अखेर अकोले शहरात कोरोनाचा प्रवेश, तर संगमनेरात नऊ कोरोना रुग्ण!
संगमनेर (सार्वभौम) :
गेल्या कित्तेक दिवसांपासून अकोले तालुक्यात कोरोनाने एकएक गाव बाधित करण्याचा धडाका लावला होता. मात्र, सुदैवाने शहरात एकाही रुग्ण मिळून आला नव्हता. आता त्या सुरक्षेला खंड पडला असून शहरातील हासे कॉम्प्लॅक्स कारखाना रोड येथे एका पुरूषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर कारखाना रोड येथे एका तरुणाचा अहवाल निगेटीव्ह आला असून हे खाजगी रिपोर्ट प्राप्त झालेे आहेत. तर संगमनेर शहरासह तालुक्यात देखील कोरोनाचे नऊ रुग्ण मिळून आले आहेत. त्यात मालदाड रोड सौभाग्यवती मंगलकार्यालय परिसर येथे एक महिला व पुरुष असे दोघांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तसेच जनता नगर, जोर्वे रोड, आरगडे गल्ली, विद्यानगर आणि ऑरेंज कॉर्नर अशा ठिकाणी प्रत्येकी एक पुरूष कोरोना बाधित मिळून आले आहेत.

संगमनेर शहरासह तालुक्यात देखील कोणोनाचे रुग्ण मिळून आले आहेत. निमोण येथील महादेव मंदीराच्या जवळ एका पुरूषाला कोरोना झाला आहे. या व्यतिरिक्त कौठे धांदरफळ येथे देखील एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्रशासनाच्या हाती आला आहे. त्यामुळे आज दिवसाअखरे शहरात सात तर ग्रामीण भागात दोन आणि अकोले शहरात एक असे दहा रुग्ण मिळून आले आहेत. या सर्वंनी खाजगी रुग्णालयात कोरोनाची तपासणी केली होती. त्यात हे रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. या अहवालानंतर संगमनेरात कोरोना बाधितांची संख्या 35 वर पाहचली असून आजवर 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

अकोले तालुक्यात जे काही संशयित म्हणून रुग्ण आहेत. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे तेथील रिपोर्ट अद्याप जिल्हा रूग्णालयातून आलेले नाही. त्यामुळे हे खाजगी रुग्णालयातील रिपोर्ट असून सध्या अकोेले तालुक्यातील काही संशयित रूग्ण आहेत त्यांचे रिपोर्ट आज उशिरा किंवा उद्या सकाळी मिळण्याची शक्यता आहे.
=========================
आभार
प्रिय वाचकहो.! आज सार्वभौम या पोर्टलाचा वर्धापनदिन आहे. गेल्या एक वर्षात राजकीय विश्लेषण, क्राईम स्टेरी, सामाजिक, आर्थिक व भौगोलीक घडामोडींवर आपण 593 लेख लिहिले आहेत. त्यास उदंड प्रतिसाद देत आजवर त्याचे 69 लाख 35 हजार 425 वाचक झाले आहेत. खरंतर आज 12/7 तारीख आहे. त्यामुळे, कोणाच्याही आर्थिक व राजकीय दबावाला बळी न पडता अनेकांचा 7/12 आपण उघडा पाडला, गेल्या वर्षभरात कोणाला न्याय दिला तर कोणाची मने दुखावली असतील त्याबद्दल दिलगिरी.! पण निर्भिड व निष्पक्ष पत्रकारीता म्हणजे काय! हे तुमच्याकडे पाहून कळते. या शब्दांचे मानकरी आम्ही ठरलो हीच या पोर्टलची मिळकत आहे. बातम्या करणे हा माझा हातखंडा असला तरी माझ्या सह्याद्रीसारख्या प्रतिनिधींचे त्यात फार अनमोल योगदान आहे. तर जे ज्ञात अज्ञात मित्र, हितचिंतक ही बातमी शेअर करतात ते देखील या यशाचे शिल्पकार आहेत. या सर्वांचे मी मन:पुर्वक आभार मानतो!
संपादक
- सागर शिंदे
--------------------------------------
आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 70 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 365 दिवसात 593 लेखांचे 70 लाख वाचक)============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------