संगमनेरात उपनगराध्यक्षाच्या बंगल्याशेजारी कोरोनाचा संशयित रुग्ण मयत.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेरमध्ये दोन दिवसांपूर्वी दोन कोरोना बाधितांची मयत होत नाही, तेच आज पुन्हा एका 48 वर्षीय कोरोनाच्या संशियताची मयत झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. परंतु सदर व्यक्तीचा कोविड आरटीपीसीआर अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कोरोना संशयित असल्याने त्याची नोंद कोरोनाबधितांच्या यादीत झालेली नसून संशयित म्हणून घेतलेली आहे. त्यामुळे अद्याप कोरोनाबधितांची संख्या ही 16 वर स्थिर आहे. मात्र, त्याला बाधा झाल्याची संगमनेरमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
दरम्यान, ही व्यक्ती विद्यानगर येथील असून मॅकिनिकलचा व्यवसाय असल्याने कोण-कोण त्यांच्या संपर्कात आले आहे. याचा शोध घेणे आता सुरु केले असून ते प्रशासनापुढे फर मोठे आव्हान आहे. ही कोरोनासंशयित व्यक्ती विद्यमान उपनगराध्यक्ष यांच्या परिसरातीलच असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली आहे. एकीकडे तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. चार दिवसात तब्बल 87 रुग्ण तालुक्यात आढळून आले आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोनाबधितांचा आकडा 389 वर जाऊन पोहचला आहे. पण, कोरोनाग्रस्तांच्या संख्येबरोबरच दिवसागणिक कोरोनाबाधीत होऊन मयत होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. तालुक्यातील 42 गावांमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. दिवसेंदिवस नविन गावात कोरोनाचा शिरकाव होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. आता ही चैन कशी तुटेल यासाठी प्रशासन कसोशीे प्रयत्न करत आहे.
दरम्यान, आज कोरोनाचा कुठलाही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे अद्याप संगमनेरकरांना दिलासा देणारी वार्ता आहे. मात्र सायंकाळी अचानक मोठी बातमी एकायला येते आणि संगमनेरात एकच खळबळ उडून जाते. यावर काहीतरी ठोस उपाय काढणे गरजेचे आहे. या रुग्णाबाबत माहिती अशी की, यांना त्रास होऊ लागल्याने यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथून त्यांना सरकारी रुग्णालयातून दाखल केले होते. मात्र तेथे देखील त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याने रात्री त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होेते. तेथेच त्यांची मयत झाली आहे. मात्र याबाबत प्रशासनाने काही गोपनियता पाळल्याचे बोलले जात आहे. मात्र हा व्यक्ती एका बड्या पदाधिकार्याच्या घराच्या शेजारी संशयित रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, कोणा घाबरुन जाऊ नये, स्वत:ची काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स पाळावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.