मंडल अधिकारी कोरोनाचे संशयित बळी.! तर अकोल्यात आज 13 तर संगमनेरात 38 रुग्णांची भर.!



सार्वभौम (अकोले/संगमनेर) :- 

                  अकोले तालुक्यात महसूल विभागाचे एक मंडल अधिकारी यांचा कोरोना संशयित म्हणून मृत्यु झाल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. ते मुळचे पाडाळणे येथील होती. त्यांच्या मृत्युने तालुक्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. त्यांचे स्वॅब नाशिक येथून अद्याप आलेले नाहीत. मात्र, तो अहवाल येण्यापुर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. तर आज तालुक्यात एकाच दिवशी 13 रुग्णांची भर पडली आहेे. तर संगमनेर तालुक्यात देखील 38 नवे रुग्ण मिळून आले आहे. त्यात निमोण येथे कोरोनाने हौदोस घतला आहे तर शहरातील अनेक गल्ल्या कोरोनाने बाधित झाल्याचे दिसत आहे. 

अकोले तालुक्यातील आज 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात हिवरगाव आंबरे येथे 52 वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे 59 वर्षीय पुरूष तर 51 वर्षीय महिला, वाशेरे येथे 85 वर्षीय वृद्ध महिला, धामनगाव आवारी येथे 60 वर्षीय महिला, कारखाना रोड येथे 35 वर्षीय महिला, अकोले शहराच्या नजीक उच्चभ्रु वसाहतीचे शिवाजीनगर येथे 23 वर्षीय महिला तर राजूर येथे 43 वर्षीय पुरुष तर 34 वर्षीय महिलेचा सामावेश आहे. तर यात राजूर येथील वंजार गल्ली मध्ये एक 75 वर्षीय वृद्ध आजोबा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर सायंकाळी कोतुळ येथील 56, 38 व 62 वर्षीय महिला अशा 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.                     
                            तर संगमनेरला कोरोनाचा कहर आजुनही ही सुरुच आहे. आज पुन्हा 38 रुग्ण कोरोनाबाधीत आढळुन आले. यामध्ये शहरातील विजयनगर येथील 50 वर्षीय पुरुष, इंदिरानगर 32 वर्षीय पुरुष, जनतानगर 51 वर्षीय महिला, अभंग मळा येथे 42 वर्षीय महिला तर शहरालगत असलेल्या घुलेवाडी येथे 59 वर्षीय महिला, कौठे कमळेश्वर 54 वर्षीय पुरुष, आश्विबु 55 वर्षीय पुरुष, वडगावपान 34 वर्षीय पुरुष, वडझरी 31 वर्षीय पुरुष, जवळेकडलग 58 वर्षीय पुरुष,वडगाव पान येथे 17 वर्षीय युवक, राजापूर 33 वर्षीय पुरुष, बोटा येथे 75 वर्षीय वयोवृद्ध, मोमीन पुरा 57 वर्षीय पुरुष, भारतनगर 15 वर्षीय युवक, भारतनगर येथे 49 वर्षीय महिला, गणेश नगर 75 वर्षीय वयोवृद्ध, मोधळ वाडी येथे 26 वर्षीय महिला व 3 वर्षीय चिमूरडिला कोरोनाची बाधा झाली आहे. गणेशनगर मध्ये 21 व 16 वर्षीय तरुण आणि 25 वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा, इंदिरानगर येथे 53 वर्षीय महिला, तर आज निमोण पुन्हा कोरोनाच्या रडारवर आहे. निमोण येथे  सात महिला तर तीन पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे. तर घोडेकर मळा येथे 19 वर्षीय युवतीला कोरोनाची बाधा तर ढोलेवाडी येथे 65 वर्षीय वयोवृद्धस तर पावबाकी रोड येथे 52 वर्षीय व 26 वर्षीय पुरुषास कोरोनाची बाधा झाली आहे. तर मोमीनपुरा येथे 58 वर्षीय पुरुषास कोरोनाची बाधा झाली आहे.त्यामुळे एकुण कोरोनाबधितांची संख्या 1 हजार 153 वर जाऊन पोहचली आहे.