर पडला आहे की काय? असाे देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कारण, ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण मयत झाला त्या परिसरात अवघ्या काही अंतरावर चक्क बिन्धास्त दहिहांडीचा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे, अकोले शहराला ज्या कारखाना रोडने कोरोनाचा वानवळा दिला, त्यांनी किमान आता तरी या रोगाचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. एकीकडे आरोग्य अधिकार्यांचे आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे ते उपचारासाठी सुट्टीवर गेले आहेत. तर त्यांनी तरी केव्हर लोकांना समजून सांगायचे? शेवटी धावपळीने ते आजारी पडले. मात्र नागरिकांना शहाणपणा येईनासा झाला आहे. कोणी लग्न समारंभ मोठ्या उत्साहात साजरे करीत आहेत. तर कोणी पार्ट्या-बर्थडे सेलिब्रेशन आणि सण उत्सव साजरे करीत आहे. हे कोठेतरी थांबले पाहिजे. अन्यथा याचा भयानक परिणाम येणार्या काळात पहायला मिळेल.
आता अकोले तालुक्यातील 18 ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मिळून आले आहेत. त्यात शहरातील शेडफार्म येथील 65 वर्षीय महीला, शिवाजीनगर 50 वर्षीय पुरुष, शेटेमळा 22 वर्षीय तरुण, धुमाळवाडी 38 वर्षीय पुरुष, समशेरपुर येथील 46 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय तरुण, 40 व 20 वर्षीय महिला, हिवरगाव आंबरे येथील 65 वर्षीय,40 वर्षीय, 32 वर्षीय, 40 वर्षीय पुरुष 60 वर्षीय 32 वर्षीय महीला तर कोतुळ येथील 36 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय व 29 वर्षीय महिला तर खाजगी रूग्णालयातून आलेला मोग्रस येथील गायकर वस्ती येथील 73 वर्षीय पुरुष एक अशा 18 जणांचे अशी एकुण व्यक्तीचे कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आले आहेत.
तर संगमनेर येथे पिंपळगाव ढेपा येथे 30 वर्षीय पुरुष, भारत नगर येथे 59 वर्षीय पुरुष, सय्यदबाबा चौक येथे 62 वर्षीय पुरुष, वडगाव लांडगा येथे 25 वर्षीय तरुण, चिंचोली गुरव येथे 45 वर्षीय पुरुष, खंडोबा गल्लीत 66 व 33 वर्षीय महिला तर 16 वर्षीय बालिका, घोडेकर मळा येथे 28 वर्षीय तरुण, ढोलेवाडीत 49 वर्षीय महिला तर अवघ्या दिड वर्षीची चिमुकली, घोडेकर मळा येथे 28 वर्षीय तरूणी, इंदिरा नगर येथे 59 वर्षीय पुरुष, निमोण येथे 39 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर संगमनेर येथे 31 वर्षीय तरुण, जनता नगर येथे 72 वर्षीय महिला, पावबाकी रोड येथे 45 वर्षीय महिला, राजापूर येथे 32 वर्षीय तरुणी तर गणेश नगर येथे 42 वर्षीय महिला अशा 19 जणांना कोरोनाची लागण झाली असून आजवर संगमनेर तालुक्यात 1 हजार 114 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर त्यापैकी 883 जण सुखरुप घरी गेले असून 209 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच 22 जण कोरोनाने मयत झाल्याची नोेंद सरकार दप्तरी करण्यात आली आहे.