...जर तिला निवारा मिळाला नसता तर अकोल्यात तिच्यावर कित्तेक वेळा अत्याचार झाले असते. एक संघर्षाची कहाणी!

 - सागर शिंदे
 अकोले (सार्वभौम) : 
                         अकोले शहरात गेल्या कित्तेक दिवसांपासून एक अज्ञात तरुणी फिरत होती. थोडी मानसिकदृष्ट्या अधू असल्यामुळे काही नराधमांनी तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतल्याची माहिती रोखठोक सार्वभौमच्या हाती आली होती. त्यामुळे अत्याचारपेक्षा तिला आयुष्यभराचा निवारा मिळवून देणे आम्हाला मोलाचे वाटले. त्यानंतर अकोले पोलीस ठाणे, स्नेहालयाचे कर्मचारी आणि रोखठोक सार्वभौमची टिम यांच्या सततच्या पाठपुराव्याने या मुलीस नगर तालुक्यातील अमृतवाहीनीचे मानवसेवा प्रकल्प येथे दाखल करण्यात आले आहे. आम्ही सर्वांच्या प्रयत्नापेक्षा ज्या संस्थेने त्या मुलीस स्विकारले ते दिलीप गुंजाळ यांचे मानावे तितके आभार कमीच आहे. त्या संस्थेच्या सामाजिकतेला अकोलेकरांनी सॅल्युट केला आहे.
                       खरंतर गेल्या कित्तेक वर्षापासून आपण रोडच्या कडेला किंवा शहरांच्या वर्दळीच्या ठिकाणी अनाथ व्यक्तींना पाहतो. तेव्हा अक्षरश: काळजाचे पाणी-पाणी होते. यांच्यासाठी खरंतर अकोले-संगमनेर अशा दोनतीन तालुक्यांसाठी एखादा प्रकल्प सुरू झाला पाहिजे. मात्र, लोक पैशाच्या मागे धावता-धावता त्यांना सामाजिक कामांसाठी वेळ आहे तरी कोठे? सार्वभौम फाऊंडेशन यासाठी नक्की एक दिवस हे काम हाती घेईल. परंतु तत्पुर्वी फार मोठे संघटन आणि ज्यांच्या भावना जागरुक आहेत कि ज्यांना माणूस म्हणता येईल अशा व्यक्तींचा शोध घ्यावा लागणार आहे. कारण, लोक पोपटासारखे बोेलतात परंतु जेव्हा प्रत्यक्षात काम करण्याची वेळ येते तेव्हा मात्र कोणाचाच शोध लागत नाही. मात्र, दिलीप गुंजाळ यांच्यासारख्या व्यक्तीने अगदी रस्त्यावर फिरणार्‍या शेकडो लोकांवर उपचार करून त्यांना पुन्हा घरी सोडले आहे. अशा व्यक्तींच्या कर्तुत्वाला शब्दात बांधणे शक्य नाही.
                   अकोल्यातील त्या तरुणीच्या बाबत सांगायचे झाले तर, शुक्रवार दि.10 रोजी सायंकाळी बस स्थानकाच्या परिसरातून एक 18 ते 20 वयाची तरुणी समोरुन जाताना दिसली. ही कोण? असा प्रश्न सहज माझ्या मनात डोकावला. तोच आ. डॉ. किरण लहामटे यांचे पीए भाऊसाहेब साळवे यांनी या मुलीविषयी थोडक्यात माहिती सांगितली. त्यानंतर आणखी एकाने एक खळबळजनक माहिती दिली की, या तरुणीवर काही नराधमांनी रात्रीची वेळ साधून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिचे दैव बलोत्तर म्हणून काही समाजसेवकांनी त्या पवार नामक व्यक्तीला चांगले कानफाडले. अगदी त्यानंतर दोन दिवसांनी ती आम्हाला दिसली असता तिची कैफियत ऐकल्यानंतर या अकोले तालुक्यात असे प्रकार घडतात यावर विश्वास पटला नाही. येथे पुरोगामीत्वाचे झेंडे मिरविले जातात, येथे वैचारिक चळवळीच्या बैठका होतात, तालुक्याला संस्कृतीचा वसा आणि वारसा आहे असे अनेकांच्या भाषणांमधून घसे फाडून सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्ष कृतीत मात्र शुन्यता दिसून येते.
                     
