अकोले नगरसेवकासह आखं कुटुंब कोरोना बाधित! चिमुकलीसह सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले शहरातील कोरोना आता थेट नगरपंचायतीत जाऊन पोहचला आहे. कारण, येथे एका नगरसेवकासह त्याच्या कुटुंबालाच कोरोनीची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, शहरात एकच खळबळ उडाली आहे. यात अवघ्या आठ वर्षाच्या मुलीसह सर्व कुटुंबच बाधित झाल्याचे समोर आले आहे. यात संबंधित नगरसेवकावर संगमनेर येथे उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या एका व्यक्तीमुळे संपुर्ण कुटुंबाला कोरोनाचा सामना करावला लागला आहे. तर यांच्या वडिलांच्या सानिध्यात अनेक राजकारणी आणि पुढारी आले असल्याची जोरदार चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे महसूल आणि आरोग्य प्रशासनाने आता त्यांचा शोध घेणे सुरू केले आहे.
यात बाधित झालेल्या सहा पैकी, एक 32 वर्षींय नगरसेवक, 60 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महिला, 8 वर्षाची चिकुमली तर 55 वर्षीय महिला अशा सहा जणांचा यात सामावेश आहे. यात पहिली बाधा नगरसेवक यांस झाली होती. तर हा प्रादुर्भाव थेट घरापर्यंत जाऊन पोहचला. खरंतर कारखाना रोड हे शहारातील पहिले असे ठिकाण आहे. जेथून कोरोनाचे संक्रमण सुरू झाले. वास्तवत: जितका आरडाओरड सगळ्या शहरात होत नाही, तितका बोलबोला कारखाना रोड परिसरातून ऐकू येतो कारण येथे कार्यकर्ते कमी तर पुढारी भरमसाठ झाले आहेत. नगरपंचायतीत देखील इतरांची पंचायत करतील इतकी नगरसेवक संख्या एकट्या कारखाना रोड परिसरात आहे. त्यामुळे येथील नागरिक देखील जागरुक आहेत. अर्थात आज ज्या नगरसेवकास कोरोनाची बाधा झाली आहे. ते एक समाजभिमूख व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे कोणाच्याही हकेला ते धावून जातात. गेल्या आठवड्यात गटार प्रश्नावर ते स्वत: रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे एखाद्या सामाजिक कामातूनच त्यांना हा प्रादुर्भाव झाला असावा असे बोलले जाते.
तर या प्रादुर्भावाची दुसरी बाजू पाहिली तर त्यांचा मित्र परिवारातील गोतावळा देखील फार मोठा आहे. त्यामुळे ते घरी कमी आणि अकोल्यातील तरुणांच्या नेहमी संपर्कात असतात. तर यापुर्वी जे अगस्ति चित्रपट गृहाच्या जवळ ज्या तरुणाला कोरोनाची बाधा झाली. तो याच मित्र परिवारातील आहे. कारण, त्याच्यामुळे एका मेडिकल चालकास कोरोनाची बाधा झाली. हा देखील याच मित्र मंडळातील आहे. त्यामुळे, जे-जे तरुण यांच्या सानिध्यात आले आहे. त्यांनी किमान एक सामाजिक भान म्हणून स्वत:ला होमक्वारंटाईन करुन घेणे अपेक्षित आहे. अन्यथा याकडे दुर्लक्ष केले तर शहराला याचे भयानक परिणाम भोगावे लागतील.
खरंतर जेव्हा या नगरसेवकास त्रास होऊ लगला होता तेव्हापासून त्यांनी स्वत:ला होमक्वारंटाईन करुन घेतले होते. त्यानंतर शहरात काही दुधाची आंदोलने झाली त्यात ते कोठे दिसून आले नाहीत. मात्र, त्यांच्या सानिध्यात असणारे काही नगरसेवक आणि मित्र परिवार तेथे दिसून आला. आता यात कोणी राजकारण करीत असेल तर तो निव्वळ मुर्खपणा ठरेल. मात्र, प्रत्येकाने शंका असेल तर स्वत:ला होमक्वारंटाईन करून घेणे अपेक्षित आहे. असे झाले तरच कोरोना प्रदुर्भावाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे.
दरम्यान अकोले शहरात कोरोनाचा प्रदुर्भाव वाढताना दिसत आहे. येथे पार्ट्या, लग्न, वाढदिवस हे शहरासाठी धक्कादायक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी कारखाना रोड येथील एका घरघुती जेवणाची चर्चा आणि त्या दरम्यान कोरोना बाधित सापडलेले शिवसेनेचे पादाधिकारी यावर तालुक्यात रणकंद माजले. त्यात कोणाला कोरोनाची प्रदुर्भाव झाला नाही. मात्र, अगस्ति चित्रपट गृहाच्या परिसरात जो एका तरुणाच्या घरात वाढदिवस साजरा झाला. त्यातून अनेकांना बाधा झाल्याचे समोर येऊ लागले आहे. त्याची चौकशी झाली तर मात्र, प्रशासनाला पळता भूई थोडी होईल. त्यामुळे या तरुणांनी देखील स्वत: होमक्वारंटाईन होणे गरजेचे आहे. कारण, तुम्ही प्रशासनाला फसवू शकतात कोरोनाला नाही. तर तुम्ही धष्ठपुष्ठ असाल मात्र, तुमच्या घरातील अबालवृद्ध नाही. त्यामुळे सजग रहा, सुरक्षित रहा, काळजी घ्या.!
*तोंडाला मास्क लावा
*शक्यतो बाहेर पडणे टाळा
*गर्दीची ठिकाणे टाळा
*सॅनिटायझरचा वापर करा
*दोघांत योग्य अंतर ठेवा
*बोलताना,शिंकताना काळजी घ्या
*लहान वृद्धांना सांभाळा
*प्रशासनाचे नियम पाळा
*बाधित व्यक्तींना धिर द्या
* संरक्षण म्हणून काय कराला
*शक्यतो कोमट पाणी प्या
*शंका वाटल्यास वाफ घ्या
*सकस आहार कायम ठेवा
*काढा पिण्याची सवय ठेवा
*खाण्यात थंड पदार्थ टाळा
*डॉक्टरांशी बोलून निरसन करा
*वारंवार आपले हात धूवा
- सागर शिंदे
--------------------------------------
शेतकरी पुत्रांनो,! आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 79 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
टिप :- राजकीय जाहिराती किंवा पेडन्युज स्विकारल्या जात नाहीत.!
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 79 लाख वाचक)टिप :- राजकीय जाहिराती किंवा पेडन्युज स्विकारल्या जात नाहीत.!
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------