भाजपच्या नेत्यांनीच मला मटन खायला लावले, मग राष्ट्रवादीत असताना त्यांचे पोट का दुखतय! - डॉ. लहामटे


- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) : 
                      जेव्हा मी भाजपात होतो त्यापुर्वी मी गेल्या 10 वर्षे मांसाहार करीत नव्हतो. मात्र, भाजपमध्ये राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आज जे माझ्यावर टिका करीत आहेत. त्याच भाजपच्या नेत्यांनी मला मटन खायला शिकविले आणि भाग पाडले. अशी तर्‍हीबाजी आणि झणझणीत टिका आमदार डॉ. किरण लहामटे यांनी नाव न घेता भाजपच्या भांगरे यांच्यावर केली. ते म्हणाले, मी झाडाखली जेवलो तरी यांचे पोटं दुखतात, मी घरात जेवलो तरी यांचे पोटं दुखतात. त्यामुळे पार्ट्या आणि दारुचे गुट्टे हा माझा धंदा नाही. मात्र, तुम्हीतरी ठामपणे सांगा की, गटार आमवस्या आणि आख्या आखाडात तुम्ही शांत आहात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते जनतेशी संवाद साधत असताना बोलत होते.
                          ते पुढे म्हणाले की, माझ्या एका कार्यकर्त्यांच्या घरी मी कौटुंबिक निमित्ताने गेलो होतो. तेथे मी मांसाहार केला. मात्र, जो कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण होता. त्याच्या संपर्कात मी आलो नाही. तरी देखील काही व्यक्तींनी कोल्हेकुई सुरू केली. त्यांच्या भुंकणे बंद करण्यासाठी मी कोरोनाची अ‍ॅन्टीजन रॅपीड टेस्ट देखील करुन घेतली आहे. ती निगेटीव्ह आली आहे. मात्र, जर मी चुकत असेल तर मला प्रशासनाने नक्की क्वारंटाईन करावे. त्यात माझी काही हरकत नाही. हे लोक जे पार्टी-पार्टी म्हणून नाचवत आहे. ती पार्टी नव्हती तर ती एक कौटुंबिक भेट होती. दुसरी गोष्ट म्हणजे आजवर मी कोणतेही व्यसन केलेले नाही. त्यामुळे दारु आणि अन्य पार्ट्या हा माझा धंदा नाही. मी जनतेच्या मनातील आमदार आहे त्यामुळे जो कोणी मला पाहतो तो जवळ येतो. त्याला मी नाही म्हणून शकत नाही. त्यामुळे काही लोकांनी नको तो बाऊ उभा करुन प्रशासन व आम्हला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.
                       
या पलिकडे त्यांनी माजी आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर देखील शब्दसंहार केला. डॉ. लहामटे यांनी जी गाडी घेतली आहे. ती त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिळून घेतली आहे. त्याचे हाप्ते त्यांचा मित्रपरिवार आणि कार्यकर्ते भरणार आहे. त्यामुळे, माझ्यावर टिका करताना पाहिले स्वत:च्या घरात डोकावून पहा. अशा खडतर भाषेत त्यांनी टिका केली. विरोधकांनी जर त्यांचा अविचारी पायंडा असाच कायम ठेवला तर पुढच्या पंचवार्षीकला देखील मी अगदी सहज आमदार होईल असे देखील डॉक्टर म्हणाले. विरोधक निव्वळ टिका करीत आहेत. जी कामे मी पाठपुराव्याने उभी करीत आहे. त्याचे श्रेय्य घेण्याचे काम भाजप घेत आहे. मात्र, मी काय काम केले होते पाहण्यासाठी उघडा डोळे बघा निट असा सल्ला त्यांनी दिला.
विनम्र अभिवादन.!
                         या पलिकडे ते म्हणाले की, मी याच पंचवर्षीकमध्ये अकोले तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी एमआयडीसी आणल्याशिवाय राहणार नाही. इतकेच काय! कधी नव्हे असा विकास मी करणार आहे. हे काम करताना  जोवर माझ्या डोक्यावर शरदचंद्र पवार साहेब यांचा हात आहे. तोवर ही पिलावर माझा बाल देखील बाका करु शकत नाही असे म्हणत त्यांनी खडतर शब्दात अनेकांना निशान्यावर घेतले. तसेच अकोले तालुक्यात पोलीस, महसूल, ग्रामसेवक, तलाठी, पत्रकार आणि अन्य प्रशासकीय अधिकारी चांगली कामे करीत आहेत. त्यांचे खरोखर कौतूक केले पाहिजे असे म्हणत त्यांनी या कोविड योद्ध्यांचे आभार मानले. 
तर यापलिकडे डॉक्टरांनी हे देखील क्लेअर केले की, काळेवाडी आणि ब्राम्हणवाडा येथे जो नरवडे गृप आहे. त्यांच्यावर हकनाक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात धिटाईचा वापर करण्यात आला असून चूक असेल तर चूक म्हणणारे ते लोक आहेत. त्यामुळे त्यात देखील भाजप कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहेे. यात आमदार स्वत: लक्ष घालणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

       (मी शिवसेना शहराध्यक्ष)
पाच दिवसांपूर्वी मी माझा स्वॉब देऊन होम क्वारांटाईन होतो परंतु अकोले येथे मेडिकल मध्ये गाईचे औषध आणन्यासाठी जात असताना रस्त्यावर आमदार साहेबांची गाडी उभी दिसली म्हणून मी माझ्या मित्राच्या घरासमोर उभा राहून आमदार साहेबांना नमस्कार केला आणि लगेच अकोलेच्या दिशेने निघून गेलो. तदनंतर मला उशिरा कळले की आमदार साहेब तेथे स्नेह-भोजनासाठी आलेले होते व त्यांच्या आधी मा.तहशिलदार साहेब पण येउन गेले होते.  त्यानंतर रात्री 8:30 वाजताचे दरम्यान माझा कोरोना रिपोर्ट पोझिटीव्ह आल्याची माहिती मला कळली व त्याच क्षणी मी खानापूर येथील कोविड सेंटरला जाऊन हजर झालो परंतु मला कुठलाही त्रास होत नसताना मी माझा स्वॉब चेक करायला दिला होता. मी ना आमदार साहेबांच्या संपर्कात आलो ना  तहसीलदार साहेबांच्या संपर्कात आलो. उगीच राजकीय आकसापोटी किंवा सूडबुद्धीने लोक प्रतिनिधींना व प्रशासनाला कुणीही बदनाम करू नये. ज्या ठिकाणी माझे आणि साहेबांचे बोलणे झाले ते ठिकाण कंटेन्मेंटझोन पासून साधारणता  २ km च्या पुढे अंतरावर आहे. म्हणजे तो बफर झोन देखील नाही. तर तिकडे येण्यासाठी रस्ता देखील वेगळा आहे. कंटेन्मेंट झोनचा आणि आमच्या भेटीचा काडीमात्र संबंध नाही. चुकीच्या दिशेने राजकारण करून जनतेला संभ्रमात टाकू नये. ही सर्वांना विनंती.

पुढील विषय  : भाजपचे भाऊ प्रेमी, सरपंच होण्यासाठी डॉक्टरांच्या दावणीला, त्यांना अभय देणारे राष्ट्रवादीचे फुटीर नेते कोण?