  या मुलीस पाहिल्यानंतर तिच्या निरागसतेला निवारा मिळाला पाहिजे या हेतूने आम्ही प्रयत्न सुरू केले. पहिल्यांदा नगर येथील सामाजिक व्यक्तीमत्व असणार्‍या प्रिया सोनवणे यांच्याशी संपर्क केला. ही मुलगी कशी व कोठे आहे. याची त्यांनी विचारणा केली असता रोखठोक सार्वभौमची टिम महेश जेजुरकर, अजिंक्य शेटे आणि मी स्वत: या मुलीच्या शोधात निघालो. बाजारतळ, बस स्थानक, कॉलेज, आयटीआय, शिवाजीनगर, तहसिल परिसर, छोटा, मोठा नदिचा पुल अशा अनेक ठिकाणी या तरुणीचा शोध घेतला. मात्र, ती मिळाली नाही. त्यानंतर अकोले नगरपंचायत 1 ते 17 या सोशल मीडिया गृपवर एक मेसेज टाकला असता तेथून सजग नागरिकांनी प्रतिक्रिया देत तरुणीचा शोध सुरू केला. सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास या मुलीचा शोध लागला. तोवर सखी मंच, स्नेहालय, चाईल्ड लाईन येथून अकोले पोलीस ठाण्याशी संपर्क करण्यात आला होता. तेव्हा अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आरविंद जोेंधळे यांनी या घटनेकडे मोठ्या गांभीर्याने पाहिले. त्यांनी तत्काळ एक टिम तयार करून मुलीच्या शोधार्थ रवाना केली. यात पोलीस हेडकॉन्स्टेबल वाघ, महिला पोलीस वाळेकर व गोंदके मॅडम यांनी यात फार महत्वाची कामगिरी पार पडली.
                             
सायंकाळी या तरुणीस ताब्यात घेतल्यानंतर तिला पोलीस ठाण्यात सर्वात सुरक्षित असा अश्रय देण्यात आला. दुसर्‍या दिवशी वेगवेगळ्या संस्थांना फोन करुन तिची जबाबदारी घेता का? असे विचारण्यात आले. मात्र, सध्या कोरोनाची महामारी सुरू असल्यामुळे कोणी या तरुणीस आश्रय देण्यास तयार झाले नाही. माऊली येथील संस्थेना देखील तिला प्रवेश नाकारल्यामुळे आता या मुलीचे काय कारयचे? असा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर महिला पोलीस वाळेकर यांनी स्वत:ला त्रास झाला तरी चालेल पण या बेघर मुलीस घर देण्याचा मानस मनी आखला आणि हवे नव्हे असे प्रयत्न त्या खाक्या वर्दीतल्या माऊलीने केला. या मुलीस कोणी आश्रय देईना म्हणून त्यांनी मुलीची कोविड टेस्ट केली. अन्य मेडिकल करुन अनेक ठिकाणी विनंती करण्यात आली. त्यानंतर देखील ना पोलिसांनी धीर सोडला ना सार्वभौमची टिमने. त्यानंतर प्रिया सोनवणे मॅडम यांनी नगर तालुक्यातील आरणगाव येथे अमृतवाहीनीचा प्रकल्प मानवसेवा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पहिल्याच विनंतीला प्रतिसाद दिली आणि रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान काल बस स्थानक आणि अकोल्याच्या बाजारतळावर झोपणारी ही तरुणी सुरक्षित ठिकाणी पोहचली. यावेळी तिच्या चेहर्‍यावर प्रचंड समाधान होते. कालपासून तिच्यावर संस्थेचे अधिकारी दिलीप गुंजाळ यांनी उपचार सुरू केले आहेत. या मनोरुग्ण तरुणीवर उपचार करुन ती ठिक झाल्यानंतर तिच्या कुटुंबाचा शोध घेतला जाईल, एक सक्षम मुलगी तयार करुन तिचे तिच्या कुटुंबातच पनर्वसन केले जाईल. कारण या संस्थेने आजवर राज्यासह देशभरातील 582 रुग्णांना बरे करून त्यांच्या घरी सोडले आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीला आणि सामाजिक कार्याला अकोले तालुका कधीच विसरू शकनार नाही.
             
