सरपंचासाठी भाजपचे भाऊप्रेमी आमदारांच्या दावणीला! राष्ट्रवादीत फितुरी! डॉक्टर एकदा त्यांचे ऑपरेशन कराच!


सार्वभौम (संगमनेर) :- 
                      सन 2019 ची विधानसभा संपली आणि डॉ. लहामटे यांनी भाजपच्या नेत्यांचा सुपडा साफ केला. येथे घराणेशाही किंवा धनशक्तीचा बिमोड होऊ शकतो याची प्रचिती गेल्या 40 वर्षानंतर सिद्धीस आली. येथे पिचड कुटुंबाला पराभव पत्कारावा लागला खरा, मात्र त्यांच्यानंतर त्यांचे कार्यकर्ते प्रचंड सैरभैर झाल्याचे दिसू लागले आहे. जे स्वत:ला निष्ठावंत "भाऊप्रेमी" म्हणून घेत होते. तेच आज आ. डॉ. किरण लहामटे यांच्या कार्यालयात खेटा मारताना दिसत आहे. हे काय डॉ. लहामटे किंवा राष्ट्रवादी प्रेम म्हणून नाही, तर येणार्‍या काळात ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमायचे आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी सरपंच पदासाठी त्यांची "भाऊनिष्ठा" चक्क आमदारांचा "दावणीला" बांधल्याचे दिसते आहे. यात विशेष म्हणजे जे स्वत:ला राष्ट्रवादीचे निष्ठावंत म्हणतात तेच भाजपच्या इच्छुकांना पाठबळ देताना दिसत आहे. त्यातल्या त्यात दुर्दैव असे की, राष्ट्रवादीत देखील एक "अ‍ॅन्टी राष्ट्रवादी" नेत्यांची भरती असून ते भाजपच्या कार्यकर्त्यांची सेटींग लावण्यात व्यस्त आहेत. तेव्हा एक सहज प्रश्न पडतो, हे लोक पक्ष वाढविण्यासाठी काम करतात की पक्ष बुडविण्याचे काम करत आहे. याचे उत्तर पक्षातील नेत्यांनी शोधले पाहिजे. त्यामुळे अशा "अँन्टीक" व्यक्तींवर डॉक्टर लहामटे यांनी जालीम औषध शोधून काढणे गरजेचे आहे. अन्यथा यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास हे उद्या राष्ट्रवादीला पक्षाला उभारल्याशिवाय राहणार नाही. यांचेच काय! तर या सत्तापिपासू आणि धोकेबाज लोकांपासून पिचड कुटुंबाने देखील धडा शिकला पाहिजे. आत खर्‍या अर्थाने यांचे बुरखे फाटून असली चेहरी पुढे येऊ लागले आहेत. कारण, यांच्यामुळेच तर त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी यातून चांगला धड शिकला पाहिजे असे विश्लेषकांना वाटते आहे.
                           खरंतर दिवसेंदिवस अकोले तालुक्याचे राजकारण चांगलेच रंगत चालले आहे. मात्र, तालुक्याला जालीम डॉक्टर मिळाल्यामुळे भलेभले आजही "व्हेंटीलेटरवर" पडले आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ज्यांनी सत्ता कोणाची येते याची वाट पाहून पक्षांतर करायचे की नाही याची वाट पाहिली, ते आज पिचड परिवाराला सोडून राष्ट्रवादीत स्थैर्य मिळू पाहत आहे. अशा व्यक्तींना खरंतर डॉक्टरांनी स्विकारले नाहीच. कारण, यांनी निवडणुकीत काय गुण उधाळले हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या नसा कोठे दाबायच्या हे डॉक्टरांना चांगलेच ज्ञात आहे. त्यामुळे ते घड्याळाला घेऊन मिरवत असले तरी त्यांना घेऊन मिरवायला डॉक्टर तयार नाही. कारण, येथे वशीला नाही, तर फक्त सामान्य जनता आणि न्यायाचा आवाज ऐकला जातो अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. त्यामुळे, खरोखर जनतेच्या मनातील आमदार आणि सामान्य जनतेच्या आवाजाला साद देणारा आमदार म्हणून यांच्याकडे पाहिले जात आहे.
