संगमनेरात कोरोनाचे द्विशतक.! काल १४ आज १२ रुग्ण.! एकूण संख्या २०६ वर.! १३ मयत.!


सार्वभौम (संगमनेर)-
                संगमनेर मध्ये काल 14कोरोना बाधीत रुग्ण आढळून येतनाही तेच आज पुन्हा 12 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये शहरालगत असलेल्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात दिसुन येत आहे. आज नव्याने कनोली गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.कनोली गावात आज चार रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये 25वर्षीय युवती तर 64वर्षीय पुरुष तर 28वर्षीय महिला आणि 32वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे.शहरालगत असलेल्या संगमनेर खुर्द मध्ये 13वर्षीय बलिकेला कोरोनाची लागन झाली आहे तर ढोलेवाडी येथे पुन्हा नव्याने तीन कोरोनाबधित रुग्ण आढळुन आले आहे. यामध्ये 35वर्षीय पुरुष तर 18वर्षीय युवक तर 8वर्षीय बालकाला कोरोनाची लागण झाली आहे.शहराच्या अगदी मध्यकेंद्रबिंदू असलेल्या तेलीखुंटावर 57वर्षीय इसमास कोरोनाची लागण झाली आहे. तर कुरण रोडला 75वर्षीय वयोवृद्धास कोरोनाने ग्रासले आहे.निमोण मध्ये64वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा तर ग्रामीण भागातील करूले येथे 29वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे.
           
दरम्यान,आज तालुक्यात एकुण 12जण कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहे.यामध्ये शहरातील 2 तर ग्रामीण भागातील 10 कोरोना बाधीत आहे.तर दिवसेंदिवस कोरोना बधितांचा आकडा देखील वाढत असुन रोज दोनअंकी आकडा आढळून येत आहे. तर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 206वर जाऊन पोहचली आहे.काल मिर्झापुर तर आज कनोली आणि करूले येथे नव्याने शिरकाव केला आहे. दिवसेंदिवस नवीन गावांमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळुन येत आहे. यांना वानवळा कुठुन येतो हा प्रशासनापुढे चिंतेचा विषय ठरत आहे. कोरोना विषाणूचा फैलाव शहरासह ग्रामीण भागात झपाट्याने होत आहे.यामुळे नऊ ते सातचा दिलेला टाईम पुन्हा दोनतासाने कमी करून नऊ ते पाच हा टाईम दुकानदार, हॉटेल व इतर व्यावसायिकांना दिला आहे.
               आज देवठाण येथील एक 35 वर्षीय तरुणीला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ४० झाली  आहे. त्यापैकी २६ जण कोरोनामुक्त झाले तर १३ जणांवर उपचार सुरु आहे तर एकाचा मृत्यू झाला असून तब्बल १० रिपोर्ट येणे बाकी आहे.
- सुशांत पावसे