कोरोना झालाय म्हणून मुलगी मारणी घातली, पण तिला साप चावला होता! चिमुरडीचा दुदैवी अंत.!
अकोले तालुक्यातील कोतुळ परिसरात एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. कोरोनाच्या भितीपोटी मुंबईहून आलेल्या एका शिंदे कुटुंबातील अवघ्या पाच वर्षाच्या चिमुरडीला साप चावला होता. मात्र जेव्हा तिला घाईघाईने रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, तिला कफ आणि कोरोना झाला आहे. त्यानंतर पालकांनी त्यांना ओरडून सांगितले की, आहो डॉक्टर साहेब तिला साप चावला आहे. आम्ही त्या सापाचा फोटो काढला आहे. मात्र, डॉक्टर त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. म्हणजे विष उतरविण्याचे औषध देण्याऐवजी कोरोना आणि कफची औषधे देण्याच्या नादात उशिर झाला आणि हकनाक एका चिमुरडीचा जीव गेला. दरम्यान या पालकांनी हा प्रकार तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना सांगितला असता त्यांनी तब्बल एक महिना ही गोष्ट कानामागे टाकली. त्यामुळे चिमुकलीच्या आईने आमदारांवर भावनाविवश होत चांगलेच ताशेरे ओढले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक महिन्यापुर्वी मुंबईच्या मुलूंडमधून शिंदे कुटूंब गावी आले होते. त्यानंतर त्यांना आरोग्य विभागाने क्वारंटाईन केले होते. या दरम्यानच्या काळात या कुटुंबातील अनन्या विश्वास शिंदे (वय 5) या मुलीस सर्पदंश झाला होता. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला कोतुळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथील कर्मचार्यांनी हालगर्जीपणा करीत हिला सर्पदंश नाही तर कोरोना झाला आहे. तिचे टेंप्रेचर तपासले असता ते हाय होते. तसेच ती बेशुद्ध अवस्थेत होती आणि त्यातल्या त्यात ती मुंबईहून आल्याच्या पार्श्वभूमी असल्यामुळे तिला अगदी कोरोनाचीच वागणूक देण्यात आली. येथे डॉक्टर नाही, येथे विषारी साप चावल्याची लस नाही असे सांगत तिला कोरोना झाल्याचे सागून थेट संगमनेरला पाठविण्यात आले. मात्र, दुर्दैवाने या चिमुकलीला योग्यवेळी उपचार भेटला नाही. त्यामुळे तिने अखेरचा श्वास घेतला.
आता हा सर्व भोंगळ कारभार एक महिन्यानंतर चव्हाट्यावर आला आहे. कारण, हे सामान्य गरिब कुटुंब त्यांच्या पातळीवर मुलीला न्याय देण्यासाठी झटत होते. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील तक्रार केली होती. मात्र, त्याबाबत त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. अखेर एक शेवटचा प्रयत्न म्हणून यांनी आमदार किरण लहामटे यांच्याकडे आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना फोन केले मात्र त्यावर योग्य उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांच्या पीए यांना संपर्क साधला असते त्यांच्या भलताच तोरा असतो, त्यामुळे नेमकी असा प्रश्न पडतो की, नेमकी आमदार कोण आहे.! त्यातल्या त्यात कोविडने लोक उपाशी मरत आहेत, उपचारा आभावी चिमुकले आपला जीव गमवत आहे. आणि लोकवर्गणीतून निवडून आलेले आमदार लाखो रुपयांच्या गाड्या घेऊन नेमकी फिरतात कोठे आणि कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, लेक गेल्याचे दु:ख उराशी बाळगून संपर्क न झालेल्या माता-पित्यांनी थेट आमदारांचे दोन वेळा घर गाठले. मात्र, ते आज इकडे आहेेत, तिकडे आहेत अशा प्रकारे उडवाउडविची उत्तरे मिळत आहे. त्यामुळे खरोखर हे सामान्य जनतेचे आमदार आहेत का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
ज्या माय माऊलीने आपल्या चिमुरडीच्या न्यायासाठी टाहो फोडला आहे. त्या मातृत्वानेच लोकप्रतिनिधींना जाब विचारला आहे. एरव्ही पायाला भिंगरी बांधून फिरणारे डॉक्टर आता त्यांच्या-त्यांच्याच गोतावळ्यात क्वारंटाईन झाले की काय? कारण, ज्या जनतेने त्यांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिले होते. ते त्यांच्यात दिसत नाही तर ठराविक टोळके घेऊन तरुणांच्या इशार्यावर इकडे-तिकडे फिरताना दिसता. मात्र, जनता तुमच्या मदतीवाचून मरत आहे. हे त्यांना कोणी सांगावं? ज्या आशेने लोकांनी त्यांना उभे केले त्या प्रत्येकाचा आज भ्रमनिराश होताना दिसत आहे. त्यामुळे या मातृत्वाला न्याय देण्यासाठी ते पुढे येतील का? की, राष्ट्रवादीच्या वैचारिक बैठकीला सोडून ते उताविळ व अविचारी तरुणाईत रमनार आहे. असा प्रश्न जाणकारांकडून विचारला जात आहे. असे झाले तर ठराविक लोकांची मक्तेदारी सभोवताली गोळा करुन वावरत राहिले तर आजी आणि माजी यांच्यात फरक तरी काय? असा सवाल अकोलेकर विचारत आहे.त्यावेळी लोकांनी निवडणूक हाती घेऊन लोकनियुक्त आमदार म्हणून डॉक्टरांचा चेहरा समोर आला. मात्र, त्याच मतदारांचे मृतदेह जर दिवस-दिवस बर्फात ठेवावे लागत असतील तर तुम्ही जनतेचे काय ऋण फेडले? असा सवाल त्या माऊलीने विचारला आहे. कारण, लेक मेली नाही तर तिचा बळी गेला आहे. ही आर्त हाक संपुर्ण तालुक्याने एकली आहे मात्र, आमदार मोहदयांना ती ऐकू का येत नाही हे न समजण्यापलिकडे आहे. याच मुंबईकरांनी स्वखर्चाने गावाचा रस्ता धरुन आपल्याला 56 हजारांचे लिड दिले. हे ते कसे विसरू शकतात? आता त्यांच्याकडून काही आर्थिक मदत नको! पण फक्त त्या रुग्णालयात ज्यांनी कोणी हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कारण, त्या माऊलीच्या पोटचा गोळा गेला आता मनाला आधार मिळेल असा न्याया ती तुमच्याकडे पदर पसरवून मागत आहे.
--------------------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 68 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 400 दिवसात 460 लेखांचे 68 लाख वाचक)============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------