संगमनेर लॉकडाऊन नाहीच, फक्त काळजी घ्या- ना. थोरात, कुरणमध्ये पुन्हा रुग्ण, संख्या 349 वर..
सार्वभौम (अकोले) :
संगमनेर शहराच्या नजीक कुरण येथे आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. तेथे एका 16 वर्षीय तरुणाला संपर्कामुळे बाधा झाल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता संगमनेर तालुक्यात एकूण रुग्ण 349 झाले असून निव्वळ कुरणमध्ये 55 रुग्णसंख्या झाली आहे. वास्तवत: हाताबाहेर गेलेले कुरण कवर करण्यात प्रशासनाला बहुतांशी प्रमाणात यश आल्याचे दिसते आहे. असेच प्रमाण संगमनेर शहर व ग्रामीणला कवर करण्यात यश आले तर प्रशासनाने कोविडला हरविले असेच म्हणता येईल. तर एकीकडे कोरोना झपाट्याने वाढत असताना राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, प्रत्येकाने स्वयंस्पुर्तीने आपापली काळजी घेतली पाहिजे. जर लोक जागरुकतेने वागणार नसतील तर संगमनेर लॉकडाऊन करावे लागेेल.
सध्या संगमनेरात कोरोनाची आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे. त्यावर दृष्टीक्षेप टाकला तर लक्षात येईल की, संगमनेर 143, धांदरफळ 8, निमोण 35, घुलेवाडी 15, केळेवाडी 1, निंबाळे 1, आश्वी बु 1, कौठे कमळेश्वर 1, डिग्रस 1, शेडगाव 3, पळासखेडे 3, जोर्वे 2, खळी 1, गुंजाळवाडी 13, कुरण 55, पिंपरणे 1, साकूर 1, पेमरेवाडी 2, कसारा दुमाला 5, संगमनेर खुर्द 3, ढोलेवाडी 11, निमगाव जाळी 1, खांडगाव 3, पिंपळगाव कोंझीरे 3, हिवरगाव पठार 1, पेमगिरी 1, नांदुरखंदरमाळ 9, हिवरगाव पावसा 2, मिर्झापूर 1, करुले 1, कनोली 4, कौठे धांदरफळ 1, चिखली 1, तळेगाव दिघे 1, वडगाव पान 1, सुकेवाडी 2, राजापूर 1, कोल्हेवाडी 1, शिबलापूर 5, रायते 1, वडगाव लांडगा 1 असे एकूण संपुर्ण तालुक्यात 349 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण येथे मिळून आले आहेत. त्यापैकी 333 हे स्थानिक रुग्ण आहेत तर 16 व्यक्ती बाहेरच्या आहेत. या बाधित संखेपैकी 216 रुग्णांनी कोरोनाची लढाई यशस्वीरित्या पुर्ण केली असून 119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या पलिकडे शहरात आठ, धांदरफळ येथे 1, निमोण येथे 2, डिग्रास व शेडगाव येथे प्रत्येकी 1 तर कसारा दुमारला येथे 1 असे 14 जण आजवर कोरोनाचे बळी ठरले आहेत.
महत्वाचे...
तर या पलिकडे काल घासबाजार येथे एका दुल्हेराजास कोरोनाची बाधा झाल्याचे बोलले जात होते. मात्र, संगमनेरात कोणातीही नवरदेव कोरोना पॉझिटीव्ह नाही. तर त्याच परिसरात दुसर्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नवोदीत वर आणि वर्हाडी यांना कोरोनाचा कोणत्याही प्रकारे धोका नाही. ही बाब सखोल माहितीअंती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये तसेच प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी.- सुशांत पावसे