 दरम्यान या कामात अकोले पोलीस ठाणे, त्यात महत्वाचे म्हणजे वाळेकर मॅडम व वाहन चालक अरुण चांदने यांनी अथक परिश्रम घेतले आहे. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मुलीस सोडल्यानंतर हे सर्व व्यक्ती उपासपोटी होते. कोरोनामुळे कोणतेही हॉटेल चालु नसल्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप झाला. मात्र, प्रिया सोनवणे यांनी त्यांना अशा नडल्यावेळी मदत करुन पोलीस पथकाला मार्गस्त केले. मात्र, रात्री 1 वाजता पोलीस गाडी अचानक बिघडल्यामुळे अकोल्यातून दुसरी गाडी पाठवून पहाटे हे पथक पुन्हा कामावर हजर झाले. त्यावेळी त्यांना मोहम्मद शेख व अभिजित नवले यांना मदत केली. खरंतर त्या अनाथ मुलीस निवारा मिळाला खरा पण त्यासाठी ज्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली त्यांचे रोखठोक सार्वभौम आभार मानत आहे. या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून काही संघटनांनी पोलिसांचे व या महिला कर्मचार्‍याचा सन्मान केला पाहिजे. कारण, आज एका अनाथ मुलीस आश्रय मिळाला आहे अन्यथा तिच्यावर कित्तेक वेळा अत्याचार झाले असते आणि येणार्‍या काळात अनुचित प्रकार शहरात पहायला मिळाला असता त्यामुळे तिला अमृतासह सहारा देण्यापासून तर सार्वभौमच्या टिमसह प्रत्येकाचे आभार.!
- महेश जेजुरकर
=========================

 भा


प्रिय वाचकहो.! आज सार्वभौम या पोर्टलाचा वर्धापनदिन आहे. गेल्या एक वर्षात राजकीय विश्लेषण, क्राईम स्टेरी, सामाजिक, आर्थिक व भौगोलीक   घडामोडींवर आपण 593 लेख लिहिले आहेत. त्यास उदंड प्रतिसाद देत आजवर त्याचे 69 लाख 35 हजार 425 वाचक झाले आहेत. खरंतर आज 12/7 तारीख आहे. त्यामुळे, कोणाच्याही आर्थिक व राजकीय दबावाला बळी न पडता अनेकांचा 7/12 आपण उघडा पाडला, गेल्या वर्षभरात कोणाला न्याय दिला तर कोणाची मने दुखावली असतील त्याबद्दल दिलगिरी.! पण निर्भिड व निष्पक्ष पत्रकारीता म्हणजे काय! हे तुमच्याकडे पाहून कळते. या शब्दांचे मानकरी आम्ही ठरलो हीच या पोर्टलची मिळकत आहे. बातम्या करणे हा माझा हातखंडा असला तरी माझ्या सह्याद्रीसारख्या प्रतिनिधींचे त्यात फार अनमोल योगदान आहे. तर जे ज्ञात अज्ञात मित्र, हितचिंतक ही बातमी शेअर करतात ते देखील या यशाचे शिल्पकार आहेत. या सर्वांचे मी मन:पुर्वक आभार मानतो!
संपादक
- सागर शिंदे 
--------------------------------------
 आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 70 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 365 दिवसात 593 लेखांचे 70 लाख वाचक)