संगमनेर, नेवासा, श्रीगोंदा शेवगाव असे 36 रुग्ण! संगमनेरात, घुलेवाडी, गुंजाळवाडी, चास पिंपळदरी कसारा दुमाला असे नऊ रुग्ण!


सार्वभौम (संगमनेर) :
                      संगमनेर तालुक्यात आज पुन्हा नऊ रुग्ण मिळून आले आहेत. दिवसभरात पाच रुग्ण मिळून आले होते. त्यानंतर रात्री पुन्हा आठ रुग्ण मिळून आले आहेत. त्यात कसारा दुमाला येथे एका तरुणीला कोरोनाची लागण झाली असून घुलेवाडी परिसरात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच गुंजळवाडी परिसरात दोघाना, तर चास पिंपळदरी, हिवरगाव पावसा व मिर्झापूर या दोन ठिकाणी प्रत्येकी एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. अशा 8 लोकांना कोरोना झाला असून आज दिवसभरात 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी जनता नगर येथील लाँण्ड्री चालकास कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आता सायंकाळी पुन्हा चौघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यात निमोण येथे 50 वर्षीय पुरूष, नांदुरखंदुरमाळ येथे 65 वर्षीय पुरूष तर शहरातील गणेश नगर येथे 34 वर्षीय पुरुष व 58 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ही दोघे स्थानिक कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना बाधा झाली होती. त्यामुळे संगमनेर तालुक्यात आज 193 रुग्ण कोरोना बाधित तर 13 जणांचा मृत्यू अशी आकडेवारी झाली आहे. तर अकोल्यासाठी गुडन्युज आहे. येथे एकाही रूग्ण कोरोना बाधित नसून तेथील सर्व अहवाल निगेटीव्ह आहेत.
                       
आज जिल्ह्यात दिवसभरात 66 रुग्णांची भर तर 13 रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. त्याच बरोबर 202 व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये रात्री 36 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये, नगर महापालिका क्षेत्रातील 13, सोनई (नेवासा) येथील 10, संगमनेर तालुक्यातील 09, श्रीगोंदा तालुक्यातील 02, शेवगाव तालुक्यातील 01 आणि भिंगार येथील एका रुग्णाचा समावेश आहे. नगर महापालिका क्षेत्रात पद्मानगर येथे एक, सिद्धार्थनगर 02, चितळे रोड 06, टिळक रोड 01, सारस नगर 01, सावेडी 01, शिंपी गल्ली 01 असे रुग्ण आढळून आले. नेवासा तालुक्यातील सोनई येथे 10 रुग्ण बाधित आढळून आले.
तर संगमनेर तालुक्यात हिवरगाव पावसा 01, गुंजाळ मळा 02, कसारा दुमाला 01, मिर्झापूर 01, घुलेवाडी 03, चास पिंपळदरी 01 असे रुग्ण आढळून आले. श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळा 01, चांबूर्डी 01 असे रुग्ण आढळून आले. शेवगाव तालुक्यातील निँबे नांदूर येथे एक रुग्ण आढळून आला. भिंगार येथील गवळी वाडा येथेही एक बाधित रुग्ण आढळून आला. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले 09 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये नगर मनपा क्षेत्रातील 03,  राहाता 03, श्रीरामपूर 02 आणि पाथर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान आज सकाळी एकूण 21 बाधित रुग्ण आढळून आले.  यामध्ये नगर मनपा 08 (अरणगाव रोड, केडगाव (05),  सर्जेपुरा, तारकपुर आणि गवळीवाडा प्रत्येकी (01) श्रीरामपूर तालुका 02, नेवासा तालुका 02, अकोले तालुका 01, संगमनेर 01, श्रीगोंदा तालुका 01, राहुरी तालुका 01, जामखेड तालुका 02, भिंगार 01, पारनेर 01 आणि कर्जत तालुक्यातील एक रुग्ण आढळून आला होता. सध्या नगरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 280 असून बरे झालेले रुग्ण 494 तर मृत्यू 2 आहेत. आजवर एकूण रुग्ण संख्या 794 झाले आहेत.