                           एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हापासून ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नेमणुका सुरू झाल्या आहेत. तेव्हापासून भाजपच्या नेत्यांचा सुरबुडा उठला आहे. याचे कारण म्हणजे यापुर्वी पिचडांच्या वरदहस्ताने तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायत आज भाजपच्या ताब्यात आहेत. मात्र, आता त्याचा कालावधी संपल्यामुळे गावतील प्रभूत्व हातातून चालले हे प्रस्तापितांना पहावेनासे झाले आहे. त्यामुळे काल नव्याने राष्ट्रवादीचा तयार झालेला सामान्य कार्यकर्ता आज आपला उरावर बसतो की काय? अशी भिती अनेकांना आहे. इतकेच काय! अगदी सामान्यातील अतिसामान्य जातीच्या लोकांनी देखील डॉक्टरांना निवडणुकीत अगदी तळहातावर उचलुन धरले. त्यामुळे एसी. एसटीचे तरुण अचानक पुढारी होऊन गेला. त्यामुळे काही गावांमध्ये मोठे जातीचे वावडे दिसून येत आहे. हे प्रस्तापितांना खपेल तर ते पुढारी कसले. नाव श्री. छत्रपती, फुले, शाहु, आंबेडकर यांचे घ्यायचे आणि मनात कपटी अफजलखान पाळायचा असे देखील राजकारण आता समोर येऊ लागले आहे. मात्र, या सर्वांना डॉ. लहामटे यांनी जालीम औषध शोधले आहे. त्यामुळे येणार्‍या काळात धिटाई आणि धनशक्ती यांचा प्रयोग येथे चालणार नाही. तर खर्‍या अर्थाने मिरीट असेल त्याला संधी मिळेल. असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
                             
या पलिकडे उद्या कारखाना, ग्रामपंचायत, नगरपंचायत यांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. जर डॉक्टर लहामटे, ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, संपतराव नाईकवाडी, सुरेश खांडगे, संदीप शेणकर, विनय सावंत, चंद्रभान नवले आर. के उगले, पोपटराव दराडे यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांनी मिळून जर आज ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावागावात पक्षाची मोट बांधली, तर उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांची पायाभरणी करताना त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे, प्रत्येक ठिकाणी योग्य व्यक्ती कसा बसेल याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण, सुदैवाने आमदारांचे भाग्य उजलळे, त्यात राज्यात सत्ता आली, आता त्यानंतर गावागावात प्रभुत्व मिळविण्याची नामी संधी मिळून गेली. याचा फायदा राष्ट्रवादीच्या निष्ठावंत आणि ज्येष्ठ तसेच वैचारिक लोकांनी  एकत्र येऊन घेतला पाहिजे असे अनेकांना वाटते आहे.
एक अंतीम गोष्ट म्हणजे माजी आमदार यांना कार्यकर्त्यांकडून फार मोठा धोक सहन करावा लागला आहे. मात्र, यात काही निष्ठावंत कार्यकर्तेे त्यांच्याशी आजही प्रमाणिक आहे. पद नको, पैसा नको, टेंडर नको फक्त साथ हवी याच अजेंड्यावर अनेकजण त्यांच्याशी प्रामाणिक आहेत. फक्त कालपर्यंत जे भाऊ म्हणजे आमचा जीव की प्राण असे म्हणत होतेे ते आज निव्वळ चार माहिन्यांचा सरपंच पदासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे उंबरे झिजवत आहे. दिवसा नव्हे तर "रात्रीस खेळ चाले" असले प्रकार दिसून येत आहे. त्यांची जरा आजच यादी करुन ठेवली पाहिजे, कारण हेच खरे पाठीत खंजिर खुपसणारे ते वेळ आली की सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे भाजपने देखील त्यांची गुप्त यंत्रणा कार्यान्वीत केली पाहिजे. अन्यथा हे दगाबाज पाळले तर पुन्हा पराभवाच्या धक्क्याला सामोरे जावे लागेल. म्हणात ना! तोंडावर बोललेला कटू मित्र चांगला मात्र, पाठिमागे कुभांड रचणारा नको.! असेच कार्यकर्ते आजकाल दिसू लागले आहेत.! पाहू पिक्चर अभी बाकी है.!
 --------------------------------------
 आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 68 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 74 लाख वाचक)