अकोल्यात कोरोनाचे 14 तर संगमनेरात आश्वीच्या दोन पोलिसांसह 23 रूग्ण.! नव्या गावांत कोरोनाचा प्रवेश ! कौटुंबिक प्रदुर्भाव वाढतोय!

सार्वभौम (अकोले) :- 
                        भर लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळात ज्या अकोले तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण मिळून आला नाही. तेथे आता कोरोना थैमान घालु लागला आहे. यास प्रशासन नाही तर काही बेजबाबदार नागरिक या वाढत्या प्रादुर्भावाचे जनक असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रक्रियेत एक गोष्ट मात्र नक्की अधोरेखीत करणारी आहे. की, शेजारी संगमनेर तालुक्यात गल्लीबोळात एक-एक रुग्ण मिळून येत आहे. मात्र, सर्व कुटुंब बाधित झाले आहे. किंवा एकाच कुटुंबात 10ते 15 जणांना लागण होणे हे प्रमाण फार कमी आहे. त्या तुलनेत हे प्रमाण अकोले तालुक्यात फार आहे. माणिक ओझर, उंचखडक, तहसिल कार्यालय परिसर, देवठाण, कारखाना रोड, शेरणखेल असे सर्व कुटुंब कोरोनाग्रस्त झाले आहे. त्यामुळे, एका बाधित व्यक्तीपासून समाजाला बाधा झाल्याचे प्रमाण काहीच नाही असे म्हटले तरी चालेल. मात्र, काळजी घ्या म्हणजे घरातल्यांची देखील काळजी घ्या असा अर्थ प्रत्येकाने घेतला पाहिजे. कारण, सामाजिक प्रदुर्भाव टळतो मात्र, कौटुंबिक प्रदुर्भाव वाढतो हे आता लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे ज्याला सिमटन्स वाढतील त्याने घरातील व्यक्तींच्या देखील सानिध्यातून दुर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आज दिवसभरात अकोले तालुक्यातील 14 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात काल उंचखडक येेेेथील 60 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली होती, त्यांच्यानंतर त्याच घरात 47 वर्षीय महीला व 6 वर्षीय चिमुकलीला हा प्रादुर्भाव झाला आहे तर सुगाव खुर्द येथील 27 वर्षीय तरुण, शेेेरणखेल येेेथील 50 वर्षीय पुरुष, बांगरवाडीत 19 व 25 वर्षीय तरुण यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच शाहुनगर येथे 78 वर्षीय  पुुुुरुष, तर तालुक्यातील मोग्रस येथील 60 वर्षीय पुुुरुष तसेच कारखाना रोड येथे यात बाधित झालेल्या सहा पैकी, एक 35 वर्षींय नगरसेवक, 60 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महिला, 8 वर्षाची चिकुमली तर 55 वर्षीय महिला अशा सहा जणांचा सामावेश आहे. असे दिवसभरात आज एकूण 14 व्यक्तीना झाल्याचे समोर आले आहे.
                   तर संगमनेर तालुक्यात आश्वी पोलीस ठाण्यातील दोन  पोलीस कर्मचार्‍यांसह 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात शहरातील भरीतकर मळा येथे 61 वर्षीय पुरुष, विल्हाळे येथील 49 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 63 वर्षीय पुरुष, देवी गल्ली येथे 55 वर्षीय पुरुष, जोर्वे येथे 24 वर्षीय तरुण, कौठे बु येथे 42 वर्षीय पुरुष, खर्डी येथे 28 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे 25 वर्षीय तरुण, आश्वी पोलीस ठाण्यात 50 व 45 वर्षीय पुरुष, अभिनव नगर येथे 68 वर्षीय महिला, जांबुत येथे 62, 64 वर्षीय पुरुष,तर 20 वर्षीय तरुण आणि 60 वर्षीय महिला अशा चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर निमोण येथे 54 वर्षीय पुरुष, 20 व 30 वर्षीय तरुण आणि 48 वर्षीय महिला अशा 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. 
                    तर रात्री उशिरा आलेल्या अहवालात इंदिरानगर येथे चार पुरुष त्यात 46, 23, 52 व 45 वर्षीय पुरुषांचा सामावेश आहे. तर 41 व 49 वर्षीय अशा दोन महिलांचा सामावेश आहे. त्यामुळे संगमनेरात एकूण 25 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील 2 व्यक्ती राहाता येथील रहिवासी आहेत. त्यामुळे आज दिवसभरात ही संख्या 23 वर जाऊन पोहचली आहे.